1. {इस्त्राएलाची बंडखोरी} [PS] परमेश्वराची स्तुती करा. [QBR] परमेश्वर चांगला आहे म्हणून त्यास धन्यवाद द्या. [QBR] कारण त्याची कराराची विश्वसनीयता सर्वकाळ टिकून राहते. [QBR]
2. परमेश्वराच्या पराक्रमाची कृत्ये कोण कथन करू शकेल? [QBR] किंवा त्याची सर्व स्तुत्य कृत्ये कोण पूर्ण जाहीर करील? [QBR]
3. जे काही योग्य आहे ते करतात [QBR] आणि ज्याची कृत्ये न्याय्य आहेत ते आशीर्वादित आहेत. [QBR]
4. हे परमेश्वरा, तू जेव्हा आपल्या लोकांवर कृपा दाखवतोस तेव्हा माझी आठवण कर; [QBR] तू त्यांना जेव्हा तारशील मला मदत कर. [QBR]
5. मग मी तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष पाहिन, परमेश्वरा, [QBR] तुझ्या राष्ट्रांच्या आनंदाने मी हर्ष करीन, [QBR] आणि तुझ्या वतनाबरोबर उत्सव करीन. [QBR]
6. आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले; [QBR] आम्ही चूक केली आणि आम्ही दुष्कृत्ये केली. [QBR]
7. आमच्या वडिलांनी मिसर देशात तुझ्या आश्चर्यकारक कृत्याचे महत्व ओळखले नाही; [QBR] त्यांनी तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले; [QBR] तर समुद्राजवळ, लाल समुद्राजवळ त्यांनी बंडखोरी केली. [QBR]
8. तरीसुद्धा, आपल्या नावाकरिता त्याने त्यांचे तारण केले, [QBR] यासाठी की, त्याने आपले सामर्थ्य उघड करावे. [QBR]
9. त्याने लाल समुद्राला धमकावले आणि तो कोरडा झाला. [QBR] मग त्याने त्यांना मैदानातून चालावे तसे खोल पाण्याच्या जागेतून नेले. [QBR]
10. त्यांचा द्वेष करणाऱ्याच्या हातातून त्याने त्यास वाचवले, [QBR] आणि त्यांना त्यांच्या शत्रूंच्या शक्तीपासून सोडवले. [QBR]
11. परंतु त्यांच्या शत्रूंना पाण्याने झाकून टाकले. [QBR] त्यापैकी एकही जण वाचला नाही. [QBR]
12. नंतर त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला [QBR] आणि त्यांनी त्याची स्तुती गाइली. [QBR]
13. परंतु ते लवकरच त्याने जे केले ते विसरले; [QBR] त्यांनी त्याच्या सूचनेची वाट पाहिली नाही. [QBR]
14. रानात त्यांची अतृप्त हाव अनावर झाली, [QBR] आणि त्यांनी देवाला आव्हान दिले. [QBR]
15. त्याने त्यांना त्यांच्या विनंतीप्रमाणे दिले, [QBR] पण त्याने रोग पाठवला तो त्यांचे शरीर नष्ट करू लागला. [QBR]
16. त्यांनी छावणीत मोशे [QBR] आणि परमेश्वराचा पवित्र याजक अहरोन यास चिडीस आणले. [QBR]
17. जमीन दुभंगली आणि तिने दाथानाला गिळून टाकले, [QBR] आणि अबीरामाच्या अनुयांना झाकून टाकले. [QBR]
18. त्यांच्यात अग्नीने पेट घेतला; [QBR] अग्नीने त्या दुष्टांना खाऊन टाकले. [QBR]
19. त्यांनी होरेबात सोन्याचे वासरू केले. [QBR] आणि त्यांनी त्या ओतीव मूर्तीची पूजा केली. [QBR]
20. त्यांनी गवत खाणाऱ्या बैलाच्या मूर्तीसाठी [QBR] आपल्या वैभवी देवाची अदलाबदल केली. [QBR]
21. ते आपल्या तारणाऱ्या देवाला विसरले, [QBR] ज्याने मिसरात महान कृत्ये केली होती. [QBR]
22. त्याने हामाच्या देशात आश्चर्यकारक गोष्टी केल्या [QBR] आणि लाल समुद्राजवळ पराक्रमी कृत्ये केली. [QBR]
23. म्हणून तो म्हणाला, आपण त्यांचा नाश करू. [QBR] जर त्याचा निवडलेला मोशे त्यास क्रोध त्यांचा नाश करण्यापासून मागे फिरायला, [QBR] त्याच्यापुढे खिंडारात उभा राहिला नसता तर त्याने तसे केले असते. [QBR]
