1. {नीतिमान व अनीतिमान} PS आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही,
किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही. |
2. परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो,
आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो. |
3. तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या,
आपल्या ऋतुत फळ देणाऱ्या, ज्याची पाने कधी कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा होईल व तो जे काही करेल ते साध्य होईल. |