2. तुझ्या स्वतःच्या मुखाने नव्हे तर दुसऱ्याने तुझी स्तुती करावी,
तुझ्याच ओठांनी नव्हे तर परक्याने तुझी स्तुती करावी, |
10. स्वतःच्या आणि आपल्या वडिलांच्या मित्रांना सोडू नकोस;
आणि आपल्या संकटाच्या दिवशी भावाच्या घरी जाऊ नको. दूरवरच्या आपल्या भावाकडे जाण्यापेक्षा जवळचा शेजारी चांगला आहे. |
11. माझ्या मुला, शहाणा हो आणि माझे मन आनंदीत कर,
नंतर जो कोणी माझ्यावर टीका करेल त्यास मी उत्तर देईन. |
12. शहाणा मनुष्य संकटाला पाहतो आणि स्वतःला लपवतो,
पण भोळेपुढे जातात आणि त्यांना त्याची किंमत द्यावी लागते. |
13. जो परक्याच्या कर्जासाठी पैसे ठेवून
जामीन झाला आहे त्याचे वस्त्र ठेवून घे; पण जेव्हा तो व्यभिचारी स्त्रीसाठी जामीन होतो त्यास तारणादाखल ठेव. |
16. तिला ताब्यात ठेवणे म्हणजे वाऱ्याला ताब्यात ठेवण्यासारखे आहे,
किंवा आपल्या हातात तेल पकडून ठेवण्याचा प्रयत्न करणे. |
18. जो कोणी अंजिराच्या झाडाची निगा राखतो तो त्याचे फळ खाईल.
आणि तसेच जो कोणी आपल्या धन्याचे रक्षण करतो त्याचा मान होईल. |
19. जसे पाण्यात मनुष्याच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब जशाचे तसे दिसते,
तसेच मनुष्याचे हृदय मनुष्याचे प्रतिबिंब दाखविते. |
20. मृतलोक आणि विनाशस्थान ही कधीही तृप्त होत नाही.
त्याचप्रमाणे मनुष्याचे डोळे * इच्छा कधी तृप्त होत नाही. |
22. जरी तू मूर्खाला कुटलेल्या धान्याबरोबर उखळात घालून मुसळाने कुटले,
तरी त्याची मूर्खता त्याच्यापासून जाणार नाही. |
23. तू आपल्या शेरडामेंढरांना एकत्र जमून त्यांची स्थिती जाणून खात्री कर.
आणि आपल्या कळपाकडे नीट लक्ष दे. |
27. बकरीचे दूध तुझ्या खाण्यासाठी व तुझ्या घरच्यांच्या खाण्यासाठी,
आणि तुझ्या दासींच्या पोषणापुरते तुझ्याजवळ आहे. PE |