मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {विपत्तीत धावा} [PS] हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; [QBR] माझ्या आरोळीकडे लक्ष दे. [QBR]
2. मी संकटात असताना माझ्यापासून तोंड लपवू नकोस. [QBR] माझ्याकडे लक्ष दे. [QBR] जेव्हा मी तुला हाक मारतो, मला त्वरेने उत्तर दे. [QBR]
3. कारण माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे, [QBR] आणि माझी हाडे अग्नीसारखी जळून गेली आहेत. [QBR]
4. माझे हृदय चिरडून गेले आहे आणि मी गवताप्रमाणे कोमेजून गेलो आहे. [QBR] मी जेवण खाण्यास असमर्थ आहे. [QBR]
5. माझ्या सततच्या कण्हण्यामुळे, [QBR] मी फार क्षीण झालो आहे. [QBR]
6. मी अरण्यातल्या घुबडाप्रमाणे झालो आहे. [QBR] मी ओसाड ठिकाणातल्या गरुडाप्रमाणे झालो आहे. [QBR]
7. मी जागरण करीत आहे; [QBR] धाब्यावर एकटे राहणाऱ्या एकाकी पक्ष्याप्रमाणे मी आहे. [QBR]
8. माझे शत्रू सर्व दिवस मला टोमणे मारतात; [QBR] ते माझी चेष्टा करतात माझे नाव वापरून शाप देतात. [QBR]
9. मी राख भाकरीप्रमाणे खाल्ली आहे, [QBR] आणि माझ्या पाण्यात माझे अश्रू मिसळले आहेत. [QBR]
10. कारण तुझ्या भयंकर क्रोधामुळे, [QBR] तू मला वर उचलून घेऊन खाली फेकून दिलेस. [QBR]
11. माझे दिवस उतरत्या सावलीप्रमाणे झाले आहेत, [QBR] आणि गवतासारखा मी कोमेजून गेलो आहे. [QBR]
12. पण हे परमेश्वरा, तू सर्वकाळ राजासनारूढ आहेस, [QBR] आणि तुझी कीर्ती सर्व पिढ्यांसाठी सर्वकाळ राहील. [QBR]
13. तू उठून उभा राहशील आणि सियोनेवर दया करशील. [QBR] तिच्यावर दया करण्याची वेळ आता आली आहे; [QBR] नेमलेला वेळ आला आहे. [QBR]
14. कारण तुझे सेवक तिच्या दगडांची आवड धरतात, [QBR] आणि तिच्या नासधूसाची धूळ पाहून त्यांना कळवळा येतो. [QBR]
15. हे परमेश्वरा, राष्ट्रे तुझ्या नावाचा आदर करतील, [QBR] आणि पृथ्वीवरील सर्व राजे तुझ्या वैभवाचा सन्मान करतील. [QBR]
16. परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल, [QBR] आणि तो आपल्या गौरवाने प्रगट होईल. [QBR]
17. आणखी तो अनाथाच्या प्रार्थनेला प्रतिसाद देईल. [QBR] तो त्यांची प्रार्थना नाकारणार नाही. [QBR]
18. पुढील पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल, [QBR] आणि अजून ज्या लोकांचा जन्म झाला नाही ते परमेश्वराची स्तुती करतील. [QBR]
19. कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्रस्थानातून खाली पाहीले आहे. [QBR] परमेश्वराने स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहीले, [QBR]
20. तो बंदिवानाचे कण्हणे ऐकेल, [QBR] ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठरवली होती त्यास सोडविले. [QBR]
21. नंतर सियोनेतील लोक परमेश्वराचे नाव सांगतील, [QBR] आणि यरूशलेमेत त्याची स्तुती करतील. [QBR]
22. जेव्हा परमेश्वराची एकत्र सेवा करण्यासाठी [QBR] सगळी राष्ट्रे एकत्र येतील. [QBR]
23. त्याने माझी शक्ती जीवनाच्या मध्येच काढून घेतली. [QBR] त्याने माझे दिवस कमी केले. [QBR]
24. मी म्हणालो, “हे माझ्या देवा, माझ्या जीवनाच्या मध्येच मला काढून घेऊ नकोस; [QBR] तू येथे सर्व पिढ्यानपिढ्यातून आहेस. [QBR]
25. तू प्राचीन काळी पृथ्वीचा पाया घातला; [QBR] आकाश तुझ्या हातचे कार्य आहे. [QBR]
26. ते नाहीसे होईल, पण तू राहशील; [QBR] ते सर्व कापडाप्रमाणे जीर्ण होतील; [QBR] कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील आणि ते नाहीसे होतील. [QBR]
27. पण तू सारखाच आहे, [QBR] आणि तुझ्या वर्षांना अंत नाही. [QBR]
28. तुझ्या सेवकांची मुले इथे कायम राहतील, [QBR] आणि त्यांचे वंशज तुझ्या उपस्थितीत इथे राहतील.” [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 102 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 102:26
1. {विपत्तीत धावा} PS हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक;
माझ्या आरोळीकडे लक्ष दे.
