1. {राजाला ताडन} [PS] ही लमुएल राजाची वचने आहेत त्याच्या आईने त्यास शिकवलेली देववाणीः [QBR]
2. ऐक, माझ्या मुला? ऐक, माझ्या पोटच्या मुला? [QBR] ऐक, माझ्या नवसाच्या मुला? [QBR]
3. तू आपली शक्ती स्त्रियांना देऊ नको, [QBR] किंवा आपले मार्ग राजांचा नाश करणाऱ्यास देऊ नको. [QBR]
4. हे लमुएला, द्राक्षरस पिणे हे राजांना शोभत नाही, [QBR] आणि मादक पेय कोठे आहे? असे म्हणणे अधिपतींना शोभत नाही. [QBR]
5. ते प्याले तर कायदा काय म्हणतो ते विसरून जातील, [QBR] नंतर ते गरीबांचा न्याय उलटा करतील. [QBR]
6. जो नाशास लागला आहे त्यास मादक पेय दे. [QBR] आणि खिन्न जिवाला द्राक्षरस दे. [QBR]
7. त्याने पिऊन आपले दारिद्र्य विसरावे [QBR] आणि त्याने आपले सर्व क्लेश विसरावे. [QBR]
8. जो कोणी स्वतःसाठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी बोल, [QBR] गरीबांच्या हक्कांसाठी आपले तोंड उघड. [QBR]
9. तू आपले मुख उघड आणि जे योग्य आहे त्याचा योग्य रीतीने न्याय कर, [QBR] आणि ते गरीब व गरजू आहेत त्यांची बाजू मांडून त्यांना न्याय कर.
10. {सदगुणी स्त्री} [PS] हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल? [QBR] पण तिचे मोल मौल्यवान खड्यांपेक्षा अधिक आहे. [QBR]
11. तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते, [QBR] तो कधीही गरीब होणार नाही. [QBR]
12. ती आपल्या आयुष्याच्या सर्व दिवशी [QBR] त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी करते आणि अनिष्ट करत नाही. [QBR]
13. ती लोकर आणि ताग निवडते, [QBR] आणि आपल्या हातांनी आनंदाने काम करते. [QBR]
14. ती व्यापाऱ्याच्या जहाजासारखी आहे, [QBR] ती आपले अन्न दुरून आणते. [QBR]
15. रात्र गेली नाही तोच ती उठून, [QBR] आपल्या कुटुंबासाठी अन्न शिजवते, [QBR] आणि नोकर मुलींना काय करायचे ते काम वाटून देते. [QBR]
16. ती शेताविषयी विचार करून ते विकत घेते, [QBR] ती आपल्या हातांच्या श्रमाने द्राक्षाचे मळे लावते. [QBR]
17. ती स्वतःला बलरुप पोशाख घालते, [QBR] आणि आपले बाहू बळकट करते. [QBR]
18. आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते; [QBR] सर्व रात्री तिचा दिवा विझत नाही. [QBR]
19. ती आपला हात चातीला लावते, [QBR] आणि ती गुंडाळलेला दोरा धरते. [QBR]
20. ती आपला हात नेहमी गरीबांसाठी उघडते; [QBR] ती गरजवंतास देण्यास आपला हात पुढे करते. [QBR]
21. आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, [QBR] कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी वस्त्र पांघरलेले असते. [QBR]
22. ती आपल्या अंथरुणावर टाकायला चादरी [QBR] आणि पांघरायला तलम तागाचे जांभळे वस्त्र तयार करते. [QBR]
23. तिचा पती वेशीत, [QBR] देशातल्या वडिलांमध्ये बसलेला असता त्यास लोक ओळखतात. [QBR]
24. ती तागाची वस्त्रे करते आणि ते विकते, [QBR] ती व्यापाऱ्यांना कमरबंध पुरवते. [QBR]
25. बल व आदर तिचे वस्त्र आहेत, [QBR] आणि ती येणाऱ्या काळामध्ये आनंदी राहू शकते. [QBR]
26. तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात. [QBR] आणि दयेचा नियम तिच्या जिभेवर आहे. [QBR]
27. ती कधीही आळशी नसते; [QBR] ती आपल्या कुटुंबाच्या मार्गाकडे लक्ष देते, [QBR] आणि आळसाची भाकर खात नाही. [QBR]
28. तिची मुले उठतात आणि ती त्यांना जे काही आनंद देईल ते देते; [QBR] तिचा पती तिची प्रशंसा करून, म्हणतो, [QBR]
29. “पुष्कळ स्त्रियांनी चांगले केले आहे, [QBR] पण तू त्या सर्वांहून उत्कृष्ट आहेस.” [QBR]
30. लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे, [QBR] पण तू जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते. [QBR]
31. तिच्या हाताचे फळ तिला द्या, [QBR] आणि तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो. [PE]