1. {#1दुष्टाचे पतन व्हावे म्हणून प्रार्थना } [QS]हे परमेश्वरा, तू दूर का उभा आहेस? [QE][QS]संकटकाळी तू स्वत:ला का लपवतोस? [QE]
2. [QS]कारण दुष्ट आपल्या गर्विष्ठपणामुळे पीडलेल्यांचा पाठलाग करतो, [QE][QS]परंतु कृपया असे होवो की दुष्टांनी जे संकल्प योजिले आहेत, त्यामध्ये ते सापडो. [QE]
3. [QS]कारण दुष्ट आपल्या हृदयाच्या इच्छेचा अभिमान बाळगतो; [QE][QS]दुष्ट लोभी व्यक्तीस धन्य म्हणतो व परमेश्वरास तुच्छ मानतो आणि नाकारतो. [QE]
4. [QS]दुष्ट मनुष्य गर्विष्ठ असतो, ह्यास्तव तो देवाला शोधत नाही. [QE][QS]कारण देवाबद्दल त्यास काही काळजी नाही, म्हणून तो देवाचा विचार करत नाही. [QE]
5. [QS]त्याचे मार्ग उन्नतीचे असतात, [QE][QS]परंतु तुझे धार्मिक नियम त्याच्या आवाक्याबाहेरचे आहेत, [QE][QS]तो आपल्या सर्व शत्रूंवर फुत्कारतो. [QE]
6. [QS]तो आपल्या हृदयात असे म्हणतो, मी कधीच चुकणार नाही; [QE][QS]संपूर्ण पिढ्यांत माझ्यावर आपत्ती येणारच नाही. [QE]
7. [QS]त्याचे मुख शाप, कपट, जुलूम, हानिकारक शब्दांनी भरलेले आहेत. [QE][QS]त्यांची जीभ जखमी व नाश करते. [QE]
8. [QS]तो गावाजवळ टपून बसतो, [QE][QS]गुप्त ठिकाणात तो निर्दोष्याला ठार मारतो; [QE][QS]त्याचे डोळे लाचारावर टपून असतात. [QE]
9. [QS]जसा सिंह गर्द झाडात लपतो, तसाच तो दडून बसतो. [QE][QS]तो दीनाला धरायला टपून बसतो. [QE][QS]तो दीनाला आपल्या जाळ्यात ओढून धरून घेतो. [QE]
10. [QS]त्याचे बळी पडणारे ठेचले आणि झोडले जातात. [QE][QS]ते त्याच्या बळकट जाळ्यात पडतात. [QE]
11. [QS]तो आपल्या हृदयात असे बोलतो, देव आपल्याला विसरला आहे, [QE][QS]त्याने आपले मुख झाकले आहे, तो पाहण्याचा त्रास करून घेणार नाही. [QE]
12. [QS]हे परमेश्वरा, देवा, ऊठ! तू आपला हात न्यायासाठी चालव. [QE][QS]गरीबांना विसरु नकोस. [QE]
13. [QS]दुष्ट देवाला तुच्छ का मानतो? तो मला जबाबदार धरणार नाही, असे तो मनात का म्हणतो? [QE]
14. [QS]तू ते पाहिले आहे, कारण तू आपल्या हाती ते घ्यावे म्हणून तू उपद्रव आणि दु:ख पाहतो, [QE][QS]लाचार तुला आपणास सोपवून देतो, [QE][QS]तू अनाथांचा वाचवणारा आहे. [QE]
15. [QS]दुष्ट आणि वाईट मनुष्याचा भुज तोडून टाक, [QE][QS]त्याच्या वाईट कृत्यांबद्दल त्यास जबाबदार धर, ज्याने असा विचार केला होता की तू ते शोधणार नाही. [QE]
16. [QS]परमेश्वर सदासर्वकाळ राजा आहे, [QE][QS]राष्ट्रे त्याच्या भूमीतून बाहेर घालवली आहेत. [QE]
17. [QS]हे परमेश्वरा, पीडितांचे तू ऐकले आहे; [QE][QS]तू त्यांचे हृदय सामर्थ्यवान केले आहे, तू त्यांची प्रार्थना ऐकली आहे. [QE]
18. [QS]पोरके आणि पीडलेले यांचे तू रक्षण केले आहे, [QE][QS]म्हणजे मनुष्य पृथ्वीवर आणखी भयाचे कारण होऊ नये. [QE]