1. द्राक्षरस चेष्टा करणारा आहे आणि मादक पेय भांडखोर आहे; [QBR] पिण्याने झिंगणारा शहाणा नाही. [QBR]
2. राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो; [QBR] जो त्यास राग आणतो तो आपल्याच जीवाविरूद्ध पाप करतो. [QBR]
3. जो कोणी भांडण टाळतो त्यास आदर आहे, [QBR] पण प्रत्येक मूर्ख वादविवादात उडी मारतो. [QBR]
4. आळशी मनुष्य हिवाळा लागल्यामुळे नांगरीत नाही, [QBR] तो हंगामाच्या वेळी पिक शोधेल पण त्यास काहीही मिळणार नाही. [QBR]
5. मनुष्याच्या मनातील योजना खोल पाण्यासारख्या असतात; [QBR] पण समजदार मनुष्य त्या बाहेर काढतो. [QBR]
6. बरेच व्यक्ती विश्वासू असल्याची घोषणा करतात, [QBR] पण जो कोणी विश्वासू आहे त्या व्यक्तीस कोण शोधून काढेल? [QBR] पण खरोखरच असा व्यक्ती सापडणे कठीण असते. [QBR]
7. जो कोणी मनुष्य चांगले करतो त्याच्या प्रामाणिकतेने चालतो, [QBR] आणि त्याच्या मागे त्याची मुले त्यास अनुसरतात आणि ते सुखी होतात. [QBR]
8. जेव्हा राजा राजासनावर बसून न्यायनिवाड्याचे कार्य करतो, [QBR] तो आपल्या डोळ्यांनी सर्व वाईट गोष्टी उडवून टाकतो. [QBR]
9. मी आपले हृदय शुद्ध केले आहे, [QBR] मी आपल्या पापापासून मोकळा झालो आहे असे कोण म्हणू शकेल? [QBR]
10. भिन्नभिन्न अशी खोटी वजने आणि असमान मापे, [QBR] या दोन्हींचा परमेश्वरास तिरस्कार आहे. [QBR]
11. तरुणसुध्दा आपल्या कृतीने [QBR] आपली वर्तणूक शुद्ध आणि सरळ आहे की नाही ते दाखवतो. [QBR]
12. ऐकणारे कान आणि बघणारे डोळे, [QBR] हे दोन्ही परमेश्वरानेच केले आहेत. [QBR]
13. झोपेची आवड धरू नकोस, धरशील तर दरिद्री होशील; [QBR] आपले डोळे उघड आणि तुला भरपूर खायला मिळेल. [QBR]
14. विकत घेणारा म्हणतो, वाईट! वाईट! [QBR] परंतु जेव्हा तो तेथून निघून जातो तो फुशारकी मारतो. [QBR]
15. तेथे सोने आहे आणि विपुल किंमती खडे आहेत, [QBR] पण ज्ञानमय वाणी मोलवान रत्न आहेत. [QBR]
16. जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे, [QBR] जेव्हा तो परक्यास जामीन झाला आहे म्हणून त्यास तारणादाखल ठेव. [QBR]
17. कपटाची भाकर गोड लागते, [QBR] पण त्यानंतर त्याचे तोंड सर्व वाळूंनी भरेल. [QBR]
18. सल्ल्याद्वारे योजना प्रस्थापित होतात, [QBR] म्हणून केवळ ज्ञानाच्या मार्गदर्शनाने लढाई चालू कर. [QBR]
19. लावालावी करणारा गुप्त गोष्टी प्रगट करतो, [QBR] म्हणून बडबड करणाऱ्यांची संगत धरू नकोस. [QBR]
20. जर एखादा मनुष्य आपल्या आईला किंवा वडिलांना शाप देईल, [QBR] तर त्याचा दीप अंधारात विझून जाईल. [QBR]
21. सुरवातीला उतावळीने मिळवलेल्या संपत्तीचा [QBR] शेवट आशीर्वादित होणार नाही. [QBR]
22. मी चुकीच्या बदल्यात परतफेड करीन असे म्हणू नकोस, [QBR] परमेश्वराची वाट पाहा आणि तो तुझे रक्षण करील. [QBR]
23. असमान वजनाचा परमेश्वरास तिरस्कार आहे [QBR] आणि अप्रामाणिक तराजू चांगले नाही. [QBR]
24. मनुष्याच्या पावलास परमेश्वर वाट दाखवतो. [QBR] तर कोणत्या मार्गाने जावे हे त्यास कसे कळेल? [QBR]
25. हे पवित्र आहे असे उतावळीने म्हणणे व असला नवस केल्यावर [QBR] मग विचार करीत बसणे हे मनुष्याने पाशात पडणे होय. [QBR]
26. सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून टाकतो, [QBR] आणि मळणी करण्याचे चक्र त्यांच्यावर फिरवतो. [QBR]
27. मनुष्याचा आत्मा परमेश्वराचा दीप होय, [QBR] तो त्याच्या अंतर्यामाच्या सर्व भागांचा शोध घेतो. [QBR]
28. कराराचा प्रामाणिपणा आणि विश्वसनियता राजाचे रक्षण करतात, [QBR] तो प्रेमाने राजासन बळकट करतो. [QBR]
29. तरुण मनुष्याचे वैभव त्याचे बळ आहे. [QBR] आणि पिकलेले केस वृद्धाचे सौंदर्य आहे. [QBR]
30. जखम करणारे घाय आणि वर्मी लागणारे फटके [QBR] दुष्टतेचे क्षालन करतात. [PE]