मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1नीतीने वागण्याची प्रतिज्ञा }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]मी प्रेम आणि न्यायाचे गीत गाईन; [QE][QS]हे परमेश्वरा, मी स्तुती गाईन; [QE]
2. [QS]मी सुज्ञतेच्या मार्गाने चालेन. [QE][QS]अहा, तू माझ्याकडे कधी येशील? [QE][QS]मी माझ्या घरात सचोटीने चालेन. [QE]
3. [QS]मी आपल्या डोळ्यासमोर अनुचित गोष्ट ठेवणार नाही; [QE][QS]अनाचाराचा मी द्वेष करतो; [QE][QS]तो मला बिलगणार नाही. [QE]
4. [QS]हेकेखोर लोक मला सोडतील; [QE][QS]मी वाईटाशी निष्ठावान राहणार नाही. [QE]
5. [QS]आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे निंदानालस्ती करणाऱ्याचा मी नाश करीन. [QE][QS]जो कोणी गर्विष्ठ चालीरीतीचा आणि उर्मट वागणूकीचा आहे त्याचे मी सहन करणार नाही. [QE]
6. [QS]देशातले विश्वासू यांनी माझ्याजवळ बसावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील; [QE][QS]जो सचोटीच्या मार्गाने चालतो तोच माझा सेवक होईल. [QE]
7. [QS]कपट करणारे लोक माझ्या घरात राहणार नाहीत; [QE][QS]लबाडाचे माझ्या डोळ्यापुढे स्वागत होणार नाही. [QE]
8. [QS]देशातल्या सर्व वाईटांचा मी रोज सकाळी नाश करत जाईन; [QE][QS]वाईट करणाऱ्या सर्वांना मी परमेश्वराच्या नगरातून काढून टाकेन. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 101 / 150
नीतीने वागण्याची प्रतिज्ञा 1 दाविदाचे स्तोत्र मी प्रेम आणि न्यायाचे गीत गाईन; हे परमेश्वरा, मी स्तुती गाईन; 2 मी सुज्ञतेच्या मार्गाने चालेन. अहा, तू माझ्याकडे कधी येशील? मी माझ्या घरात सचोटीने चालेन. 3 मी आपल्या डोळ्यासमोर अनुचित गोष्ट ठेवणार नाही; अनाचाराचा मी द्वेष करतो; तो मला बिलगणार नाही. 4 हेकेखोर लोक मला सोडतील; मी वाईटाशी निष्ठावान राहणार नाही. 5 आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे निंदानालस्ती करणाऱ्याचा मी नाश करीन. जो कोणी गर्विष्ठ चालीरीतीचा आणि उर्मट वागणूकीचा आहे त्याचे मी सहन करणार नाही. 6 देशातले विश्वासू यांनी माझ्याजवळ बसावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील; जो सचोटीच्या मार्गाने चालतो तोच माझा सेवक होईल. 7 कपट करणारे लोक माझ्या घरात राहणार नाहीत; लबाडाचे माझ्या डोळ्यापुढे स्वागत होणार नाही. 8 देशातल्या सर्व वाईटांचा मी रोज सकाळी नाश करत जाईन; वाईट करणाऱ्या सर्वांना मी परमेश्वराच्या नगरातून काढून टाकेन.
Total 150 अध्याय, Selected धडा 101 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References