मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
नीतिसूत्रे
1. {#1आज्ञांकितपणाचा आदेश } [QS]माझ्या मुला, माझ्या आज्ञा विसरु नकोस, [QE][QS]आणि माझी शिकवण तुझ्या हृदयात ठेव; [QE]
2. [QS]कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी [QE][QS]आणि शांती ही तुला अधिक लाभतील. [QE]
3. [QS]विश्वासाचा करार आणि प्रामाणिकपणा तुला कधीही न सोडो, [QE][QS]त्यांना एकत्र करून आपल्या गळ्यात बांध, [QE][QS]ते आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव. [QE]
4. [QS]म्हणजे तुला देवाच्या व मनुष्याच्या [QE][QS]दृष्टीने कृपा व सुकीर्ती ही मिळतील. [QE]
5. [QS]तू आपल्या सर्व अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव. [QE][QS]आणि तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस; [QE]
6. [QS]तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव, [QE][QS]आणि तो तुझ्या वाटा सरळ करील. [QE]
7. [QS]तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नकोस; [QE][QS]परमेश्वराचे भय धर आणि वाईटापासून दूर राहा. [QE]
8. [QS]हे तुझ्या शरीराला आरोग्य [QE][QS]आणि तुझ्या हाडांना सत्व असे होईल. [QE]
9. [QS]तुझ्या संपत्तीने आणि [QE][QS]आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वरास मान दे, [QE]
10. [QS]त्याने तुझी कोठारे समृद्धीने भरतील [QE][QS]आणि तुझी पिंपे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. [QE]
11. [QS]माझ्या मुला, परमेश्वराची शिस्त तुच्छ मानू नको, [QE][QS]आणि त्याच्या शासनाचा द्वेष करू नकोस, [QE]
12. [QS]जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला शिक्षा करतो, [QE][QS]तसा परमेश्वर ज्यांच्यावर प्रीती करतो त्यांनाच तो शिस्त लावतो. [QE]
13. [QS]ज्या कोणाला ज्ञान सापडले तो सुखी आहे, [QE][QS]त्यास ग्रहणशक्ती सुद्धा प्राप्त होते. [QE]
14. [QS]ज्ञानापासून जी काय वाढ होते त्याची प्राप्ती परत मिळणाऱ्या रुप्याच्या प्राप्तीपेक्षा चांगली आहे, [QE][QS]आणि त्याचे फायदे उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत. [QE]
15. [QS]ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. [QE][QS]आणि तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्याची तुलना तिच्याशी होऊ शकणार नाही. [QE]
16. [QS]तिच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, [QE][QS]तिच्या डाव्या हातात संपत्ती आणि सन्मान आहेत. [QE]
17. [QS]तिचे मार्ग दयाळूपणाचे मार्ग आहेत, [QE][QS]आणि तिच्या सर्व वाटा शांतीच्या आहेत. [QE]
18. [QS]जे कोणी तिला धरून राहतात त्यांना ती जीवनाचे वृक्ष आहे, [QE][QS]जो कोणी ते धरून ठेवतो तो सुखी आहे. [QE]
19. [QS]परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला, [QE][QS]परमेश्वराने ज्ञानाने आकाश स्थापिले. [QE]
20. [QS]त्याच्या ज्ञानाने खोल जलाशय फुटून उघडले, [QE][QS]आणि ढग त्याचे दहिवर वर्षते. [QE]
21. [QS]माझ्या मुला, सुज्ञान आणि दूरदर्शीपणा ही सांभाळून ठेव, [QE][QS]आणि ती दृष्टीआड होऊ देऊ नकोस. [QE]
22. [QS]ते तुझ्या आत्म्याला जीवन देतील. [QE][QS]आणि ते तुझ्या गळ्याभोवती घालण्याचे कृपेचे अलंकार होईल. [QE]
23. [QS]नंतर तू आपल्या मार्गाने सुरक्षितपणे चालशील, [QE][QS]आणि तुझ्या पायाला ठेच लागणार नाही; [QE]
24. [QS]तू जेव्हा झोपशील, तेव्हा घाबरणार नाहीस; [QE][QS]तू झोप घेशील तेव्हा तुझी झोप गोड होईल. [QE]
25. [QS]जेव्हा दुष्टाकडून नाशधूस होईल त्यामुळे, [QE][QS]किंवा अचानक येणाऱ्या दहशतीस घाबरू नकोस; [QE]
26. [QS]कारण परमेश्वर तुझ्या बाजूस आहे, [QE][QS]आणि तुझा पाय पाशात अडकण्यापासून सांभाळील. [QE]
27. [QS]ज्यांचे हित करणे योग्य असून ते जेव्हा तुझ्या अधिकारात असल्यास, [QE][QS]ते करण्यापासून माघार घेऊ नकोस. [QE]
28. [QS]एखादी वस्तू तुझ्याजवळ असता; [QE][QS]आपल्या शेजाऱ्यास असे म्हणू नको कि, [QE][QS]“जा, आणि पुन्हा ये, आणि उद्या मी तुला देईन.” [QE]
29. [QS]तुमच्या शेजाऱ्याला त्रास देण्याची योजना आखू नकोस. [QE][QS]जो तुझ्याजवळ राहतो आणि तुझ्यावर विश्वास ठेवतो. [QE]
30. [QS]काही कारण नसताना तू एखाद्या मनुष्याशी वाद करू नकोस, [QE][QS]जेव्हा त्याने तुझे काहीही वाईट केलेले नाही. [QE]
31. [QS]तू हिंसाचारी मनुष्याचा हेवा करू नको [QE][QS]किंवा त्याचे कोणतेही मार्ग निवडू नकोस. [QE]
32. [QS]कारण परमेश्वर कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो; [QE][QS]परंतु सरळांना तो त्याच्या आत्मविश्वासात आणतो. [QE]
