1. {#1इस्त्राएलाची बंडखोरी } [QS]परमेश्वराची स्तुती करा. [QE][QS]परमेश्वर चांगला आहे म्हणून त्यास धन्यवाद द्या. [QE][QS]कारण त्याची कराराची विश्वसनीयता सर्वकाळ टिकून राहते. [QE]
2. [QS]परमेश्वराच्या पराक्रमाची कृत्ये कोण कथन करू शकेल? [QE][QS]किंवा त्याची सर्व स्तुत्य कृत्ये कोण पूर्ण जाहीर करील? [QE]
3. [QS]जे काही योग्य आहे ते करतात [QE][QS]आणि ज्याची कृत्ये न्याय्य आहेत ते आशीर्वादित आहेत. [QE]
4. [QS]हे परमेश्वरा, तू जेव्हा आपल्या लोकांवर कृपा दाखवतोस तेव्हा माझी आठवण कर; [QE][QS]तू त्यांना जेव्हा तारशील मला मदत कर. [QE]
5. [QS]मग मी तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष पाहिन, परमेश्वरा, [QE][QS]तुझ्या राष्ट्रांच्या आनंदाने मी हर्ष करीन, [QE][QS]आणि तुझ्या वतनाबरोबर उत्सव करीन. [QE]
6. [QS]आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले; [QE][QS]आम्ही चूक केली आणि आम्ही दुष्कृत्ये केली. [QE]
7. [QS]आमच्या वडिलांनी मिसर देशात तुझ्या आश्चर्यकारक कृत्याचे महत्व ओळखले नाही; [QE][QS]त्यांनी तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले; [QE][QS]तर समुद्राजवळ, लाल समुद्राजवळ त्यांनी बंडखोरी केली. [QE]
8. [QS]तरीसुद्धा, आपल्या नावाकरिता त्याने त्यांचे तारण केले, [QE][QS]यासाठी की, त्याने आपले सामर्थ्य उघड करावे. [QE]
9. [QS]त्याने लाल समुद्राला धमकावले आणि तो कोरडा झाला. [QE][QS]मग त्याने त्यांना मैदानातून चालावे तसे खोल पाण्याच्या जागेतून नेले. [QE]
10. [QS]त्यांचा द्वेष करणाऱ्याच्या हातातून त्याने त्यास वाचवले, [QE][QS]आणि त्यांना त्यांच्या शत्रूंच्या शक्तीपासून सोडवले. [QE]
11. [QS]परंतु त्यांच्या शत्रूंना पाण्याने झाकून टाकले. [QE][QS]त्यापैकी एकही जण वाचला नाही. [QE]
12. [QS]नंतर त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला [QE][QS]आणि त्यांनी त्याची स्तुती गाइली. [QE]
13. [QS]परंतु ते लवकरच त्याने जे केले ते विसरले; [QE][QS]त्यांनी त्याच्या सूचनेची वाट पाहिली नाही. [QE]
14. [QS]रानात त्यांची अतृप्त हाव अनावर झाली, [QE][QS]आणि त्यांनी देवाला आव्हान दिले. [QE]
15. [QS]त्याने त्यांना त्यांच्या विनंतीप्रमाणे दिले, [QE][QS]पण त्याने रोग पाठवला तो त्यांचे शरीर नष्ट करू लागला. [QE]
16. [QS]त्यांनी छावणीत मोशे [QE][QS]आणि परमेश्वराचा पवित्र याजक अहरोन यास चिडीस आणले. [QE]
17. [QS]जमीन दुभंगली आणि तिने दाथानाला गिळून टाकले, [QE][QS]आणि अबीरामाच्या अनुयांना झाकून टाकले. [QE]
18. [QS]त्यांच्यात अग्नीने पेट घेतला; [QE][QS]अग्नीने त्या दुष्टांना खाऊन टाकले. [QE]
19. [QS]त्यांनी होरेबात सोन्याचे वासरू केले. [QE][QS]आणि त्यांनी त्या ओतीव मूर्तीची पूजा केली. [QE]
20. [QS]त्यांनी गवत खाणाऱ्या बैलाच्या मूर्तीसाठी [QE][QS]आपल्या वैभवी देवाची अदलाबदल केली. [QE]
21. [QS]ते आपल्या तारणाऱ्या देवाला विसरले, [QE][QS]ज्याने मिसरात महान कृत्ये केली होती. [QE]
22. [QS]त्याने हामाच्या देशात आश्चर्यकारक गोष्टी केल्या [QE][QS]आणि लाल समुद्राजवळ पराक्रमी कृत्ये केली. [QE]
23. [QS]म्हणून तो म्हणाला, आपण त्यांचा नाश करू. [QE][QS]जर त्याचा निवडलेला मोशे त्यास क्रोध त्यांचा नाश करण्यापासून मागे फिरायला, [QE][QS]त्याच्यापुढे खिंडारात उभा राहिला नसता तर त्याने तसे केले असते. [QE]
