मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
नीतिसूत्रे
1. {#1राजाला ताडन }
2. [PS]ही लमुएल राजाची वचने आहेत त्याच्या आईने त्यास शिकवलेली देववाणीः [PE][QS]ऐक, माझ्या मुला? ऐक, माझ्या पोटच्या मुला? [QE][QS]ऐक, माझ्या नवसाच्या मुला? [QE]
3. [QS]तू आपली शक्ती स्त्रियांना देऊ नको, [QE][QS]किंवा आपले मार्ग राजांचा नाश करणाऱ्यास देऊ नको. [QE]
4. [QS]हे लमुएला, द्राक्षरस पिणे हे राजांना शोभत नाही, [QE][QS]आणि मादक पेय कोठे आहे? असे म्हणणे अधिपतींना शोभत नाही. [QE]
5. [QS]ते प्याले तर कायदा काय म्हणतो ते विसरून जातील, [QE][QS]नंतर ते गरीबांचा न्याय उलटा करतील. [QE]
6. [QS]जो नाशास लागला आहे त्यास मादक पेय दे. [QE][QS]आणि खिन्न जिवाला द्राक्षरस दे. [QE]
7. [QS]त्याने पिऊन आपले दारिद्र्य विसरावे [QE][QS]आणि त्याने आपले सर्व क्लेश विसरावे. [QE]
8. [QS]जो कोणी स्वतःसाठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी बोल, [QE][QS]गरीबांच्या हक्कांसाठी आपले तोंड उघड. [QE]
9. [QS]तू आपले मुख उघड आणि जे योग्य आहे त्याचा योग्य रीतीने न्याय कर, [QE][QS]आणि ते गरीब व गरजू आहेत त्यांची बाजू मांडून त्यांना न्याय कर. [QE]
10. {#1सदगुणी स्त्री } [QS]हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल? [QE][QS]पण तिचे मोल मौल्यवान खड्यांपेक्षा अधिक आहे. [QE]
11. [QS]तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते, [QE][QS]तो कधीही गरीब होणार नाही. [QE]
12. [QS]ती आपल्या आयुष्याच्या सर्व दिवशी [QE][QS]त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी करते आणि अनिष्ट करत नाही. [QE]
13. [QS]ती लोकर आणि ताग निवडते, [QE][QS]आणि आपल्या हातांनी आनंदाने काम करते. [QE]
14. [QS]ती व्यापाऱ्याच्या जहाजासारखी आहे, [QE][QS]ती आपले अन्न दुरून आणते. [QE]
15. [QS]रात्र गेली नाही तोच ती उठून, [QE][QS]आपल्या कुटुंबासाठी अन्न शिजवते, [QE][QS]आणि नोकर मुलींना काय करायचे ते काम वाटून देते. [QE]
16. [QS]ती शेताविषयी विचार करून ते विकत घेते, [QE][QS]ती आपल्या हातांच्या श्रमाने द्राक्षाचे मळे लावते. [QE]
17. [QS]ती स्वतःला बलरुप पोशाख घालते, [QE][QS]आणि आपले बाहू बळकट करते. [QE]
18. [QS]आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते; [QE][QS]सर्व रात्री तिचा दिवा विझत नाही. [QE]
19. [QS]ती आपला हात चातीला लावते, [QE][QS]आणि ती गुंडाळलेला दोरा धरते. [QE]
20. [QS]ती आपला हात नेहमी गरीबांसाठी उघडते; [QE][QS]ती गरजवंतास देण्यास आपला हात पुढे करते. [QE]
21. [QS]आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, [QE][QS]कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी वस्त्र पांघरलेले असते. [QE]
22. [QS]ती आपल्या अंथरुणावर टाकायला चादरी [QE][QS]आणि पांघरायला तलम तागाचे जांभळे वस्त्र तयार करते. [QE]
23. [QS]तिचा पती वेशीत, [QE][QS]देशातल्या वडिलांमध्ये बसलेला असता त्यास लोक ओळखतात. [QE]
24. [QS]ती तागाची वस्त्रे करते आणि ते विकते, [QE][QS]ती व्यापाऱ्यांना कमरबंध पुरवते. [QE]
25. [QS]बल व आदर तिचे वस्त्र आहेत, [QE][QS]आणि ती येणाऱ्या काळामध्ये आनंदी राहू शकते. [QE]
26. [QS]तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात. [QE][QS]आणि दयेचा नियम तिच्या जिभेवर आहे. [QE]
27. [QS]ती कधीही आळशी नसते; [QE][QS]ती आपल्या कुटुंबाच्या मार्गाकडे लक्ष देते, [QE][QS]आणि आळसाची भाकर खात नाही. [QE]
28. [QS]तिची मुले उठतात आणि ती त्यांना जे काही आनंद देईल ते देते; [QE][QS]तिचा पती तिची प्रशंसा करून, म्हणतो, [QE]
29. [QS]“पुष्कळ स्त्रियांनी चांगले केले आहे, [QE][QS]पण तू त्या सर्वांहून उत्कृष्ट आहेस.” [QE]
