1. {दुष्टाचे पतन व्हावे म्हणून प्रार्थना} [PS] हे परमेश्वरा, तू दूर का उभा आहेस? [QBR] संकटकाळी तू स्वत:ला का लपवतोस? [QBR]
2. कारण दुष्ट आपल्या गर्विष्ठपणामुळे पीडलेल्यांचा पाठलाग करतो, [QBR] परंतु कृपया असे होवो की दुष्टांनी जे संकल्प योजिले आहेत, त्यामध्ये ते सापडो. [QBR]
3. कारण दुष्ट आपल्या हृदयाच्या इच्छेचा अभिमान बाळगतो; [QBR] दुष्ट लोभी व्यक्तीस धन्य म्हणतो व परमेश्वरास तुच्छ मानतो आणि नाकारतो. [QBR]
4. दुष्ट मनुष्य गर्विष्ठ असतो, ह्यास्तव तो देवाला शोधत नाही. [QBR] कारण देवाबद्दल त्यास काही काळजी नाही, म्हणून तो देवाचा विचार करत नाही. [QBR]
5. त्याचे मार्ग उन्नतीचे असतात, [QBR] परंतु तुझे धार्मिक नियम त्याच्या आवाक्याबाहेरचे आहेत, [QBR] तो आपल्या सर्व शत्रूंवर फुत्कारतो. [QBR]
6. तो आपल्या हृदयात असे म्हणतो, मी कधीच चुकणार नाही; [QBR] संपूर्ण पिढ्यांत माझ्यावर आपत्ती येणारच नाही. [QBR]
7. त्याचे मुख शाप, कपट, जुलूम, हानिकारक शब्दांनी भरलेले आहेत. [QBR] त्यांची जीभ जखमी व नाश करते. [QBR]
8. तो गावाजवळ टपून बसतो, [QBR] गुप्त ठिकाणात तो निर्दोष्याला ठार मारतो; [QBR] त्याचे डोळे लाचारावर टपून असतात. [QBR]
9. जसा सिंह गर्द झाडात लपतो, तसाच तो दडून बसतो. [QBR] तो दीनाला धरायला टपून बसतो. [QBR] तो दीनाला आपल्या जाळ्यात ओढून धरून घेतो. [QBR]
10. त्याचे बळी पडणारे ठेचले आणि झोडले जातात. [QBR] ते त्याच्या बळकट जाळ्यात पडतात. [QBR]
11. तो आपल्या हृदयात असे बोलतो, देव आपल्याला विसरला आहे, [QBR] त्याने आपले मुख झाकले आहे, तो पाहण्याचा त्रास करून घेणार नाही. [QBR]
12. हे परमेश्वरा, देवा, ऊठ! तू आपला हात न्यायासाठी चालव. [QBR] गरीबांना विसरु नकोस. [QBR]
13. दुष्ट देवाला तुच्छ का मानतो? तो मला जबाबदार धरणार नाही, असे तो मनात का म्हणतो? [QBR]
14. तू ते पाहिले आहे, कारण तू आपल्या हाती ते घ्यावे म्हणून तू उपद्रव आणि दु:ख पाहतो, [QBR] लाचार तुला आपणास सोपवून देतो, [QBR] तू अनाथांचा वाचवणारा आहे. [QBR]
15. दुष्ट आणि वाईट मनुष्याचा भुज तोडून टाक, [QBR] त्याच्या वाईट कृत्यांबद्दल त्यास जबाबदार धर, ज्याने असा विचार केला होता की तू ते शोधणार नाही. [QBR]
16. परमेश्वर सदासर्वकाळ राजा आहे, [QBR] राष्ट्रे त्याच्या भूमीतून बाहेर घालवली आहेत. [QBR]
17. हे परमेश्वरा, पीडितांचे तू ऐकले आहे; [QBR] तू त्यांचे हृदय सामर्थ्यवान केले आहे, तू त्यांची प्रार्थना ऐकली आहे. [QBR]
18. पोरके आणि पीडलेले यांचे तू रक्षण केले आहे, [QBR] म्हणजे मनुष्य पृथ्वीवर आणखी भयाचे कारण होऊ नये. [PE]