1. {#1इस्त्राएलासाठी देवाने केलेला चमत्कार [BR]निर्ग. 7:8-10; 1 इति. 16:8-22 } [QS]परमेश्वरास धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा. [QE][QS]राष्ट्रांमध्ये त्याच्या कृत्यांची माहिती करून द्या. [QE]
2. [QS]त्यास गाणे गा, त्याची स्तुतीगीते गा; [QE][QS]त्याच्या सर्व आश्चर्यकारक कृत्यांविषयी बोला; [QE]
3. [QS]त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. [QE][QS]जे परमेश्वरास शोधतात त्यांचे हृदय आनंदित होवो. [QE]
4. [QS]परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य याचा शोध घ्या. [QE][QS]त्याच्या सान्निध्याचा सतत शोध घ्या. [QE]
5. [QS]त्याने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी, [QE][QS]त्याचे चमत्कार, आणि त्याच्या तोंडचे निर्णय आठवा. [QE]
6. [QS]तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशजहो, [QE][QS]तुम्ही त्याचे निवडलेले याकोबाचे लोकहो, [QE]
7. [QS]तो परमेश्वर आपला देव आहे. [QE][QS]त्याचे सर्व निर्णय पृथ्वीवर आहेत. [QE]
8. [QS]तो आपला करार म्हणजे [QE][QS]हजारो पिढ्यांसाठी आज्ञापिलेले आपले वचन सर्वकाळ आठवतो. [QE]
9. [QS]त्याने हा करार अब्राहामाबरोबर केला. [QE][QS]आणि त्याने इसहाकाशी शपथ वाहिली याची आठवण केली. [QE]
10. [QS]ही त्याने याकोबासाठी नियम, [QE][QS]आणि इस्राएलासाठी सर्वकाळासाठी करार असा कायम केला. [QE]
11. [QS]तो म्हणाला, “मी तुला कनान देश [QE][QS]तुझा वतनभाग असा म्हणून देईन.” [QE]
12. [QS]हे तो त्यांना म्हणाला तेव्हा ते संख्येने केवळ थोडके होते, [QE][QS]होय फार थोडे, आणि देशात परके होते. [QE]
13. [QS]ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात, [QE][QS]आणि एका राज्यातून दुसऱ्यात गेले. [QE]
14. [QS]त्याने कोणालाही त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; [QE][QS]त्यांच्यासाठी त्याने राजाला शिक्षा दिली. [QE]
15. [QS]तो म्हणाला, माझ्या अभिषिक्ताला स्पर्श करू नका, [QE][QS]आणि माझ्या संदेष्ट्यांची हानी करू नका. [QE]
16. [QS]त्याने त्या देशात दुष्काळ आणला. [QE][QS]त्याने त्यांचा भाकरीचा पुरवठा तोडून टाकला. [QE]
17. [QS]त्याने त्यांच्यापुढे एक मनुष्य पाठवला; [QE][QS]योसेफ गुलाम म्हणून विकला गेला. [QE]
18. [QS]त्यांचे पाय बेड्यांनी बांधले होते; [QE][QS]त्यास लोखंडी साखळ्या घातल्या होत्या. [QE]
19. [QS]त्याचे भाकीत खरे होण्याच्या वेळेपर्यंत, [QE][QS]परमेश्वराच्या वचनाने त्यास योग्य असे सिद्ध केले. [QE]
20. [QS]तेव्हा राजाने माणसे पाठविली आणि त्यांना सोडवीले; [QE][QS]लोकांच्या अधिपतीने त्यांना सोडून दिले. [QE]
21. [QS]त्याने त्यास आपल्या घराचा मुख्य, [QE][QS]आपल्या सर्व मालमत्तेवर अधिकारी नेमले, [QE]
22. [QS]अशासाठी की, त्याने आपल्या अधिपतींना नियंत्रणात ठेवावे, [QE][QS]आणि आपल्या वडिलांस ज्ञान शिकवावे. [QE]
