1. {दुष्टाचे पतन व्हावे म्हणून प्रार्थना} PS हे परमेश्वरा, तू दूर का उभा आहेस?
संकटकाळी तू स्वत:ला का लपवतोस? |
2. कारण दुष्ट आपल्या गर्विष्ठपणामुळे पीडलेल्यांचा पाठलाग करतो,
परंतु कृपया असे होवो की दुष्टांनी जे संकल्प योजिले आहेत, त्यामध्ये ते सापडो. |
3. कारण दुष्ट आपल्या हृदयाच्या इच्छेचा अभिमान बाळगतो;
दुष्ट लोभी व्यक्तीस धन्य म्हणतो व परमेश्वरास तुच्छ मानतो आणि नाकारतो. |
4. दुष्ट मनुष्य गर्विष्ठ असतो, ह्यास्तव तो देवाला शोधत नाही.
कारण देवाबद्दल त्यास काही काळजी नाही, म्हणून तो देवाचा विचार करत नाही. |
5. त्याचे मार्ग उन्नतीचे असतात,
परंतु तुझे धार्मिक नियम त्याच्या आवाक्याबाहेरचे आहेत, तो आपल्या सर्व शत्रूंवर फुत्कारतो. |
9. जसा सिंह गर्द झाडात लपतो, तसाच तो दडून बसतो.
तो दीनाला धरायला टपून बसतो. तो दीनाला आपल्या जाळ्यात ओढून धरून घेतो. |
11. तो आपल्या हृदयात असे बोलतो, देव आपल्याला विसरला आहे,
त्याने आपले मुख झाकले आहे, तो पाहण्याचा त्रास करून घेणार नाही. |
14. तू ते पाहिले आहे, कारण तू आपल्या हाती ते घ्यावे म्हणून तू उपद्रव आणि दु:ख पाहतो,
लाचार तुला आपणास सोपवून देतो, तू अनाथांचा वाचवणारा आहे. |
15. दुष्ट आणि वाईट मनुष्याचा भुज तोडून टाक,
त्याच्या वाईट कृत्यांबद्दल त्यास जबाबदार धर, ज्याने असा विचार केला होता की तू ते शोधणार नाही. |
17. हे परमेश्वरा, पीडितांचे तू ऐकले आहे;
तू त्यांचे हृदय सामर्थ्यवान केले आहे, तू त्यांची प्रार्थना ऐकली आहे. |