1. {#1जीवन आणि वर्तणूक ह्यांसंबधीची सूत्रे } [QS]मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, [QE][QS]पण त्याच्या जिव्हेचे उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. [QE]
2. [QS]मनुष्याच्या दृष्टीने त्याचे सर्व मार्ग शुद्ध असतात, [QE][QS]पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. [QE]
3. [QS]आपली कामे परमेश्वराच्या स्वाधीन करा, [QE][QS]आणि म्हणजे तुमच्या योजना यशस्वी होतील. [QE]
4. [QS]परमेश्वराने सर्वकाही त्याच्या उद्देशासाठी बनवलेले आहे, [QE][QS]दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे. [QE]
5. [QS]प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वरास वीट आहे, [QE][QS]जरी ते हातात हात घालून उभे राहिले, तरी त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. [QE]
6. [QS]कराराचा प्रामाणिकपणा व विश्वसनीयता ह्यांच्या योगाने पापांचे प्रायश्चित होते, [QE][QS]आणि परमेश्वराचे भय धरल्याने, लोक वाईटापासून वळून दूर राहतील. [QE]
7. [QS]मनुष्याचे मार्ग परमेश्वरास आवडले म्हणजे, [QE][QS]त्या मनुष्याच्या शत्रूलाही त्याच्याशी समेट करण्यास भाग पाडतो. [QE]
8. [QS]अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीपेक्षा, [QE][QS]न्यायाने कमावलेले थोडेसे चांगले आहे. [QE]
9. [QS]मनुष्याचे मन त्याच्या मार्गाची योजना करते, [QE][QS]पण परमेश्वर त्याच्या पावलांना वाट दाखवतो. [QE]
10. [QS]दैवी निर्णय राजाच्या ओठात असतात, [QE][QS]न्याय करताना त्याच्या मुखाने कपटाने बोलू नये. [QE]
11. [QS]परमेश्वराकडून प्रामाणिक मोजमाप येते; [QE][QS]पिशवीतील सर्व वजने त्याचे कार्य आहे. [QE]
12. [QS]जेव्हा राजा वाईट गोष्टी करतो, त्या गोष्टी त्यास तिरस्कारणीय आहेत, [QE][QS]कारण राजासन नीतिमत्तेनेच स्थापित होते. [QE]
13. [QS]नीतिमत्तेने बोलणाऱ्या ओठाने राजाला आनंद होतो, [QE][QS]आणि जे कोणी सरळ बोलतात ते त्यास प्रिय आहेत. [QE]
14. [QS]राजाचा क्रोध मृत्यू दूतांसारखा आहे. [QE][QS]पण सुज्ञ मनुष्य त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतो. [QE]
15. [QS]राजाच्या मुखतेजात जीवन आहे, [QE][QS]आणि त्याचा अनुग्रह शेवटल्या पावसाच्या मेघासारखा आहे. [QE]
16. [QS]सोन्यापेक्षा ज्ञान प्राप्त करून घेणे किती तरी उत्तम आहे. [QE][QS]रुप्यापेक्षा समजुतदारपणा निवडून घ्यावा. [QE]
17. [QS]दुष्कर्मापासून वळणे हा सरळांचा राजमार्ग आहे, [QE][QS]जो आपल्या मार्गाकडे लक्ष ठेवतो तो आपला जीव राखतो. [QE]
18. [QS]नाशापूर्वी गर्व येतो, [QE][QS]आणि मनाचा ताठा अधःपाताचे मूळ आहे. [QE]
19. [QS]गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा [QE][QS]दीनांबरोबर विनम्र असणे चांगले. [QE]
20. [QS]जो कोणी जे काही चांगले आहे ते शोधतो, [QE][QS]त्यास शिकवीले त्याचे निरीक्षण करतो, [QE][QS]आणि जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो आनंदीत होतो. [QE]
21. [QS]जो मनाचा सुज्ञ त्यास समंजस म्हणतात, [QE][QS]आणि मधुर वाणीने शिकवण्यची क्षमता वाढते. [QE]
22. [QS]ज्यांच्याकडे सुज्ञान आहे त्यास ती जीवनाचा झरा आहे, [QE][QS]पण मूर्खाचे मूर्खपण त्याची शिक्षा आहे. [QE]
23. [QS]सुज्ञ मनुष्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; [QE][QS]आणि त्याच्या वाणीत विद्येची भर घालते. [QE]
24. [QS]आनंदी शब्द मधाचे पोळ अशी आहेत, [QE][QS]ती जिवाला गोड व हाडांस आरोग्य आहेत. [QE]
25. [QS]मनुष्यास एक मार्ग सरळ दिसतो, [QE][QS]पण त्याचा शेवट मृत्यूमार्गाकडे आहे. [QE]
26. [QS]कामगाराची भूक त्याच्यासाठी काम करते; [QE][QS]त्याची भूक त्यास ते करायला लावते. [QE]
27. [QS]नालायक मनुष्य खोड्या उकरून काढतो, [QE][QS]आणि त्याची वाणी होरपळणाऱ्या अग्नीसारखी आहे. [QE]
28. [QS]कुटिल मनुष्य संघर्ष निर्माण करतो, [QE][QS]आणि निंदा करणाऱ्या जवळच्या मित्रांना वेगळे करतो. [QE]
29. [QS]जुलमी मनुष्य आपल्या शेजाऱ्याशी लबाड बोलतो, [QE][QS]आणि जो मार्ग चांगला नाही अशात त्यास नेतो. [QE]
30. [QS]जो कोणी मनुष्य कुटिल गोष्टीच्या योजणेला डोळे मिचकावतो; [QE][QS]जो आपले ओठ आवळून धरतो तो दुष्कर्म घडून आणतो. [QE]
31. [QS]पिकलेले केस वैभवाचा मुकुट आहे; [QE][QS]नीतिमत्तेच्या मार्गाने चालण्याने तो प्राप्त होतो. [QE]
32. [QS]ज्याला लवकर राग येत नाही तो योद्धापेक्षा, [QE][QS]आणि जो आत्म्यावर अधिकार चालवतो तो नगर जिंकऱ्यापेक्षा उत्तम आहे. [QE]
33. [QS]पदरात चिठ्ठ्या टाकतात, [QE][QS]पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून आहे. [QE]