1. ज्याची वाणी कुटिल असून जो मूर्ख आहे त्याच्यापेक्षा [QBR] जो कोणी गरीब मनुष्य आपल्या सात्विकपणाने चालतो तो उत्तम आहे. [QBR]
2. ज्ञानाशिवाय इच्छा असणे सुद्धा चांगले नाही, [QBR] आणि जो कोणी उतावळ्या पायांचा आहे तो वाट चुकतो. [QBR]
3. मनुष्याचा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो, [QBR] आणि त्याचे मन परमेश्वराविरूद्ध संतापते. [QBR]
4. संपत्ती खूप मित्रांची भर घालते, [QBR] पण गरीब मनुष्याचे मित्र त्याच्यापासून वेगळे होतात. [QBR]
5. खोटा साक्षीदार शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, [QBR] आणि जो कोणी लबाड्या करतो तो सुटणार नाही. [QBR]
6. उदार मनुष्यापासून पुष्कळ लोक मदतीसाठी विचारणा करतात; [QBR] आणि जो कोणी दान देतो त्याचा प्रत्येकजण मित्र आहे. [QBR]
7. गरीब मनुष्याचे सर्व बंधू त्याचा द्वेष करतात, [QBR] तर मग त्याचे मित्र त्याच्यापासून किती तरी दूर जाणार! [QBR] तो बोलत त्यांच्या पाठोपाठ जातो पण ते निघून जातात. [QBR]
8. जो कोणी ज्ञान मिळवतो तो आपल्या जिवावर प्रेम करतो, [QBR] जो कोणी सुज्ञता सांभाळतो त्यास जे काही चांगले आहे ते मिळेल. [QBR]
9. खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, [QBR] पण जो कोणी लबाड्या करतो त्याचा नाश होईल. [QBR]
10. मूर्खाला आलिशानपणा शोभत नाही, [QBR] तसे सरदारांवर राज्य करणे गुलामाला कितीतरी कमी शोभते. [QBR]
11. बुद्धीने मनुष्य रागास मंद होतो, [QBR] आणि अपराधाकडे दुर्लक्ष करणे त्याची शोभा आहे. [QBR]
12. राजाचा राग सिंहाच्या गर्जनेसारखा आहे, [QBR] पण त्याचा उपकार गवतावर पडलेल्या दहिवरासारखे आहे. [QBR]
13. मूर्ख मुलगा आपल्या वडिलांना अरिष्टासारखा आहे; [QBR] आणि भांडखोर पत्नी सतत गळणाऱ्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे. [QBR]
14. घर व संपत्ती आईवडीलांकडून आलेले वतन आहे, [QBR] पण समंजस पत्नी परमेश्वरापासून आहे. [QBR]
15. आळशीपणा आपणाला गाढ झोपेत टाकतो, [QBR] पण ज्याला काम करण्याची इच्छा नाही तो उपाशी जातो. [QBR]
16. जो कोणी आज्ञा पाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, [QBR] पण जो मनुष्य आपल्या मार्गाविषयी विचार करत नाही तो मरेल. [QBR]
17. जो कोणी गरीबावर दया करतो तो परमेश्वरास उसने देतो, [QBR] आणि तो त्याने जे काही केले त्याची परतफेड करील. [QBR]
18. काही आशा असेल तर आपल्या मुलाला शिक्षा कर, [QBR] आणि त्याच्या मरणाची तुझ्या जिवाला काळजी वाटू देऊ नको. [QBR]
19. रागीट मनुष्याला दंड दिला पाहिजे; [QBR] जर तुम्ही त्यास सोडवले, तर तुम्हास दुसऱ्या वेळेसही सोडवावे लागेल. [QBR]
20. सल्ला ऐक आणि शिक्षण स्वीकार, [QBR] म्हणजे तू आपल्या आयुष्याच्या शेवटी सुज्ञान होशील. [QBR]
21. मनुष्याच्या मनात बऱ्याच योजना येतात, [QBR] पण परमेश्वराचे उद्देश स्थिर राहतील. [QBR]
22. प्रामाणिकपणा ही मनुष्याची इच्छा असते; [QBR] आणि खोटे बोलणाऱ्यापेक्षा गरीब चांगला. [QBR]
23. परमेश्वरास आदर द्या तो त्यास पात्र आहे; [QBR] आणि तो जीवनाकडे नेतो, [QBR] आणि ज्या कोणाकडे ते आहे तो समाधानी आहे, [QBR] आणि त्याची संकटांनी हानी होणार नाही. [QBR]
24. आळशी आपला हात ताटात घालतो, [QBR] आणि तो पुन्हा आपल्या तोंडाकडेसुद्धा घेऊन जात नाही. [QBR]
25. निंदकाला तडाखा मार म्हणजे भोळा समंजस होईल, [QBR] बुद्धिमानाला शब्दाचा मारा कर म्हणजे त्यास ज्ञान कळेल. [QBR]
26. जो कोणी आपल्या पित्याला लुटतो, व आईला हाकलून लावतो, [QBR] तो मुलगा लाज आणि दोष आणणारा आहे. [QBR]
27. माझ्या मुला, जर तू सूचना ऐकण्याचे थांबवले [QBR] तर ज्ञानाच्या वचनापासून भटकशील. [QBR]
28. भ्रष्ट साक्षीदार न्यायाची थट्टा करतो [QBR] आणि वाईटाचे मुख अन्याय गिळून टाकते. [QBR]
29. निंदकासाठी धिक्कार [QBR] आणि मूर्खाच्या पाठीसाठी फटके तयार आहेत. [PE]