1. {#1विपत्तीत धावा }[PS]*परमेश्वराजवळ प्रार्थना *[PE][QS]हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; [QE][QS]माझ्या आरोळीकडे लक्ष दे. [QE]
2. [QS]मी संकटात असताना माझ्यापासून तोंड लपवू नकोस. [QE][QS]माझ्याकडे लक्ष दे. [QE][QS]जेव्हा मी तुला हाक मारतो, मला त्वरेने उत्तर दे. [QE]
3. [QS]कारण माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे, [QE][QS]आणि माझी हाडे अग्नीसारखी जळून गेली आहेत. [QE]
4. [QS]माझे हृदय चिरडून गेले आहे आणि मी गवताप्रमाणे कोमेजून गेलो आहे. [QE][QS]मी जेवण खाण्यास असमर्थ आहे. [QE]
5. [QS]माझ्या सततच्या कण्हण्यामुळे, [QE][QS]मी फार क्षीण झालो आहे. [QE]
6. [QS]मी अरण्यातल्या घुबडाप्रमाणे झालो आहे. [QE][QS]मी ओसाड ठिकाणातल्या गरुडाप्रमाणे झालो आहे. [QE]
7. [QS]मी जागरण करीत आहे; [QE][QS]धाब्यावर एकटे राहणाऱ्या एकाकी पक्ष्याप्रमाणे मी आहे. [QE]
8. [QS]माझे शत्रू सर्व दिवस मला टोमणे मारतात; [QE][QS]ते माझी चेष्टा करतात माझे नाव वापरून शाप देतात. [QE]
9. [QS]मी राख भाकरीप्रमाणे खाल्ली आहे, [QE][QS]आणि माझ्या पाण्यात माझे अश्रू मिसळले आहेत. [QE]
10. [QS]कारण तुझ्या भयंकर क्रोधामुळे, [QE][QS]तू मला वर उचलून घेऊन खाली फेकून दिलेस. [QE]
11. [QS]माझे दिवस उतरत्या सावलीप्रमाणे झाले आहेत, [QE][QS]आणि गवतासारखा मी कोमेजून गेलो आहे. [QE]
12. [QS]पण हे परमेश्वरा, तू सर्वकाळ राजासनारूढ आहेस, [QE][QS]आणि तुझी कीर्ती सर्व पिढ्यांसाठी सर्वकाळ राहील. [QE]
13. [QS]तू उठून उभा राहशील आणि सियोनेवर दया करशील. [QE][QS]तिच्यावर दया करण्याची वेळ आता आली आहे; [QE][QS]नेमलेला वेळ आला आहे. [QE]
14. [QS]कारण तुझे सेवक तिच्या दगडांची आवड धरतात, [QE][QS]आणि तिच्या नासधूसाची धूळ पाहून त्यांना कळवळा येतो. [QE]
15. [QS]हे परमेश्वरा, राष्ट्रे तुझ्या नावाचा आदर करतील, [QE][QS]आणि पृथ्वीवरील सर्व राजे तुझ्या वैभवाचा सन्मान करतील. [QE]
16. [QS]परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल, [QE][QS]आणि तो आपल्या गौरवाने प्रगट होईल. [QE]
17. [QS]आणखी तो अनाथाच्या प्रार्थनेला प्रतिसाद देईल. [QE][QS]तो त्यांची प्रार्थना नाकारणार नाही. [QE]
18. [QS]पुढील पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल, [QE][QS]आणि अजून ज्या लोकांचा जन्म झाला नाही ते परमेश्वराची स्तुती करतील. [QE]
19. [QS]कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्रस्थानातून खाली पाहीले आहे. [QE][QS]परमेश्वराने स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहीले, [QE]
20. [QS]तो बंदिवानाचे कण्हणे ऐकेल, [QE][QS]ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठरवली होती त्यास सोडविले. [QE]
21. [QS]नंतर सियोनेतील लोक परमेश्वराचे नाव सांगतील, [QE][QS]आणि यरूशलेमेत त्याची स्तुती करतील. [QE]
22. [QS]जेव्हा परमेश्वराची एकत्र सेवा करण्यासाठी [QE][QS]सगळी राष्ट्रे एकत्र येतील. [QE]
23. [QS]त्याने माझी शक्ती जीवनाच्या मध्येच काढून घेतली. [QE][QS]त्याने माझे दिवस कमी केले. [QE]
24. [QS]मी म्हणालो, “हे माझ्या देवा, माझ्या जीवनाच्या मध्येच मला काढून घेऊ नकोस; [QE][QS]तू येथे सर्व पिढ्यानपिढ्यातून आहेस. [QE]
25. [QS]तू प्राचीन काळी पृथ्वीचा पाया घातला; [QE][QS]आकाश तुझ्या हातचे कार्य आहे. [QE]
26. [QS]ते नाहीसे होईल, पण तू राहशील; [QE][QS]ते सर्व कापडाप्रमाणे जीर्ण होतील; [QE][QS]कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील आणि ते नाहीसे होतील. [QE]
27. [QS]पण तू सारखाच आहे, [QE][QS]आणि तुझ्या वर्षांना अंत नाही. [QE]
28. [QS]तुझ्या सेवकांची मुले इथे कायम राहतील, [QE][QS]आणि त्यांचे वंशज तुझ्या उपस्थितीत इथे राहतील.” [QE]