1. {#1देवाच्या उपकारांबद्दल धन्यवाद }[PS]*दाविदाचे स्तोत्र. *[PE][PS]हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, [PE][QS]हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. [QE]
2. [QS]हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, [QE][QS]आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. [QE]
3. [QS]तो तुझ्या सर्व पापांची क्षमा करतो; [QE][QS]तो तुझे सर्व आजार बरे करतो. [QE]
4. [QS]तो तुझे आयुष्य नाशापासून खंडून घेतो; [QE][QS]तो तुला आपल्या विश्वासाच्या कराराने आणि करुणेच्या कृतीने मुकुट घालतो. [QE]
5. [QS]तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, [QE][QS]म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे पुन्हा नवे होते. [QE]
6. [QS]जे सर्व अन्यायाने पीडलेले आहेत; [QE][QS]त्यांच्यासाठी परमेश्वर नितीचे आणि न्यायाची कृत्ये करतो. [QE]
7. [QS]त्याने मोशेला आपले मार्ग, [QE][QS]इस्राएल वंशजांना आपल्या कृत्यांची ओळख करून दिली. [QE]
8. [QS]परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे; [QE][QS]तो सहनशील आहे; त्याच्यामध्ये महान कराराची विश्वासयोग्यता आहे. [QE]
9. [QS]तो नेहमीच शिक्षा करणार नाही; [QE][QS]तो नेहमीच रागावणार नाही. [QE]
10. [QS]तो आम्हाशी आमच्या पापास अनुरूप असे वागला नाही [QE][QS]किंवा आमच्या पापाला साजेसे प्रतिफळ दिले नाही. [QE]
11. [QS]कारण जसे पृथ्वीच्या वरती आकाश आहे, [QE][QS]तसे त्याचे जे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया आहे. [QE]
12. [QS]जसे पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे, [QE][QS]तसे त्याने आमच्या पापाचे दोष आम्हापासून काढून टाकले आहेत. [QE]
13. [QS]जसा पिता आपल्या मुलांवर करुणा करतो, [QE][QS]तसा परमेश्वर आपला सन्मान करतात त्यावर करुणा करतो. [QE]
14. [QS]कारण आम्ही कसे अस्तित्वात आलो हे तो जाणतो, [QE][QS]आम्ही धुळ आहोत हे त्यास माहित आहे. [QE]
15. [QS]मनुष्याच्या आयुष्याचे दिवस गवताप्रमाणे आहेत; [QE][QS]शेतातील फुलासारखा तो फुलतो. [QE]
16. [QS]वारा त्यावरून वाहून जातो आणि ते नाहीसे होते, [QE][QS]आणि कोणीही सांगू शकत नाही की, ते एकदा कोठे वाढत होते. [QE]
17. [QS]परंतु परमेश्वराची करार विश्वसनियता त्याचा आदर करणाऱ्यावर अनादिकालापासून अनंतकाळापर्यंत असते. [QE][QS]त्याचा न्यायीपणाचा विस्तार त्यांच्या वंशजापर्यंत होतो. [QE]
18. [QS]जे त्याचा करार पाळतात [QE][QS]आणि त्यांच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो. [QE]
19. [QS]परमेश्वराने आपले सिंहासन स्वर्गात स्थापले आहे, [QE][QS]आणि त्याचे राज्य प्रत्येकावर सत्ता गाजवते. [QE]
20. [QS]अहो जे तुम्ही त्याचे दूत आहात, [QE][QS]ज्या तुम्हास महान सामर्थ्य आहे आणि जे त्याचे शब्द ऐकून, [QE][QS]त्याच्या आज्ञांचे आज्ञाधारकपणे पालन करता, ते तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा. [QE]
21. [QS]अहो परमेश्वराच्या, सर्व सैन्यांनो जे तुम्ही त्याचे सेवक आहात; [QE][QS]ते तुम्ही त्याची इच्छा सिद्धीस नेता ते तुम्ही धन्यवादित आहात. [QE]
22. [QS]परमेश्वराच्या राज्यातील सर्व ठिकाणातील, [QE][QS]त्याच्या सर्व प्राण्यांनो त्याचा धन्यवाद करा; [QE][QS]हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर. [QE]