24. [QS]नंतर त्यानीं फलदायी देश तुच्छ मानला; [QE][QS]त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला नाही, [QE]
25. [QS]पण आपल्या तंबूत त्यांनी कुरकुर केली, [QE][QS]आणि परमेश्वराचा शब्द मानिला नाही. [QE]
26. [QS]म्हणून त्याने त्यांच्याविषयी शपथ वाहिली की, [QE][QS]मी त्यांना रानात मरू देईन. [QE]
27. [QS]त्यांचे वंशज राष्ट्रामध्ये विखरीन, [QE][QS]आणि त्यांना परक्या राष्ट्रांमध्ये विखरवून टाकीन. [QE]
28. [QS]त्यांनी बआल-पौराची पूजा केली, [QE][QS]आणि मरण पावलेल्यांना अर्पण केलेले बली त्यांनी खाल्ले. [QE]
29. [QS]त्यांनी त्यांच्या कृतीने त्यास कोपविले, [QE][QS]आणि त्यांच्यात मरी पसरली. [QE]
30. [QS]पण फिनहास मध्यस्थी उठला; [QE][QS]आणि मरी बंद झाली. [QE]
31. [QS]हे त्यास नितीमत्व असे [QE][QS]सर्व पिढ्यानपिढ्या सर्वकाळ गणण्यात आले. [QE]
32. [QS]त्यांनी मरीबा येथील जलाजवळही त्यास संताप आणला, [QE][QS]आणि त्यांमुळे मोशेला दुःख सोसावे लागले. [QE]
33. [QS]त्यांनी त्याच्यात कडवटपणा आणला, [QE][QS]आणि तो अविचाराने बोलला. [QE]
34. [QS]परमेश्वराने त्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे [QE][QS]त्यांनी राष्ट्रांचा नाश केला नाही. [QE]
35. [QS]पण ते अन्यजाती लोकांच्या राष्ट्रात मिसळले, [QE][QS]व त्यांचे मार्ग शिकले. [QE]
36. [QS]आणि त्यांच्या मूर्तींची पूजा केली, [QE][QS]ते त्यांच्यासाठी सापळा बनले. [QE]
37. [QS]त्यांनी आपली मुले आणि मुली यांचा भुतांना यज्ञ केला. [QE]
38. [QS]त्यांनी निरपराध्यांचे रक्त पाडले, [QE][QS]त्यांनी आपली मुले आणि मुली, [QE][QS]ज्यांचा यज्ञ त्यांनी कनानाच्या मूर्तीस केला, [QE][QS]त्यांचे रक्त पाडले आणि भूमी रक्ताने विटाळली गेली. [QE]
39. [QS]ते आपल्या कृत्यांनी अशुद्ध झाले, [QE][QS]आणि आपल्या कृतींत अनाचारी बनले. [QE]
40. [QS]त्यामुळे परमेश्वर त्याच्या लोकांवर रागावला, [QE][QS]त्यास आपल्या स्वतःच्या वतनाचा वीट आला. [QE]
41. [QS]त्याने त्यांना राष्ट्रांच्या हाती दिले, [QE][QS]आणि ज्यांनी त्यांचा द्वेष केला त्यांनी त्यांच्यावर राज्य केले. [QE]
42. [QS]त्यांच्या शत्रूंनी त्यांना पीडीले, [QE][QS]आणि ते त्यांच्या अधिकाराखाली ते अधीन झाले. [QE]
43. [QS]अनेक वेळा तो त्यांना मदत करण्यास आला, [QE][QS]पण ते त्याच्याविरुध्द बंड करीत राहीले, [QE][QS]आणि ते आपल्या पापाने नीच करण्यात आले. [QE]
44. [QS]तथापि त्याने त्यांची मदतीसाठीची आरोळी ऐकली, [QE][QS]तेव्हा त्याने त्यांच्या क्लेशाकडे लक्ष दिले. [QE]
45. [QS]त्यांच्यासाठी त्याने आपल्या कराराची आठवण केली, [QE][QS]आणि आपल्या अपार दयेने सौम्यता धारण केली. [QE]
46. [QS]त्याने त्यांचा पाडाव करणाऱ्या सर्वांच्या मनात [QE][QS]त्यांच्यावर दया येईल असे केले. [QE]
47. [QS]हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हास तार. [QE][QS]आम्हास राष्ट्रातून काढून एकत्र गोळा कर; [QE][QS]म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू आणि तुझे गुणगान करू. [QE]
48. [QS]इस्राएलाचा देव, माझा परमेश्वर, [QE][QS]ह्याचा अनादिकालापासून अनंतकालापर्यंत धन्यवाद होवो. [QE][QS]सर्व लोकांनी म्हणावे, “आमेन.” [QE][QS]परमेश्वराची स्तुती करा. [QE]