1. {आळस व खोटेपणा ह्यांविषयी उपदेश} [PS] माझ्या मुला, शेजाऱ्याच्या कर्जाला जामीनासाठी जर तू आपला पैसा बाजूला ठेवलास, [QBR] ज्याला तू ओळखत नाही अशा कोणाला तू कर्जासाठी वचन दिले, [QBR]
2. तर मग तू आपल्या वचनाने पाशात अडकला आहेस, [QBR] आणि तू आपल्या तोंडच्या शब्दांनीच पकडला गेला आहेस. [QBR]
3. ह्याकरिता, माझ्या मुला, तू हे कर आणि आपला बचाव कर, [QBR] कारण तू शेजाऱ्याच्या तावडीत सापडला आहेस. [QBR] जा आणि आपल्याला नम्र कर आणि आपल्या शेजाऱ्याला तुला मुक्त करण्यास आग्रह कर. [QBR]
4. तुझ्या डोळ्यास झोप लागू देऊ नकोस, [QBR] आणि तुझ्या पापण्यास गुंगी येऊ देऊ नको. [QBR]
5. शिकाऱ्याच्या हातातून हरीणीला; [QBR] जसे फासे पारध्याच्या हातातून पक्ष्याला, तसे तू आपणाला वाचव. [QBR]
6. अरे आळशी मनुष्या, मुंगीकडे पाहा, [QBR] तिचे मार्ग पाहून शहाणा हो. [QBR]
7. तिला कोणी सेनापती [QBR] अधिकारी, किंवा राजा नाही. [QBR]
8. तरी ती उन्हाळ्यात आपले अन्न तयार करते, [QBR] आणि जे काय खाण्यास लागणारे कापणीच्या समयी ते जमा करून ठेवते. [QBR]
9. अरे आळशी मनुष्या, तू किती वेळ झोपून राहशील? [QBR] तू आपल्या झोपेतून केव्हा उठशील? [QBR]
10. “आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो. [QBR] आणखी विसावा घ्यायला हात घडी करतो.” [QBR]
11. असे म्हणशील तर दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे [QBR] आणि तुझी गरिबी हत्यारबंद मनुष्यासारखी येईल. [QBR]
12. दुर्जन व वाईट मनुष्य [QBR] त्याच्या कपटी बोलण्याने जगतो, [QBR]
13. त्याचे डोळे मिचकावतो, आपल्या पायांनी इशारा करतो, [QBR] आणि आपल्या बोटांनी खुणा करतो. [QBR]
14. त्याच्या हृदयात कपट असून त्याबरोबर तो दुष्ट योजना आखतो; [QBR] तो नेहमी वैमनस्य पसरतो. [QBR]
15. यामुळे त्याची विपत्ती तत्क्षणी त्यास गाठेल; [QBR] कोणत्याही उपचाराशिवाय एका क्षणात तो तुटेल. [QBR]
16. परमेश्वर अशा या सहा गोष्टींचा द्वेष करतो, [QBR] त्यास अशा सात गोष्टींचा वीट आहेः [QBR]
17. गर्विष्टांचे डोळे, लबाड बोलणारी जीभ, [QBR] निरपराध्यांचे रक्त पाडणारे हात, [QBR]
18. मन जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते, [QBR] पाय जे वाईट गोष्टी करायला त्वरेने धाव घेतात, [QBR]
19. लबाड बोलणारा खोटा साक्षी, [QBR] आणि जो कोणी भावाभावामध्ये वैमनस्य पेरणारा मनुष्य, ह्या त्या आहेत.
20. {व्याभिचाराविषयी ताकीद} [PS] माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा पाळ, [QBR] आणि तुझ्या आईची शिकवण विसरु नकोस. [QBR]
21. ती नेहमी आपल्या हृदयाशी कवटाळून धर; [QBR] ती आपल्या गळ्यात बांधून ठेव. [QBR]
22. जेव्हा तू चालशील, ते तुला मार्गदर्शन करील; [QBR] जेव्हा तू झोपशील, तेव्हा ते तुझे रक्षण करील; [QBR] आणि जेव्हा तू उठशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल. [QBR]
23. कारण ती आज्ञा दिवा आहेत आणि शिक्षण प्रकाश आहे; [QBR] शिस्तीचा दोषारोप जीवनाचा मार्ग आहे. [QBR]
24. ते तुला अनितीमान स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते, [QBR] व्यभिचारी स्त्रीच्या गोडबोल्या जिभेपासून तुझे रक्षण करते. [QBR]
25. तू आपल्या हृदयात तिच्या सुंदरतेची लालसा धरू नकोस, [QBR] आणि ती आपल्या पापण्यांनी तुला वश न करो. [QBR]
26. वेश्येबरोबर झोपल्याने भाकरीच्या तुकड्याची किंमत चुकवावी लागते, [QBR] पण दुसऱ्याच्या पत्नीची किंमत म्हणून तुला तुझ्या स्वतःचे जीवन द्यावे लागेल. [QBR]
27. मनुष्याने आपल्या छातीशी विस्तव धरून ठेवला तर, [QBR] त्याचे कपडे जळल्याशिवाय राहतील काय? [QBR]
28. जर एखादा मनुष्य निखाऱ्यांवर चालला, [QBR] तर त्याचे पाय भाजल्याशिवाय राहतील काय? [QBR]
29. जो कोणी आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीबरोबर जातो तो असाच आहे; [QBR] जो कोणी तिच्याबरोबर संबंध ठेवतो त्यास शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. [QBR]
30. जर चोर चोरी करताना पकडला तर लोक त्यास तुच्छ मानत नाही; [QBR] तो भुकेला असताना त्याची भूक शमविण्यासाठी त्याने चोरी केली. [QBR]
31. पण तो पकडला गेला, तर त्याने चोरी केली त्याच्या सातपट परत देईल, [QBR] तो आपल्या घरचे सर्वच द्रव्य देईल. [QBR]
32. जो व्यभिचार करतो तो बुद्धिहीन आहे; [QBR] जो आपल्या जिवाचा नाश करू इच्छितो तो असे करतो. [QBR]
33. जखमा व अप्रतिष्ठा त्यास प्राप्त होतील, [QBR] आणि त्याची लज्जा कधीही धुतली जाणार नाही. [QBR]
34. कारण ईर्ष्या मनुष्यास संतप्त करते; [QBR] सूड उगविण्याच्या दिवशी तो गय करणार नाही. [QBR]
35. तो काही खंडणी स्वीकारणार नाही, [QBR] आणि त्यास खूप दाने दिली तरी तो शांत राहणार नाही. [PE]