23. [QS]नंतर इस्राएल मिसरात आले, [QE][QS]आणि याकोब हामाच्या देशात उपरी म्हणून राहिला. [QE]
24. [QS]देवाने आपले लोक फारच वाढवले, [QE][QS]आणि त्यांच्या शत्रूंपेक्षा त्यांना अधिक असंख्य केले. [QE]
25. [QS]आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा, [QE][QS]आपल्या सेवकांशी निष्ठूरतेने वागावे म्हणून त्याने शत्रूचे मन वळवले. [QE]
26. [QS]त्याने आपला सेवक मोशे [QE][QS]आणि आपण निवडलेला अहरोन यांना पाठविले. [QE]
27. [QS]त्यांनी मिसरच्या देशात त्यांच्यामध्ये अनेक चिन्हे, [QE][QS]हामाच्या देशात त्याचे आश्चर्ये करून दाखवली. [QE]
28. [QS]त्याने त्या देशात काळोख केला, [QE][QS]पण त्या लोकांनी त्याच्या आदेशाचे उल्लंघन केले नाही. [QE]
29. [QS]त्याने त्यांचे पाणी पालटून रक्त केले [QE][QS]आणि त्यांचे मासे मरण पावले. [QE]
30. [QS]त्यांचा देश बेडकांनी भरून गेला, [QE][QS]त्यांच्या अधिपतींच्या खोलीत देखील बेडूक होते. [QE]
31. [QS]तो बोलला, आणि गोमाशा व उवा [QE][QS]त्यांच्या सर्व प्रदेशात झाल्या. [QE]
32. [QS]त्याने त्यांच्या देशात विजा आणि मेघांचा गडगडाटाने [QE][QS]गारांचा वर्षाव व पाऊस पाठवला. [QE]
33. [QS]त्याने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे यांचा नाश केला. [QE][QS]त्याने त्यांच्या देशातले झाडे मोडून टाकली. [QE]
34. [QS]तो बोलला आणि टोळ आले. [QE][QS]असंख्य नाकतोडे आले. [QE]
35. [QS]टोळांनी त्यांच्या देशातली सर्व हिरवळ, [QE][QS]त्यांच्या भूमीचे सर्व पिके खाल्ले; [QE]
36. [QS]त्याने त्यांच्या देशातले प्रत्येक प्रथम जन्मलेले, [QE][QS]त्यांच्या सामर्थ्याचे सर्व प्रथमफळ ठार मारले. [QE]
37. [QS]त्याने इस्राएलांना सोने आणि रुपे घेऊन बाहेर आणले; [QE][QS]त्यांच्या मार्गात कोणताही वंश अडखळला नाही. [QE]
38. [QS]ते निघून गेल्याने मिसराला आनंद झाला, [QE][QS]कारण मिसऱ्यांना त्यांची भिती वाटत होती. [QE]
39. [QS]त्याने आच्छादनासाठी ढग पसरला, [QE][QS]आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्नी दिला. [QE]
40. [QS]इस्राएलांनी अन्नाची मागणी केली आणि त्याने लावे पक्षी आणले, [QE][QS]आणि त्यांना स्वर्गातून भाकर देऊन तृप्त केले. [QE]
41. [QS]त्याने खडक दुभागला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले; [QE][QS]ते नदीप्रमाणे वाळवटांत वाहू लागले. [QE]
42. [QS]कारण त्यास आपल्या पवित्र वचनाची, [QE][QS]आपला सेवक अब्राहाम ह्याची आठवण होती. [QE]
43. [QS]त्याने आपल्या लोकांस आनंद करीत, [QE][QS]त्याच्या निवडलेल्यांना विजयोत्सव करीत बाहेर आणले. [QE]
44. [QS]त्याने त्यांना राष्ट्रांचे देश दिले; [QE][QS]त्यांनी लोकांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या. [QE]
45. [QS]ह्यासाठी की, त्यांनी आपले नियम [QE][QS]आणि आपले नियमशास्त्र पाळावे. [QE][QS]परमेश्वराची स्तुती करा. [QE]