1. {#1बदफैली स्त्रीविषयी ताकीद } [QS]माझ्या मुला, माझ्या ज्ञानाकडे लक्ष लाव; [QE][QS]माझ्या सुज्ञानाकडे काळजीपूर्वक आपला कान लाव. [QE]
2. [QS]म्हणून तू दूरदर्शीपणाविषयी शिक्षण घे, [QE][QS]आणि तुझे ओठ तुझ्या विद्येचे रक्षण करतील. [QE]
3. [QS]कारण व्यभिचारिणी स्त्रीच्या ओठातून मध टिपकतो, [QE][QS]आणि तिचे तोंड तेलापेक्षा गुळगुळीत असते, [QE]
4. [QS]पण शेवटी ती दवण्यासारखी कडू आहे, [QE][QS]आणि दुधारी तलवारी सारखी धारदार होते. [QE]
5. [QS]तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; [QE][QS]तिची पावले सर्व मार्गात अधोलोकात लागतात. [QE]
6. [QS]म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही. [QE][QS]तिची पावले भटकतात, ती कोठे जाते हे तिला समजत नाही. [QE]
7. [QS]आणि आता, माझ्या मुलांनो, माझे ऐका; [QE][QS]माझ्या तोंडची वचने ऐकण्यापासून दूर जाऊ नका. [QE]
8. [QS]तू आपला मार्ग तिच्यापासून दूर राख, आणि तिच्या घराच्या दाराजवळ सुध्दा जाऊ नको. [QE]
9. [QS]गेलास तर तुझी अब्रू इतरांच्या हाती जाईल, [QE][QS]आणि तुझ्या आयुष्याची वर्षे क्रूरजनाच्या हाती जातील; [QE]
10. [QS]तुझ्या संपत्तीने परके मेजवाणी करतील, [QE][QS]आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्याच्या घरात जाईल. [QE]
11. [QS]जेव्हा तुझा देह व शरीर सर्वकाही नष्ट होईल, [QE][QS]तेव्हा तुझ्या आयुष्याच्या शेवटी तू शोक करशील. [QE]
12. [QS]तू म्हणशील “मी शिस्तीचा कसा द्वेष केला, [QE][QS]आणि माझ्या अंतःकरणाने शासन कसे तुच्छ मानले! [QE]
13. [QS]मी माझ्या शिक्षकांच्या आज्ञा पाळल्या नाहीत, [QE][QS]किंवा मला शिकवणाऱ्याकडे कान दिला नाही. [QE]
14. [QS]मंडळी व सभा यांच्यादेखत [QE][QS]मी बहुतेक पुर्णपणे नाश पावलो होतो.” [QE]
15. [QS]तू आपल्याच टाकितले पाणी पी, [QE][QS]तुझ्या स्वतःच्या विहिरितले वाहते पाणी पी. [QE]
16. [QS]तुझे झरे बाहेर सर्वत्र वाहून जावे काय, [QE][QS]आणि तुझ्या पाण्याचा प्रवाह सार्वजनिक चौकात वाहावा कां? [QE]
17. [QS]ते केवळ तुझ्यासाठीच असावेत, [QE][QS]आणि तुझ्याबरोबर परक्यांसाठी नसावेत. [QE]
18. [QS]तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त होवो, [QE][QS]आणि तरुणपणी केलेल्या पत्नीसह[* तू तरुण असताना केलेल्या पत्नीसह ] तू संतुष्ट रहा. [QE]
19. [QS]कारण ती सुंदर हरीणी आणि आकर्षक रानशेळी आहे. [QE][QS]तिचे स्तन तुला सर्वदा आनंदाने भरोत; [QE][QS]तू तिच्या प्रेमाने नेहमी आनंदीत रहा. [QE]
20. [QS]माझ्या मुला, व्यभिचारी स्त्रीने तुला कां आनंदित करावे; [QE][QS]तू परक्या स्त्रीच्या उराचे आलिंगन कां करावे? [QE]
21. [QS]मनुष्य काय करतो हे परमेश्वर सर्वकाही पाहतो, [QE][QS]तो त्याच्या सर्व वाटांकडे लक्ष देतो. [QE]
22. [QS]दुष्ट मनुष्यास त्याची स्वतःचीच दुष्कर्मे धरतात, [QE][QS]त्याची पापे दोरीप्रमाणे त्यास घट्ट पकडतील. [QE]
23. [QS]शिक्षणाची उणीव असल्या कारणाने तो मरेल; तो आपल्या महान मूर्खपणामुळे बहकून जाईल. [QE]