1. {#1नीतिसूस्त्रांची तत्त्वे आणि काही तुलना } [QS]ही शलमोनाची आणखी काही नीतिसूत्रे आहेत. यहूदाचा राजा हिज्कीया याच्या मनुष्यांनी याचा नक्कल केली. [QE]
2. [QS]काही गोष्टी गुपित ठेवणे यामध्ये देवाचे गौरव आहे, [QE][QS]पण त्या गोष्टी शोधून काढणे यामध्ये राजाचे गौरव आहे. [QE]
3. [QS]जसे उंचीमुळे आकाशाचा आणि खोलीमुळे पृथ्वीचा, [QE][QS]तसे राजाचे मन गूढ आहे. [QE]
4. [QS]रुप्यातला गाळ काढून टाक, [QE][QS]आणि धातू कामगार रुप्याचा उपयोग त्याच्या कामासाठी करू शकेल. [QE]
5. [QS]त्याचप्रमाणे राजाच्या सानिध्यापासून दुष्टांना दूर कर [QE][QS]म्हणजे त्याचे राजासन जे काही चांगले आहे त्यांनी भक्कम होईल. [QE]
6. [QS]राजासमोर स्वत:ची प्रतिष्ठा मिरवू नको. [QE][QS]आणि थोर अधिकाऱ्यांच्या जागी उभा राहू नको. [QE]
7. [QS]कारण तुझ्यासमोर येणाऱ्या अधिपतीपुढे [QE][QS]तुझा पाणउतारा करण्यापेक्षा, [QE][QS]“वर येऊन बस” असे तुला म्हणावे हे अधिक चांगले आहे. [QE]
8. [QS]फिर्याद करायला जाण्याची घाई करू नको. [QE][QS]ती तू केलीस तर शेवटी तुझ्या शेजाऱ्याने तुला लज्जित केले [QE][QS]तर परिणामी काय करू असे तुला होऊन जाईल. [QE]
9. [QS]तुमचे आणि तुमच्या शेजाऱ्याचे वाद आपसात चर्चा करून मिटव, [QE][QS]आणि दुसऱ्याच्या गुप्त गोष्टी उघड करू नको. [QE]
10. [QS]केली तर कदाचित ऐकणारा तुझी अप्रतिष्ठा करील, [QE][QS]व हे दूषण तुला लागून राहील. [QE]
11. [QS]जसे रुपेरी तबकात सोन्याचे सफरचंद, [QE][QS]तसे निवडक चांगले शब्द बोलणे. [QE]
12. [QS]जसे सोन्याची अंगठी किंवा दागिना शुद्ध सोन्यापासून करतात, [QE][QS]तसाच दोष देणारा सुज्ञ ऐकणाऱ्याच्या कानांना आहे. [QE]
13. [QS]कापणीच्या समयी[* उन्हाळ्यात ] जसे बर्फाचे पेय, [QE][QS]तसा विश्वासू दूत त्यास पाठवणाऱ्याला आहे [QE][QS]कारण तो आपल्या धन्याचा जीव गार करतो. [QE]
14. [QS]जे लोक भेटी देण्याचे वचन देतात पण देत मात्र कधीच नाहीत, [QE][QS]ते पाऊस न आणणारे ढग आणि वारा यांसारखे आहेत. [QE]
15. [QS]धीर धरल्याने राज्य करणाऱ्याचे मन वळते, [QE][QS]आणि मऊ जीभ हाड फोडते. [QE]
16. [QS]जर तुला मध सापडला तर तुला पुरे इतकाच खा; [QE][QS]जास्त खाल्ला तर तू ओकून टाकशील. [QE]
17. [QS]शेजाऱ्याच्या घरात सारखे जाऊ नका, [QE][QS]जर गेलात तर तो कंटाळून तुमचा तिरस्कार करायला लागेल. [QE]
18. [QS]जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देतो. [QE][QS]जसे युद्घात सोटा, तलवार किंवा तीक्ष्ण बाण वापरतात यांसारखा तो आहे. [QE]
19. [QS]संकटकाळी अविश्वासणाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे, [QE][QS]हे तुटलेल्या दाताने खाणे किंवा लचकलेल्या पायाने चालणे ह्यासारखे आहे. [QE]
20. [QS]जो कोणी दु:खी हृदयापुढे गीत गातो, [QE][QS]तो थंड हवामानात अंगावरील कपडे काढून टाकण्यासारखा, [QE][QS]आणि सोड्यावर टाकलेल्या शिरक्यासारखा आहे. [QE]
21. [QS]तुमचा शत्रू जर भुकेला असला तर त्यास खायला अन्न दे [QE][QS]आणि तो जर तान्हेला असला तर त्यास प्यायला पाणी दे; [QE]
22. [QS]असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू जळत्या निखाऱ्याची रास ठेवशील, [QE][QS]आणि परमेश्वर तुम्हास त्याचे प्रतिपळ देईल. [QE]
23. [QS]उत्तरेकडचा वारा पाऊस आणतो; [QE][QS]त्याचप्रमाणे जो कोणी गुप्त गोष्टी सांगतो तो चेहरा क्रोधाविष्ट करतो. [QE]
24. [QS]भांडखोर पत्नीबरोबर मोठ्या घरात राहण्यापेक्षा, [QE][QS]धाब्याच्या कोपऱ्यात राहाणे अधिक चांगले आहे. [QE]
25. [QS]तहानलेल्या जिवाला थंडगार पाणी, [QE][QS]तसे दूर देशातून आलेले चांगले वर्तमान आहे. [QE]
26. [QS]जसा घाणेरडा झालेला झरा किंवा नासलेले कारंजे, [QE][QS]तसा दुष्टाच्यासमोर भ्रष्ट झालेला नीतिमान आहे. [QE]
27. [QS]खूप मध खाणे चांगले नाही, [QE][QS]सन्मानावर सन्मान शोधणे हे तसेच आहे. [QE]
28. [QS]जर मनुष्य स्वत:वर ताबा मिळवू शकत नसेल, [QE][QS]तर तो तटबंदी मोडून पडलेल्या शहरासारखा आहे. [QE]