1. [QS]जर एखाद्या मनुष्यावर खूप दोष असूनही, जो आपली मान ताठ करतो, [QE][QS]तो अचानक तुटतो आणि त्यावर काही उपाय चालत नाही. [QE]
2. [QS]जेव्हा नीतिमानाची वाढ होते, लोक आनंदित होतात, [QE][QS]पण जेव्हा दुर्जन अधिकार चालवतात तेव्हा लोक शोक करतात. [QE]
3. [QS]ज्या कोणाला ज्ञानाची आवड आहे तो आपल्या पित्याला आनंदित करतो, [QE][QS]पण जो कोणी वेश्येशी सोबत करतो तर तो आपल्या संपत्तीचा नाश करतो. [QE]
4. [QS]राजा न्यायाने देश दृढ करतो, [QE][QS]पण जो कोणी लाचेची मागणी करतो तो त्याचे वाटोळे करतो. [QE]
5. [QS]जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याची फाजील स्तुती करतो, [QE][QS]तो त्याच्या पावलासाठी जाळे पसरतो. [QE]
6. [QS]दुष्ट मनुष्य आपल्या स्वतःच्या पापाने पाशात पडतो, [QE][QS]पण नीतिमान गाणे गाऊन आनंदित होतो. [QE]
7. [QS]नीतिमान गरिबांच्या वादासाठी विनंती करतो; [QE][QS]दुर्जनाला तो समजण्याची बुद्धी नसते. [QE]
8. [QS]थट्टा करणारे शहराला पेटवतात; [QE][QS]पण सुज्ञजन क्रोधापासून दूर निघून जातात. [QE]
9. [QS]जर सुज्ञ मनुष्याचा मूर्खाशी वाद असला तर, [QE][QS]मुर्ख रागावला किंवा हसला तरी काही स्वस्थता नसते. [QE]
10. [QS]रक्तपिपासू सात्विकाचा द्वेष करतात, [QE][QS]आणि सरळ मनुष्यास ठार मारण्यासाठी ते त्याचा शोध घेतात. [QE]
11. [QS]मूर्ख आपल्या मनातील सारा राग प्रगट करतो, [QE][QS]पण शहाणा मनुष्य तो आवरून धरतो आणि शांत राहतो. [QE]
12. [QS]जर अधिकाऱ्याने खोट्या गोष्टींकडे लक्ष दिले, [QE][QS]तर त्याचे सगळे अधिकारी वाईट होतात. [QE]
13. [QS]गरीब मनुष्य आणि जुलूम करणारा या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे; [QE][QS]परमेश्वर दोघांच्याही डोळ्यांना दृष्टी देतो. [QE]
14. [QS]जर राजाने गरीबांचा न्याय सत्याने केला, [QE][QS]तर त्याचे राजासन सर्वकाळ स्थापित होईल. [QE]
15. [QS]छडी आणि सुबोध ज्ञान देतात, [QE][QS]पण मोकळे सोडलेले मूल आपल्या आईला लाज आणते. [QE]
16. [QS]जेव्हा दुष्ट वाढतात, तेव्हा अपराध वाढतात; [QE][QS]पण धार्मिकांना त्यांचे वतन पाहावयास मिळते. [QE]
17. [QS]आपल्या मुलाला शिस्त लाव आणि तो तुला विसावा देईल [QE][QS]आणि तो तुझा जीव आनंदित करील. [QE]
18. [QS]जेथे कोठे भविष्यसूचक दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, [QE][QS]पण जो कोणी नियम पाळतो तो सुखी होतो. [QE]
19. [QS]दास शब्दाने सुधारत नाही, [QE][QS]कारण जरी त्यास समजले तरी तो प्रतिसाद देणार नाही. [QE]
20. [QS]कोणी आपल्या बोलण्यात उतावळा आहे अशा मनुष्यास पाहतोस काय? [QE][QS]तर त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा आहे. [QE]
21. [QS]जर कोणी आपल्या दासास बालपणापासून लाडाने वाढवले [QE][QS]तर त्याच्या शेवटी तो त्रासदायकच होईल. [QE]
22. [QS]रागावलेला मनुष्य संकटे आणतो; [QE][QS]आणि क्रोधी मनुष्याकडून पुष्कळ अपराध घडतात. [QE]
23. [QS]गर्व मनुष्यास खाली आणतो, [QE][QS]पण जो कोणी विनम्र आत्म्याचा असतो त्याचा आदर होतो. [QE]
24. [QS]जो कोणी चोराचा भागीदार होतो, तो स्वतःचाच शत्रू आहे; [QE][QS]ते शपथेखाली ठेवले जातात आणि ते काहीच बोलू शकत नाही. [QE]
25. [QS]मनुष्याची भीती पाशरूप होते, [QE][QS]पण जो कोणी परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो सुरक्षित राहतो. [QE]
26. [QS]पुष्कळजन अधिपतीची मर्जी संपादण्याचा शोध करतात, [QE][QS]पण परमेश्वरच लोकांचा न्याय करतो. [QE]
27. [QS]अप्रामाणीक मनुष्याचा धार्मिकाला वीट येतो; [QE][QS]आणि सरळमार्गी मनुष्याचा दुष्टाला वीट येतो. [QE]