मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
नीतिसूत्रे
1. एखाद्या घरात पूर्ण मेजवानीची मुबलकता असून त्यामध्ये संघर्ष असला तर [QBR] त्यापेक्षा कोरड्या भाकरीचा तुकडा शांतीने खाणे उत्तम आहे. [QBR]
2. शहाणा सेवक लज्जास्पद वागणाऱ्या मुलावर अधिकार चालवीन [QBR] आणि एका भावाप्रमाणे वतनाचा भागीदार होईल. [QBR]
3. चांदी मुशीत आणि सोने भट्टीत तावून पाहतात, [QBR] पण परमेश्वर हृदय शुध्द करतो. [QBR]
4. जो मनुष्य वाईट करतो तो दुष्ट वाणीला कान देऊन ऐकतो; [QBR] जे वाईट गोष्टी सांगतात ते लबाड लक्ष देऊन ऐकतो. [QBR]
5. जो कोणी गरीबांची थट्टा करतो तो त्याच्या निर्माणकर्त्याचा अपमान करतो, [QBR] आणि जो दुसऱ्याच्या आपत्तीने आनंदित होतो त्यास शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. [QBR]
6. नातवंडे वृद्धांचा मुकुट आहेत, [QBR] आणि आईवडील आपल्या मुलांस वैभव आणतात. [QBR]
7. उत्कृष्ट बोलणे मूर्खास शोभत नाही; [QBR] तसेच राज्यकर्त्याला खोटे ओठ किती तरी कमी शोभतात. [QBR]
8. लाच देणाऱ्याच्या दृष्टीने ती जादूच्या खड्यांसारखी आहे; [QBR] जिकडे तो वळतो तिकडे तो यशस्वी होतो. [QBR]
9. जो कोणी एखाद्याच्या अपराधाकडे दुर्लक्ष करतो तो प्रेम शोधतो, [QBR] पण जो कोणी गत गोष्टी घोकत बसतो तो जवळच्या मित्रास अंतरतो. [QBR]
10. मूर्खाच्या मनात शंभर फटके ठसतात, [QBR] यापेक्षा निषेध बुद्धिमान मनुष्याच्या मनावर अधिक खोलवर ठसतो. [QBR]
11. वाईट मनुष्य केवळ बंड करायचे शोधतो, [QBR] म्हणून क्रूर निरोपे त्याच्याविरुध्द पाठवण्यात येईल. [QBR]
12. मूर्खतेत खितपत असलेल्या मूर्खाची भेट होण्यापेक्षा [QBR] जिचे पिल्ले चोरून नेली आहेत अशा अस्वलीची गाठ पडलेली बरी. [QBR]
13. जो कोणी बऱ्याची फेड वाईटाने करील, [QBR] त्याच्या घरातून वाईट कधी जाणार नाही. [QBR]
14. कोणीतरी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे, तसे भांडणाला सुरवात होण्यासारखे आहे, [QBR] म्हणून भांडण होण्यापूर्वीच त्यापासून दूर निघून जा. [QBR]
15. जो कोणी दुष्टाला निर्दोष ठरवतो किंवा नीतिमानाला दोषी ठरवतो, [QBR] या दोन्ही लोकांचा परमेश्वरास तिटकारा आहे. [QBR]
16. मूर्खाला बुद्धी नसताना तो ज्ञानाविषयी शिक्षण घेण्यासाठी पैसा का देतो, [QBR] जेव्हा त्याची ते शिकण्याची क्षमता नाही? [QBR]
17. मित्र सर्व वेळी प्रीती करतो, [QBR] आणि भाऊ संकटाच्या वेळेसाठी जन्मला आहे. [QBR]
18. बुद्धिहीन मनुष्य वचनानी बांधला जातो, [QBR] आणि त्याच्या शेजाऱ्याच्या कर्जाला जबाबदार होतो. [QBR]
19. ज्याला भांडण प्रिय त्यास पाप प्रिय; [QBR] जो आपले दार उंच करतो तो हाड मोडण्यास कारण होतो [* गर्वाचे भाषण करणारा विनाशास कारण होतो] . [QBR]
20. ज्या मनुष्याचे हृदय कपटी असते त्यामध्ये काही चांगले सापडत नाही, [QBR] ज्या कोणाची जीभ वक्र असते तो संकटात पडतो. [QBR]
21. जो कोणी मूर्खाला जन्म देतो, तो स्वतःवर दुःख आणतो; [QBR] जो कोणी मूर्खाचा पिता असतो त्यास आनंद नाही. [QBR]
22. आनंदी हृदय हे चांगले औषध आहे. [QBR] पण तुटलेला आत्मा हाडे शुष्क करतो. [QBR]
23. न्यायाच्या मार्गाचा दुरुपयोग करण्यासाठी, [QBR] वाईट मनुष्य गुप्तपणे लाच स्वीकारतो, [QBR]
24. ज्या कोणाला समंजसपणा असतो त्याच्या मुखापुढे ज्ञान असते, [QBR] पण मूर्खाचे डोळे पृथ्वीच्या शेवटाकडे असतात. [QBR]
25. मूर्ख मुलगा पित्याला दु:ख आहे, [QBR] आणि जिने त्यास जन्म दिला त्या स्त्रीला क्लेश असा आहे. [QBR]
26. नीतिमानाला शिक्षा करणे हे कधीही चांगले नाही; [QBR] किंवा प्रामाणिक अधिपतीस त्याच्या सरळपणामुळे मारणे चांगले नाही. [QBR]
27. जो कोणी मितभाषण करतो त्याच्याकडे ज्ञान असते, [QBR] आणि ज्याची वृत्ती शांत तो समजदार असतो. [QBR]
28. मूर्ख जर गप्प बसला तर त्यास सुध्दा शहाणा समजतात; [QBR] जेव्हा तो त्याचे मुख बंद करतो, तेव्हा त्यास बुद्धिमान समजतात. [PE]