24. नंतर त्यानीं फलदायी देश तुच्छ मानला; [QBR] त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला नाही, [QBR]
25. पण आपल्या तंबूत त्यांनी कुरकुर केली, [QBR] आणि परमेश्वराचा शब्द मानिला नाही. [QBR]
26. म्हणून त्याने त्यांच्याविषयी शपथ वाहिली की, [QBR] मी त्यांना रानात मरू देईन. [QBR]
27. त्यांचे वंशज राष्ट्रामध्ये विखरीन, [QBR] आणि त्यांना परक्या राष्ट्रांमध्ये विखरवून टाकीन. [QBR]
28. त्यांनी बआल-पौराची पूजा केली, [QBR] आणि मरण पावलेल्यांना अर्पण केलेले बली त्यांनी खाल्ले. [QBR]
29. त्यांनी त्यांच्या कृतीने त्यास कोपविले, [QBR] आणि त्यांच्यात मरी पसरली. [QBR]
30. पण फिनहास मध्यस्थी उठला; [QBR] आणि मरी बंद झाली. [QBR]
31. हे त्यास नितीमत्व असे [QBR] सर्व पिढ्यानपिढ्या सर्वकाळ गणण्यात आले. [QBR]
32. त्यांनी मरीबा येथील जलाजवळही त्यास संताप आणला, [QBR] आणि त्यांमुळे मोशेला दुःख सोसावे लागले. [QBR]
33. त्यांनी त्याच्यात कडवटपणा आणला, [QBR] आणि तो अविचाराने बोलला. [QBR]
34. परमेश्वराने त्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे [QBR] त्यांनी राष्ट्रांचा नाश केला नाही. [QBR]
35. पण ते अन्यजाती लोकांच्या राष्ट्रात मिसळले, [QBR] व त्यांचे मार्ग शिकले. [QBR]
36. आणि त्यांच्या मूर्तींची पूजा केली, [QBR] ते त्यांच्यासाठी सापळा बनले. [QBR]
37. त्यांनी आपली मुले आणि मुली यांचा भुतांना यज्ञ केला. [QBR]
38. त्यांनी निरपराध्यांचे रक्त पाडले, [QBR] त्यांनी आपली मुले आणि मुली, [QBR] ज्यांचा यज्ञ त्यांनी कनानाच्या मूर्तीस केला, [QBR] त्यांचे रक्त पाडले आणि भूमी रक्ताने विटाळली गेली. [QBR]
39. ते आपल्या कृत्यांनी अशुद्ध झाले, [QBR] आणि आपल्या कृतींत अनाचारी बनले. [QBR]
40. त्यामुळे परमेश्वर त्याच्या लोकांवर रागावला, [QBR] त्यास आपल्या स्वतःच्या वतनाचा वीट आला. [QBR]
41. त्याने त्यांना राष्ट्रांच्या हाती दिले, [QBR] आणि ज्यांनी त्यांचा द्वेष केला त्यांनी त्यांच्यावर राज्य केले. [QBR]
42. त्यांच्या शत्रूंनी त्यांना पीडीले, [QBR] आणि ते त्यांच्या अधिकाराखाली ते अधीन झाले. [QBR]
43. अनेक वेळा तो त्यांना मदत करण्यास आला, [QBR] पण ते त्याच्याविरुध्द बंड करीत राहीले, [QBR] आणि ते आपल्या पापाने नीच करण्यात आले. [QBR]
44. तथापि त्याने त्यांची मदतीसाठीची आरोळी ऐकली, [QBR] तेव्हा त्याने त्यांच्या क्लेशाकडे लक्ष दिले. [QBR]
45. त्यांच्यासाठी त्याने आपल्या कराराची आठवण केली, [QBR] आणि आपल्या अपार दयेने सौम्यता धारण केली. [QBR]
46. त्याने त्यांचा पाडाव करणाऱ्या सर्वांच्या मनात [QBR] त्यांच्यावर दया येईल असे केले. [QBR]
47. हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हास तार. [QBR] आम्हास राष्ट्रातून काढून एकत्र गोळा कर; [QBR] म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू आणि तुझे गुणगान करू. [QBR]
48. इस्राएलाचा देव, माझा परमेश्वर, [QBR] ह्याचा अनादिकालापासून अनंतकालापर्यंत धन्यवाद होवो. [QBR] सर्व लोकांनी म्हणावे, “आमेन.” [QBR] परमेश्वराची स्तुती करा. [PE]