1. {#1देव आपल्या निर्मितीची काळजी घेतो [BR]उत्प. 1:1-31 } [QS]हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. [QE][QS]हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू अत्यंत थोर आहेस; [QE][QS]तू तेजस्विता आणि गौरव पांघरले आहेस. [QE]
2. [QS]जसे वस्राने तसे तू आपणाला प्रकाशाने झाकतोस; [QE][QS]तंबूच्या पडद्याप्रमाणे तू आकाश पसरतोस. [QE]
3. [QS]तू आपल्या खोल्यांच्या तुळ्या जलांमध्ये ठेवतो; [QE][QS]तू मेघांना आपले रथ करतोस; [QE][QS]तू वाऱ्यांच्या पंखावर चालतोस. [QE]
4. [QS]तू वाऱ्याला आपले दूत करतोस, [QE][QS]अग्नीच्या ज्वालांस आपले सेवक करतोस [QE]
5. [QS]त्याने पृथ्वीचा पाया घातला आहे, [QE][QS]आणि ती कधीही हलणार नाही. [QE]
6. [QS]तू पृथ्वीला वस्राप्रमाणे पाण्याने आच्छादिले आहेस; [QE][QS]पाण्याने पर्वत झाकले आहेत. [QE]
7. [QS]तुझ्या धमकीने पाणी मागे सरले आहे; [QE][QS]तुझ्या गर्जनेच्या आवाजाने ती पळाली. [QE]
8. [QS]ती पर्वतावरून जाऊन खाली दरितून वाहात गेली, [QE][QS]त्यांच्यासाठी नेमलेल्या जागी ती जाऊन राहिली. [QE]
9. [QS]तू त्यांना घालून दिलेल्या मर्यादा त्यांना ओलांडता येत नाही; [QE][QS]ते पृथ्वीला पुन्हा झाकून टाकणार नाहीत. [QE]
10. [QS]तो दऱ्यातून झरे वाहवितो; [QE][QS]डोंगरामधून प्रवाह वाहत जातात. [QE]
11. [QS]ते रानातल्या सर्व पशूंना पाणी पुरवितात; [QE][QS]रानगाढवे आपली तहान भागवितात. [QE]
12. [QS]नदीकिनारी पक्षी आपले घरटे बांधतात; [QE][QS]ते फांद्यामध्ये बसून गातात. [QE]
13. [QS]तो आपल्या वरच्या खोल्यातून पर्वतावर पाण्याचा वर्षाव करतो. [QE][QS]पृथ्वी त्याच्या श्रमाच्या फळाने भरली आहे. [QE]
14. [QS]तो गुरांढोरासाठी गवत उगवतो, [QE][QS]आणि मनुष्यांसाठी वनस्पतीची लागवड करतो; [QE][QS]यासाठी की, मनुष्याने जमिनितून अन्न उत्पन्न करावे. [QE]
15. [QS]तो मनुष्यास आनंदित करणारा द्राक्षरस, [QE][QS]त्याचा चेहरा चमकविणारे तेल, [QE][QS]आणि त्याचे जीवन जिवंत ठेवणारे अन्नही त्याने उत्पन्न करावी. [QE]
16. [QS]परमेश्वराचे वृक्ष, जे लबानोनाचे गंधसरू [QE][QS]त्याने लावले आहेत, ते रसभरित आहेत; [QE]
17. [QS]तेथे पक्षी आपली घरटी बांधतात. [QE][QS]करकोचा देवदारूचे झाड तिचे घर करतो. [QE]
18. [QS]रानबकऱ्या उंच पर्वतावर राहतात; [QE][QS]खडक सशांचे आश्रयस्थान आहे. [QE]
19. [QS]त्याने ऋतुमान समजण्यासाठी चंद्र नेमला आहे; [QE][QS]सूर्याला त्याची मावळण्याची वेळ कळते. [QE]
20. [QS]तू रात्रीला काळोख करतोस, [QE][QS]तेव्हा जंगलातील सर्व जनावरे बाहेर येतात. [QE]
21. [QS]तरुण सिंह आपल्या भक्ष्यासाठी गर्जना करतात, [QE][QS]आणि देवाकडे आपले अन्न मागतात. [QE]
22. [QS]जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा ते परत जातात, [QE][QS]आणि आपल्या गुहेत झोपतात. [QE]
23. [QS]दरम्यान लोक आपल्या कामासाठी बाहेर जातात, [QE][QS]आणि ते संध्याकाळपर्यंत कष्ट करतात. [QE]
24. [QS]हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती अधिक आणि किती विविध प्रकारची आहेत! [QE][QS]ती सर्व तुझ्या ज्ञानाने केली आहेत; [QE][QS]पृथ्वी तुझ्या समृद्धीने भरली आहे. [QE]
25. [QS]त्यावर हा समुद्र, खोल आणि अफाट आहे, [QE][QS]त्यामध्ये लहान व मोठे असंख्य प्राणी गजबजले आहेत. [QE]
26. [QS]तेथे त्यामध्ये जहाजे प्रवास करतात [QE][QS]आणि त्यामध्ये खेळण्यासाठी जो लिव्याथान तू निर्माण केला तोही तेथे आहे. [QE]
27. [QS]योग्य वेळी तू त्यांना त्यांचे अन्न द्यावे [QE][QS]म्हणून ते सर्व तुझ्याकडे पाहतात. [QE]
28. [QS]जेव्हा तू त्यांना देतोस, ते जमा करतात; [QE][QS]जेव्हा तू आपला हात उघडतोस तेव्हा त्यांची उत्तम पदार्थांनी तृप्ती होते. [QE]
29. [QS]जेव्हा तू आपले तोंड लपवतोस तेव्हा ते व्याकुळ होतात; [QE][QS]जर तू त्यांचा श्वास काढून घेतला, तर ते मरतात आणि परत मातीस मिळतात. [QE]
30. [QS]जेव्हा तू आपला आत्मा पाठवतोस, तेव्हा ते उत्पन्न होतात, [QE][QS]आणि तू भूप्रदेश पुन्हा नवीन करतोस. [QE]
31. [QS]परमेश्वराचे वैभव सर्वकाळ राहो; [QE][QS]परमेश्वरास आपल्या निर्मितीत आनंद होवो. [QE]
32. [QS]तो पृथ्वीवर खाली बघतो आणि ती थरथर कापते; [QE][QS]तो पर्वताला स्पर्श करतो आणि ते धुमसतात. [QE]
33. [QS]मी माझ्या आयुष्यभर परमेश्वरास गाणे गाईन. [QE][QS]जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे मी गुणगान करीन. [QE]
34. [QS]माझे विचार त्यास गोड वाटो; [QE][QS]परमेश्वराजवळ मला आनंद होईल. [QE]
35. [QS]पृथ्वीवरून पापी नष्ट होवोत, [QE][QS]आणि दुष्ट आणखी न उरोत. [QE][QS]हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर. [QE][QS]परमेश्वराची स्तुती करा. [QE]