33. [QS]परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो; [QE][QS]परंतु तो नितीमानांच्या घराला आशीर्वाद देतो. [QE]
34. [QS]तो थट्टा करणाऱ्याची थट्टा करतो, [QE][QS]पण तो नम्रजनांस त्याची कृपा देतो. [QE]
35. [QS]ज्ञानी सन्मानाचे वतनदार होतील, [QE][QS]पण मूर्ख त्यांच्या लज्जेत वर उचलले जातील. [QE]
Total 31 अध्याय, Selected धडा 3 / 31
आज्ञांकितपणाचा आदेश 1 माझ्या मुला, माझ्या आज्ञा विसरु नकोस, आणि माझी शिकवण तुझ्या हृदयात ठेव; 2 कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी आणि शांती ही तुला अधिक लाभतील. 3 विश्वासाचा करार आणि प्रामाणिकपणा तुला कधीही न सोडो, त्यांना एकत्र करून आपल्या गळ्यात बांध, ते आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव. 4 म्हणजे तुला देवाच्या व मनुष्याच्या दृष्टीने कृपा व सुकीर्ती ही मिळतील. 5 तू आपल्या सर्व अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव. आणि तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस; 6 तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव, आणि तो तुझ्या वाटा सरळ करील. 7 तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि वाईटापासून दूर राहा. 8 हे तुझ्या शरीराला आरोग्य आणि तुझ्या हाडांना सत्व असे होईल. 9 तुझ्या संपत्तीने आणि आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वरास मान दे, 10 त्याने तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी पिंपे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. 11 माझ्या मुला, परमेश्वराची शिस्त तुच्छ मानू नको, आणि त्याच्या शासनाचा द्वेष करू नकोस, 12 जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला शिक्षा करतो, तसा परमेश्वर ज्यांच्यावर प्रीती करतो त्यांनाच तो शिस्त लावतो. 13 ज्या कोणाला ज्ञान सापडले तो सुखी आहे, त्यास ग्रहणशक्ती सुद्धा प्राप्त होते. 14 ज्ञानापासून जी काय वाढ होते त्याची प्राप्ती परत मिळणाऱ्या रुप्याच्या प्राप्तीपेक्षा चांगली आहे, आणि त्याचे फायदे उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत. 15 ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. आणि तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्याची तुलना तिच्याशी होऊ शकणार नाही. 16 तिच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, तिच्या डाव्या हातात संपत्ती आणि सन्मान आहेत. 17 तिचे मार्ग दयाळूपणाचे मार्ग आहेत, आणि तिच्या सर्व वाटा शांतीच्या आहेत. 18 जे कोणी तिला धरून राहतात त्यांना ती जीवनाचे वृक्ष आहे, जो कोणी ते धरून ठेवतो तो सुखी आहे. 19 परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला, परमेश्वराने ज्ञानाने आकाश स्थापिले. 20 त्याच्या ज्ञानाने खोल जलाशय फुटून उघडले, आणि ढग त्याचे दहिवर वर्षते. 21 माझ्या मुला, सुज्ञान आणि दूरदर्शीपणा ही सांभाळून ठेव, आणि ती दृष्टीआड होऊ देऊ नकोस. 22 ते तुझ्या आत्म्याला जीवन देतील. आणि ते तुझ्या गळ्याभोवती घालण्याचे कृपेचे अलंकार होईल. 23 नंतर तू आपल्या मार्गाने सुरक्षितपणे चालशील, आणि तुझ्या पायाला ठेच लागणार नाही; 24 तू जेव्हा झोपशील, तेव्हा घाबरणार नाहीस; तू झोप घेशील तेव्हा तुझी झोप गोड होईल. 25 जेव्हा दुष्टाकडून नाशधूस होईल त्यामुळे, किंवा अचानक येणाऱ्या दहशतीस घाबरू नकोस; 26 कारण परमेश्वर तुझ्या बाजूस आहे, आणि तुझा पाय पाशात अडकण्यापासून सांभाळील. 27 ज्यांचे हित करणे योग्य असून ते जेव्हा तुझ्या अधिकारात असल्यास, ते करण्यापासून माघार घेऊ नकोस. 28 एखादी वस्तू तुझ्याजवळ असता; आपल्या शेजाऱ्यास असे म्हणू नको कि, “जा, आणि पुन्हा ये, आणि उद्या मी तुला देईन.” 29 तुमच्या शेजाऱ्याला त्रास देण्याची योजना आखू नकोस. जो तुझ्याजवळ राहतो आणि तुझ्यावर विश्वास ठेवतो. 30 काही कारण नसताना तू एखाद्या मनुष्याशी वाद करू नकोस, जेव्हा त्याने तुझे काहीही वाईट केलेले नाही. 31 तू हिंसाचारी मनुष्याचा हेवा करू नको किंवा त्याचे कोणतेही मार्ग निवडू नकोस. 32 कारण परमेश्वर कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो; परंतु सरळांना तो त्याच्या आत्मविश्वासात आणतो. 33 परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो; परंतु तो नितीमानांच्या घराला आशीर्वाद देतो. 34 तो थट्टा करणाऱ्याची थट्टा करतो, पण तो नम्रजनांस त्याची कृपा देतो. 35 ज्ञानी सन्मानाचे वतनदार होतील, पण मूर्ख त्यांच्या लज्जेत वर उचलले जातील.
Total 31 अध्याय, Selected धडा 3 / 31
×

Alert

×

Marathi Letters Keypad References