1. {जीवन आणि वर्तणूक ह्यांसंबधीची सूत्रे} [PS] मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, [QBR] पण त्याच्या जिव्हेचे उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. [QBR]
2. मनुष्याच्या दृष्टीने त्याचे सर्व मार्ग शुद्ध असतात, [QBR] पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. [QBR]
3. आपली कामे परमेश्वराच्या स्वाधीन करा, [QBR] आणि म्हणजे तुमच्या योजना यशस्वी होतील. [QBR]
4. परमेश्वराने सर्वकाही त्याच्या उद्देशासाठी बनवलेले आहे, [QBR] दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे. [QBR]
5. प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वरास वीट आहे, [QBR] जरी ते हातात हात घालून उभे राहिले, तरी त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. [QBR]
6. कराराचा प्रामाणिकपणा व विश्वसनीयता ह्यांच्या योगाने पापांचे प्रायश्चित होते, [QBR] आणि परमेश्वराचे भय धरल्याने, लोक वाईटापासून वळून दूर राहतील. [QBR]
7. मनुष्याचे मार्ग परमेश्वरास आवडले म्हणजे, [QBR] त्या मनुष्याच्या शत्रूलाही त्याच्याशी समेट करण्यास भाग पाडतो. [QBR]
8. अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीपेक्षा, [QBR] न्यायाने कमावलेले थोडेसे चांगले आहे. [QBR]
9. मनुष्याचे मन त्याच्या मार्गाची योजना करते, [QBR] पण परमेश्वर त्याच्या पावलांना वाट दाखवतो. [QBR]
10. दैवी निर्णय राजाच्या ओठात असतात, [QBR] न्याय करताना त्याच्या मुखाने कपटाने बोलू नये. [QBR]
11. परमेश्वराकडून प्रामाणिक मोजमाप येते; [QBR] पिशवीतील सर्व वजने त्याचे कार्य आहे. [QBR]
12. जेव्हा राजा वाईट गोष्टी करतो, त्या गोष्टी त्यास तिरस्कारणीय आहेत, [QBR] कारण राजासन नीतिमत्तेनेच स्थापित होते. [QBR]
13. नीतिमत्तेने बोलणाऱ्या ओठाने राजाला आनंद होतो, [QBR] आणि जे कोणी सरळ बोलतात ते त्यास प्रिय आहेत. [QBR]
14. राजाचा क्रोध मृत्यू दूतांसारखा आहे. [QBR] पण सुज्ञ मनुष्य त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतो. [QBR]
15. राजाच्या मुखतेजात जीवन आहे, [QBR] आणि त्याचा अनुग्रह शेवटल्या पावसाच्या मेघासारखा आहे. [QBR]
16. सोन्यापेक्षा ज्ञान प्राप्त करून घेणे किती तरी उत्तम आहे. [QBR] रुप्यापेक्षा समजुतदारपणा निवडून घ्यावा. [QBR]
17. दुष्कर्मापासून वळणे हा सरळांचा राजमार्ग आहे, [QBR] जो आपल्या मार्गाकडे लक्ष ठेवतो तो आपला जीव राखतो. [QBR]
18. नाशापूर्वी गर्व येतो, [QBR] आणि मनाचा ताठा अधःपाताचे मूळ आहे. [QBR]
19. गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा [QBR] दीनांबरोबर विनम्र असणे चांगले. [QBR]
20. जो कोणी जे काही चांगले आहे ते शोधतो, [QBR] त्यास शिकवीले त्याचे निरीक्षण करतो, [QBR] आणि जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो आनंदीत होतो. [QBR]
21. जो मनाचा सुज्ञ त्यास समंजस म्हणतात, [QBR] आणि मधुर वाणीने शिकवण्यची क्षमता वाढते. [QBR]
22. ज्यांच्याकडे सुज्ञान आहे त्यास ती जीवनाचा झरा आहे, [QBR] पण मूर्खाचे मूर्खपण त्याची शिक्षा आहे. [QBR]
23. सुज्ञ मनुष्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; [QBR] आणि त्याच्या वाणीत विद्येची भर घालते. [QBR]
24. आनंदी शब्द मधाचे पोळ अशी आहेत, [QBR] ती जिवाला गोड व हाडांस आरोग्य आहेत. [QBR]
25. मनुष्यास एक मार्ग सरळ दिसतो, [QBR] पण त्याचा शेवट मृत्यूमार्गाकडे आहे. [QBR]
26. कामगाराची भूक त्याच्यासाठी काम करते; [QBR] त्याची भूक त्यास ते करायला लावते. [QBR]
27. नालायक मनुष्य खोड्या उकरून काढतो, [QBR] आणि त्याची वाणी होरपळणाऱ्या अग्नीसारखी आहे. [QBR]
28. कुटिल मनुष्य संघर्ष निर्माण करतो, [QBR] आणि निंदा करणाऱ्या जवळच्या मित्रांना वेगळे करतो. [QBR]
29. जुलमी मनुष्य आपल्या शेजाऱ्याशी लबाड बोलतो, [QBR] आणि जो मार्ग चांगला नाही अशात त्यास नेतो. [QBR]
30. जो कोणी मनुष्य कुटिल गोष्टीच्या योजणेला डोळे मिचकावतो; [QBR] जो आपले ओठ आवळून धरतो तो दुष्कर्म घडून आणतो. [QBR]
31. पिकलेले केस वैभवाचा मुकुट आहे; [QBR] नीतिमत्तेच्या मार्गाने चालण्याने तो प्राप्त होतो. [QBR]
32. ज्याला लवकर राग येत नाही तो योद्धापेक्षा, [QBR] आणि जो आत्म्यावर अधिकार चालवतो तो नगर जिंकऱ्यापेक्षा उत्तम आहे. [QBR]
33. पदरात चिठ्ठ्या टाकतात, [QBR] पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून आहे. [PE]