2. मी संकटात असताना माझ्यापासून तोंड लपवू नकोस.
माझ्याकडे लक्ष दे.
जेव्हा मी तुला हाक मारतो, मला त्वरेने उत्तर दे.
3. कारण माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे,
आणि माझी हाडे अग्नीसारखी जळून गेली आहेत.
4. माझे हृदय चिरडून गेले आहे आणि मी गवताप्रमाणे कोमेजून गेलो आहे.
मी जेवण खाण्यास असमर्थ आहे.
5. माझ्या सततच्या कण्हण्यामुळे,
मी फार क्षीण झालो आहे.
6. मी अरण्यातल्या घुबडाप्रमाणे झालो आहे.
मी ओसाड ठिकाणातल्या गरुडाप्रमाणे झालो आहे.
7. मी जागरण करीत आहे;
धाब्यावर एकटे राहणाऱ्या एकाकी पक्ष्याप्रमाणे मी आहे.
8. माझे शत्रू सर्व दिवस मला टोमणे मारतात;
ते माझी चेष्टा करतात माझे नाव वापरून शाप देतात.
9. मी राख भाकरीप्रमाणे खाल्ली आहे,
आणि माझ्या पाण्यात माझे अश्रू मिसळले आहेत.
10. कारण तुझ्या भयंकर क्रोधामुळे,
तू मला वर उचलून घेऊन खाली फेकून दिलेस.
11. माझे दिवस उतरत्या सावलीप्रमाणे झाले आहेत,
आणि गवतासारखा मी कोमेजून गेलो आहे.
12. पण हे परमेश्वरा, तू सर्वकाळ राजासनारूढ आहेस,
आणि तुझी कीर्ती सर्व पिढ्यांसाठी सर्वकाळ राहील.
13. तू उठून उभा राहशील आणि सियोनेवर दया करशील.
तिच्यावर दया करण्याची वेळ आता आली आहे;
नेमलेला वेळ आला आहे.
14. कारण तुझे सेवक तिच्या दगडांची आवड धरतात,
आणि तिच्या नासधूसाची धूळ पाहून त्यांना कळवळा येतो.
15. हे परमेश्वरा, राष्ट्रे तुझ्या नावाचा आदर करतील,
आणि पृथ्वीवरील सर्व राजे तुझ्या वैभवाचा सन्मान करतील.
16. परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल,
आणि तो आपल्या गौरवाने प्रगट होईल.
17. आणखी तो अनाथाच्या प्रार्थनेला प्रतिसाद देईल.
तो त्यांची प्रार्थना नाकारणार नाही.
18. पुढील पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल,
आणि अजून ज्या लोकांचा जन्म झाला नाही ते परमेश्वराची स्तुती करतील.
19. कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्रस्थानातून खाली पाहीले आहे.
परमेश्वराने स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहीले,
20. तो बंदिवानाचे कण्हणे ऐकेल,
ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठरवली होती त्यास सोडविले.
21. नंतर सियोनेतील लोक परमेश्वराचे नाव सांगतील,
आणि यरूशलेमेत त्याची स्तुती करतील.
22. जेव्हा परमेश्वराची एकत्र सेवा करण्यासाठी
सगळी राष्ट्रे एकत्र येतील.
23. त्याने माझी शक्ती जीवनाच्या मध्येच काढून घेतली.
त्याने माझे दिवस कमी केले.
24. मी म्हणालो, “हे माझ्या देवा, माझ्या जीवनाच्या मध्येच मला काढून घेऊ नकोस;
तू येथे सर्व पिढ्यानपिढ्यातून आहेस.
25. तू प्राचीन काळी पृथ्वीचा पाया घातला;
आकाश तुझ्या हातचे कार्य आहे.
26. ते नाहीसे होईल, पण तू राहशील;
ते सर्व कापडाप्रमाणे जीर्ण होतील;
कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील आणि ते नाहीसे होतील.
27. पण तू सारखाच आहे,
आणि तुझ्या वर्षांना अंत नाही.
28. तुझ्या सेवकांची मुले इथे कायम राहतील,
आणि त्यांचे वंशज तुझ्या उपस्थितीत इथे राहतील.” PE
Total 150 Chapters, Current Chapter 102 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References