1. {नीतिसूस्त्रांची तत्त्वे आणि काही तुलना} PS ही शलमोनाची आणखी काही नीतिसूत्रे आहेत. यहूदाचा राजा हिज्कीया याच्या मनुष्यांनी याचा नक्कल केली.
|
2. काही गोष्टी गुपित ठेवणे यामध्ये देवाचे गौरव आहे,
पण त्या गोष्टी शोधून काढणे यामध्ये राजाचे गौरव आहे. |
5. त्याचप्रमाणे राजाच्या सानिध्यापासून दुष्टांना दूर कर
म्हणजे त्याचे राजासन जे काही चांगले आहे त्यांनी भक्कम होईल. |
7. कारण तुझ्यासमोर येणाऱ्या अधिपतीपुढे
तुझा पाणउतारा करण्यापेक्षा, “वर येऊन बस” असे तुला म्हणावे हे अधिक चांगले आहे. |
8. फिर्याद करायला जाण्याची घाई करू नको.
ती तू केलीस तर शेवटी तुझ्या शेजाऱ्याने तुला लज्जित केले तर परिणामी काय करू असे तुला होऊन जाईल. |
9. तुमचे आणि तुमच्या शेजाऱ्याचे वाद आपसात चर्चा करून मिटव,
आणि दुसऱ्याच्या गुप्त गोष्टी उघड करू नको. |
12. जसे सोन्याची अंगठी किंवा दागिना शुद्ध सोन्यापासून करतात,
तसाच दोष देणारा सुज्ञ ऐकणाऱ्याच्या कानांना आहे. |
13. कापणीच्या समयी * उन्हाळ्यात जसे बर्फाचे पेय,
तसा विश्वासू दूत त्यास पाठवणाऱ्याला आहे कारण तो आपल्या धन्याचा जीव गार करतो. |
14. जे लोक भेटी देण्याचे वचन देतात पण देत मात्र कधीच नाहीत,
ते पाऊस न आणणारे ढग आणि वारा यांसारखे आहेत. |
18. जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देतो.
जसे युद्घात सोटा, तलवार किंवा तीक्ष्ण बाण वापरतात यांसारखा तो आहे. |
19. संकटकाळी अविश्वासणाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे,
हे तुटलेल्या दाताने खाणे किंवा लचकलेल्या पायाने चालणे ह्यासारखे आहे. |
20. जो कोणी दु:खी हृदयापुढे गीत गातो,
तो थंड हवामानात अंगावरील कपडे काढून टाकण्यासारखा, आणि सोड्यावर टाकलेल्या शिरक्यासारखा आहे. |
21. तुमचा शत्रू जर भुकेला असला तर त्यास खायला अन्न दे
आणि तो जर तान्हेला असला तर त्यास प्यायला पाणी दे; |
22. असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू जळत्या निखाऱ्याची रास ठेवशील,
आणि परमेश्वर तुम्हास त्याचे प्रतिपळ देईल. |