1. [QS]द्राक्षरस चेष्टा करणारा आहे आणि मादक पेय भांडखोर आहे; [QE][QS]पिण्याने झिंगणारा शहाणा नाही. [QE]
2. [QS]राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो; [QE][QS]जो त्यास राग आणतो तो आपल्याच जीवाविरूद्ध पाप करतो. [QE]
3. [QS]जो कोणी भांडण टाळतो त्यास आदर आहे, [QE][QS]पण प्रत्येक मूर्ख वादविवादात उडी मारतो. [QE]
4. [QS]आळशी मनुष्य हिवाळा लागल्यामुळे नांगरीत नाही, [QE][QS]तो हंगामाच्या वेळी पिक शोधेल पण त्यास काहीही मिळणार नाही. [QE]
5. [QS]मनुष्याच्या मनातील योजना खोल पाण्यासारख्या असतात; [QE][QS]पण समजदार मनुष्य त्या बाहेर काढतो. [QE]
6. [QS]बरेच व्यक्ती विश्वासू असल्याची घोषणा करतात, [QE][QS]पण जो कोणी विश्वासू आहे त्या व्यक्तीस कोण शोधून काढेल? [QE][QS]पण खरोखरच असा व्यक्ती सापडणे कठीण असते. [QE]
7. [QS]जो कोणी मनुष्य चांगले करतो त्याच्या प्रामाणिकतेने चालतो, [QE][QS]आणि त्याच्या मागे त्याची मुले त्यास अनुसरतात आणि ते सुखी होतात. [QE]
8. [QS]जेव्हा राजा राजासनावर बसून न्यायनिवाड्याचे कार्य करतो, [QE][QS]तो आपल्या डोळ्यांनी सर्व वाईट गोष्टी उडवून टाकतो. [QE]
9. [QS]मी आपले हृदय शुद्ध केले आहे, [QE][QS]मी आपल्या पापापासून मोकळा झालो आहे असे कोण म्हणू शकेल? [QE]
10. [QS]भिन्नभिन्न अशी खोटी वजने आणि असमान मापे, [QE][QS]या दोन्हींचा परमेश्वरास तिरस्कार आहे. [QE]
11. [QS]तरुणसुध्दा आपल्या कृतीने [QE][QS]आपली वर्तणूक शुद्ध आणि सरळ आहे की नाही ते दाखवतो. [QE]
12. [QS]ऐकणारे कान आणि बघणारे डोळे, [QE][QS]हे दोन्ही परमेश्वरानेच केले आहेत. [QE]
13. [QS]झोपेची आवड धरू नकोस, धरशील तर दरिद्री होशील; [QE][QS]आपले डोळे उघड आणि तुला भरपूर खायला मिळेल. [QE]
14. [QS]विकत घेणारा म्हणतो, वाईट! वाईट! [QE][QS]परंतु जेव्हा तो तेथून निघून जातो तो फुशारकी मारतो. [QE]
15. [QS]तेथे सोने आहे आणि विपुल किंमती खडे आहेत, [QE][QS]पण ज्ञानमय वाणी मोलवान रत्न आहेत. [QE]
16. [QS]जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे, [QE][QS]जेव्हा तो परक्यास जामीन झाला आहे म्हणून त्यास तारणादाखल ठेव. [QE]
17. [QS]कपटाची भाकर गोड लागते, [QE][QS]पण त्यानंतर त्याचे तोंड सर्व वाळूंनी भरेल. [QE]
18. [QS]सल्ल्याद्वारे योजना प्रस्थापित होतात, [QE][QS]म्हणून केवळ ज्ञानाच्या मार्गदर्शनाने लढाई चालू कर. [QE]
19. [QS]लावालावी करणारा गुप्त गोष्टी प्रगट करतो, [QE][QS]म्हणून बडबड करणाऱ्यांची संगत धरू नकोस. [QE]
20. [QS]जर एखादा मनुष्य आपल्या आईला किंवा वडिलांना शाप देईल, [QE][QS]तर त्याचा दीप अंधारात विझून जाईल. [QE]
21. [QS]सुरवातीला उतावळीने मिळवलेल्या संपत्तीचा [QE][QS]शेवट आशीर्वादित होणार नाही. [QE]
22. [QS]मी चुकीच्या बदल्यात परतफेड करीन असे म्हणू नकोस, [QE][QS]परमेश्वराची वाट पाहा आणि तो तुझे रक्षण करील. [QE]
23. [QS]असमान वजनाचा परमेश्वरास तिरस्कार आहे [QE][QS]आणि अप्रामाणिक तराजू चांगले नाही. [QE]
24. [QS]मनुष्याच्या पावलास परमेश्वर वाट दाखवतो. [QE][QS]तर कोणत्या मार्गाने जावे हे त्यास कसे कळेल? [QE]
25. [QS]हे पवित्र आहे असे उतावळीने म्हणणे व असला नवस केल्यावर [QE][QS]मग विचार करीत बसणे हे मनुष्याने पाशात पडणे होय. [QE]
26. [QS]सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून टाकतो, [QE][QS]आणि मळणी करण्याचे चक्र त्यांच्यावर फिरवतो. [QE]
27. [QS]मनुष्याचा आत्मा परमेश्वराचा दीप होय, [QE][QS]तो त्याच्या अंतर्यामाच्या सर्व भागांचा शोध घेतो. [QE]
28. [QS]कराराचा प्रामाणिपणा आणि विश्वसनियता राजाचे रक्षण करतात, [QE][QS]तो प्रेमाने राजासन बळकट करतो. [QE]
29. [QS]तरुण मनुष्याचे वैभव त्याचे बळ आहे. [QE][QS]आणि पिकलेले केस वृद्धाचे सौंदर्य आहे. [QE]
30. [QS]जखम करणारे घाय आणि वर्मी लागणारे फटके [QE][QS]दुष्टतेचे क्षालन करतात. [QE]