1. [QS]राजाचे मन पाण्याच्या प्रवाहासारखे परमेश्वराच्या हातात आहे; [QE][QS]तो त्यास वाटेल तेथे वळवतो. [QE]
2. [QS]प्रत्येक मनुष्याचे मार्ग त्याच्या दृष्टीने योग्य असतात, [QE][QS]परंतु परमेश्वर अंतःकरणे तोलून पाहतो. [QE]
3. [QS]योग्य व न्याय करणे हे यज्ञापेक्षा [QE][QS]परमेश्वरास अधिक मान्य आहेत. [QE]
4. [QS]घमेंडखोर दृष्टी व गर्विष्ठ मन [QE][QS]दुर्जनांच्या शेतातील उपज हे पाप उत्पन्न करतात. [QE]
5. [QS]परीश्रमपूर्वक केलेल्या योजनांमुळे भरभराट होते, [QE][QS]परंतु जो घाईघाईने कृती करतो तो केवळ दरिद्री होतो. [QE]
6. [QS]लबाड जिव्हेने मिळवलेली संपत्ती [QE][QS]ही वाफेसारखी क्षणभंगुर आहे ती मरण शोधते. [QE]
7. [QS]दुष्टांचा बलात्कार त्यांना झाडून टाकील, [QE][QS]कारण ते न्याय करण्याचे नाकारतात. [QE]
8. [QS]अपराधी मनुष्याचा मार्ग वाकडा असतो, [QE][QS]पण जो शुद्ध आहे तो योग्य करतो. [QE]
9. [QS]भांडखोर पत्नीबरोबर मोठ्या घरात राहाण्यापेक्षा, [QE][QS]धाब्याच्या कोपऱ्यात राहणे अधिक चांगले. [QE]
10. [QS]दुष्टाचा जीव वाईटाची हाव धरतो; [QE][QS]त्याच्या शेजाऱ्याला तो दया दाखवत नाही. [QE]
11. [QS]जेव्हा निंदकास शासन होते तेव्हा अज्ञानी शहाणे होतात; [QE][QS]आणि जेव्हा सुज्ञास शिक्षण मिळते तेव्हा त्याच्या ज्ञानात वाढ होते. [QE]
12. [QS]नीतिमान दुष्टाच्या घराकडे लक्ष लावतो, [QE][QS]तो दुष्टांचा नाश करण्यासाठी त्यांना उलथून टाकतो. [QE]
13. [QS]जो कोणी गरिबाची आरोळी ऐकत नाही, [QE][QS]तोही आरोळी करील, पण कोणी ऐकणार नाही. [QE]
14. [QS]गुप्तपणे दिलेली देणगी राग शांत करते, [QE][QS]आणि दडवलेली देणगी तीव्र कोप दूर करते. [QE]
15. [QS]योग्य न्यायाने नीतिमानाला आनंद होतो. [QE][QS]पण तोच दुष्कर्म करणाऱ्यांवर फार मोठी भीती आणतो. [QE]
16. [QS]जो कोणी ज्ञानाच्या मार्गापासून भटकतो, [QE][QS]त्यास मरण पावलेल्यांच्या मंडळीत विसावा मिळेल. [QE]
17. [QS]ज्याला ख्यालीखुशाली प्रिय आहे तो दरिद्री होतो; [QE][QS]ज्याला द्राक्षरस आणि तेल प्रिय आहे तो श्रीमंत होणार नाही. [QE]
18. [QS]जो कोणी चांगले करतो त्याची खंडणी दुर्जन आहे, [QE][QS]आणि सरळांचा मोबदला विश्वासघातकी असतो. [QE]
19. [QS]भांडखोर आणि खूप तक्रार करून अशांती निर्माण करणाऱ्या पत्नीबरोबर राहाण्यापेक्षा [QE][QS]वाळवंटात राहाणे अधिक चांगले. [QE]
20. [QS]सुज्ञाच्या घरात मोलवान खजिना आणि तेल आहेत, [QE][QS]पण मूर्ख मनुष्य ते वाया घालवतो. [QE]
21. [QS]जो कोणी नीतिमत्ता आणि दया करतो, [QE][QS]त्यास आयुष्य, उन्नती आणि मान मिळेल. [QE]
22. [QS]सुज्ञ मनुष्य बलवानांच्या नगराविरूद्ध चढतो, [QE][QS]आणि तो त्यांच्या संरक्षणाचा आश्रयदुर्ग पाडून टाकतो. [QE]
23. [QS]जो कोणी आपले तोंड व जीभ सांभाळतो, [QE][QS]तो संकटापासून आपला जीव वाचवतो. [QE]
24. [QS]गर्विष्ठ व घमेंडखोर मनुष्यास उद्दाम असे नाव आहे. [QE][QS]तो गर्वाने उद्धट कृती करतो. [QE]
25. [QS]आळशाची वासना त्यास मारून टाकते; [QE][QS]त्याचे हात काम करण्यास नकार देतात. [QE]
26. [QS]तो सर्व दिवस हाव आणि अधिक हाव धरतो, [QE][QS]परंतु नीतिमान देतो आणि मागे धरून ठेवत नाही. [QE]
27. [QS]दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते, [QE][QS]तर मग तो यज्ञ दुष्ट हेतूने आणतो ते किती अधिक वीट असे आहे. [QE]
28. [QS]खोटा साक्षीदार नाश पावेल, [QE][QS]पण जो कोणी ऐकतो त्याप्रमाणे सर्व वेळ तसे बोलतो. [QE]
29. [QS]दुष्ट मनुष्य आपले मुख धीट करतो, [QE][QS]पण सरळ मनुष्य आपल्या मार्गाचा नीट विचार करतो. [QE]
30. [QS]परमेश्वराविरूद्ध शहाणपण, बुद्धि [QE][QS]किंवा युक्ती ही मुळीच उभी राहू शकत नाहीत. [QE]
31. [QS]लढाईच्या दिवसासाठी घोडा तयार करतात, [QE][QS]पण तारण परमेश्वराकडून आहे. [QE]