30. [QS]लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे, [QE][QS]पण तू जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते. [QE]
31. [QS]तिच्या हाताचे फळ तिला द्या, [QE][QS]आणि तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो.[QE]
Total 31 अध्याय, Selected धडा 31 / 31
राजाला ताडन 1 2 ही लमुएल राजाची वचने आहेत त्याच्या आईने त्यास शिकवलेली देववाणीः ऐक, माझ्या मुला? ऐक, माझ्या पोटच्या मुला? ऐक, माझ्या नवसाच्या मुला? 3 तू आपली शक्ती स्त्रियांना देऊ नको, किंवा आपले मार्ग राजांचा नाश करणाऱ्यास देऊ नको. 4 हे लमुएला, द्राक्षरस पिणे हे राजांना शोभत नाही, आणि मादक पेय कोठे आहे? असे म्हणणे अधिपतींना शोभत नाही. 5 ते प्याले तर कायदा काय म्हणतो ते विसरून जातील, नंतर ते गरीबांचा न्याय उलटा करतील. 6 जो नाशास लागला आहे त्यास मादक पेय दे. आणि खिन्न जिवाला द्राक्षरस दे. 7 त्याने पिऊन आपले दारिद्र्य विसरावे आणि त्याने आपले सर्व क्लेश विसरावे. 8 जो कोणी स्वतःसाठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी बोल, गरीबांच्या हक्कांसाठी आपले तोंड उघड. 9 तू आपले मुख उघड आणि जे योग्य आहे त्याचा योग्य रीतीने न्याय कर, आणि ते गरीब व गरजू आहेत त्यांची बाजू मांडून त्यांना न्याय कर. सदगुणी स्त्री 10 हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल? पण तिचे मोल मौल्यवान खड्यांपेक्षा अधिक आहे. 11 तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते, तो कधीही गरीब होणार नाही. 12 ती आपल्या आयुष्याच्या सर्व दिवशी त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी करते आणि अनिष्ट करत नाही. 13 ती लोकर आणि ताग निवडते, आणि आपल्या हातांनी आनंदाने काम करते. 14 ती व्यापाऱ्याच्या जहाजासारखी आहे, ती आपले अन्न दुरून आणते. 15 रात्र गेली नाही तोच ती उठून, आपल्या कुटुंबासाठी अन्न शिजवते, आणि नोकर मुलींना काय करायचे ते काम वाटून देते. 16 ती शेताविषयी विचार करून ते विकत घेते, ती आपल्या हातांच्या श्रमाने द्राक्षाचे मळे लावते. 17 ती स्वतःला बलरुप पोशाख घालते, आणि आपले बाहू बळकट करते. 18 आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते; सर्व रात्री तिचा दिवा विझत नाही. 19 ती आपला हात चातीला लावते, आणि ती गुंडाळलेला दोरा धरते. 20 ती आपला हात नेहमी गरीबांसाठी उघडते; ती गरजवंतास देण्यास आपला हात पुढे करते. 21 आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी वस्त्र पांघरलेले असते. 22 ती आपल्या अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला तलम तागाचे जांभळे वस्त्र तयार करते. 23 तिचा पती वेशीत, देशातल्या वडिलांमध्ये बसलेला असता त्यास लोक ओळखतात. 24 ती तागाची वस्त्रे करते आणि ते विकते, ती व्यापाऱ्यांना कमरबंध पुरवते. 25 बल व आदर तिचे वस्त्र आहेत, आणि ती येणाऱ्या काळामध्ये आनंदी राहू शकते. 26 तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात. आणि दयेचा नियम तिच्या जिभेवर आहे. 27 ती कधीही आळशी नसते; ती आपल्या कुटुंबाच्या मार्गाकडे लक्ष देते, आणि आळसाची भाकर खात नाही. 28 तिची मुले उठतात आणि ती त्यांना जे काही आनंद देईल ते देते; तिचा पती तिची प्रशंसा करून, म्हणतो, 29 “पुष्कळ स्त्रियांनी चांगले केले आहे, पण तू त्या सर्वांहून उत्कृष्ट आहेस.” 30 लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे, पण तू जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते. 31 तिच्या हाताचे फळ तिला द्या, आणि तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो.
Total 31 अध्याय, Selected धडा 31 / 31
×

Alert

×

Marathi Letters Keypad References