Notes

No Verse Added

Total 31 Chapters, Current Chapter 17 of Total Chapters 31
नीतिसूत्रे 17:36
1. एखाद्या घरात पूर्ण मेजवानीची मुबलकता असून त्यामध्ये संघर्ष असला तर
त्यापेक्षा कोरड्या भाकरीचा तुकडा शांतीने खाणे उत्तम आहे.
2. शहाणा सेवक लज्जास्पद वागणाऱ्या मुलावर अधिकार चालवीन
आणि एका भावाप्रमाणे वतनाचा भागीदार होईल.
3. चांदी मुशीत आणि सोने भट्टीत तावून पाहतात,
पण परमेश्वर हृदय शुध्द करतो.
4. जो मनुष्य वाईट करतो तो दुष्ट वाणीला कान देऊन ऐकतो;
जे वाईट गोष्टी सांगतात ते लबाड लक्ष देऊन ऐकतो.
5. जो कोणी गरीबांची थट्टा करतो तो त्याच्या निर्माणकर्त्याचा अपमान करतो,
आणि जो दुसऱ्याच्या आपत्तीने आनंदित होतो त्यास शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
6. नातवंडे वृद्धांचा मुकुट आहेत,
आणि आईवडील आपल्या मुलांस वैभव आणतात.
7. उत्कृष्ट बोलणे मूर्खास शोभत नाही;
तसेच राज्यकर्त्याला खोटे ओठ किती तरी कमी शोभतात.
8. लाच देणाऱ्याच्या दृष्टीने ती जादूच्या खड्यांसारखी आहे;
जिकडे तो वळतो तिकडे तो यशस्वी होतो.
9. जो कोणी एखाद्याच्या अपराधाकडे दुर्लक्ष करतो तो प्रेम शोधतो,
पण जो कोणी गत गोष्टी घोकत बसतो तो जवळच्या मित्रास अंतरतो.
10. मूर्खाच्या मनात शंभर फटके ठसतात,
यापेक्षा निषेध बुद्धिमान मनुष्याच्या मनावर अधिक खोलवर ठसतो.
11. वाईट मनुष्य केवळ बंड करायचे शोधतो,
म्हणून क्रूर निरोपे त्याच्याविरुध्द पाठवण्यात येईल.
12. मूर्खतेत खितपत असलेल्या मूर्खाची भेट होण्यापेक्षा
जिचे पिल्ले चोरून नेली आहेत अशा अस्वलीची गाठ पडलेली बरी.
13. जो कोणी बऱ्याची फेड वाईटाने करील,
त्याच्या घरातून वाईट कधी जाणार नाही.
14. कोणीतरी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे, तसे भांडणाला सुरवात होण्यासारखे आहे,
म्हणून भांडण होण्यापूर्वीच त्यापासून दूर निघून जा.
15. जो कोणी दुष्टाला निर्दोष ठरवतो किंवा नीतिमानाला दोषी ठरवतो,
या दोन्ही लोकांचा परमेश्वरास तिटकारा आहे.
16. मूर्खाला बुद्धी नसताना तो ज्ञानाविषयी शिक्षण घेण्यासाठी पैसा का देतो,
जेव्हा त्याची ते शिकण्याची क्षमता नाही?
17. मित्र सर्व वेळी प्रीती करतो,
आणि भाऊ संकटाच्या वेळेसाठी जन्मला आहे.
18. बुद्धिहीन मनुष्य वचनानी बांधला जातो,
आणि त्याच्या शेजाऱ्याच्या कर्जाला जबाबदार होतो.
19. ज्याला भांडण प्रिय त्यास पाप प्रिय;
जो आपले दार उंच करतो तो हाड मोडण्यास कारण होतो * गर्वाचे भाषण करणारा विनाशास कारण होतो .
20. ज्या मनुष्याचे हृदय कपटी असते त्यामध्ये काही चांगले सापडत नाही,
ज्या कोणाची जीभ वक्र असते तो संकटात पडतो.
21. जो कोणी मूर्खाला जन्म देतो, तो स्वतःवर दुःख आणतो;
जो कोणी मूर्खाचा पिता असतो त्यास आनंद नाही.
22. आनंदी हृदय हे चांगले औषध आहे.
पण तुटलेला आत्मा हाडे शुष्क करतो.
23. न्यायाच्या मार्गाचा दुरुपयोग करण्यासाठी,
वाईट मनुष्य गुप्तपणे लाच स्वीकारतो,
24. ज्या कोणाला समंजसपणा असतो त्याच्या मुखापुढे ज्ञान असते,
पण मूर्खाचे डोळे पृथ्वीच्या शेवटाकडे असतात.
25. मूर्ख मुलगा पित्याला दु:ख आहे,
आणि जिने त्यास जन्म दिला त्या स्त्रीला क्लेश असा आहे.
26. नीतिमानाला शिक्षा करणे हे कधीही चांगले नाही;
किंवा प्रामाणिक अधिपतीस त्याच्या सरळपणामुळे मारणे चांगले नाही.
27. जो कोणी मितभाषण करतो त्याच्याकडे ज्ञान असते,
आणि ज्याची वृत्ती शांत तो समजदार असतो.
28. मूर्ख जर गप्प बसला तर त्यास सुध्दा शहाणा समजतात;
जेव्हा तो त्याचे मुख बंद करतो, तेव्हा त्यास बुद्धिमान समजतात. PE
Total 31 Chapters, Current Chapter 17 of Total Chapters 31
×

Alert

×

marathi Letters Keypad References