1. {देव विपत्तीतून सोडवतो} [PS] परमेश्वरास धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. [QBR] आणि त्याची कराराची विश्वसनियता सर्वकाळ टिकणारी आहे. [QBR]
2. परमेश्वराने उद्धारलेले, ज्यांना खंडणी भरून [QBR] त्याने शत्रूच्या अधिकारातून सोडवले आहे, [QBR]
3. त्याने त्यांना परक्या देशातून [QBR] पूर्व व पश्चिम, उत्तर व दक्षिण [QBR] या दिशातून एकवट केले आहे. [QBR]
4. ते रानात वैराण प्रदेशातील रस्त्याने भटकले; [QBR] आणि त्यांना राहण्यास नगर सापडले नाही. [QBR]
5. ते खूप भुकेले आणि तान्हेले होते; [QBR] आणि ते थकव्याने मूर्च्छित झाले. [QBR]
6. नंतर त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली, [QBR] आणि त्याने त्यांना त्यांच्या विपत्तीतून सोडवले. [QBR]
7. त्याने त्यांना सरळ मार्गाने नेले [QBR] यासाठी की, त्या नगरात त्यांना वस्त्ती करावी [QBR]
8. अहा, परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता [QBR] आणि आश्चर्यकारक गोष्टी त्याने मनुष्यजातीसाठी केल्या त्याबद्दल लोक त्याचा धन्यवाद करोत. [QBR]
9. कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले, [QBR] आणि भुकेल्या जिवाला उत्तम पदार्थांनी भरले. [QBR]
10. काही कैदी क्लेशाने आणि साखळ्यांनी जखडलेले असता; [QBR] काळोखात आणि मरणाच्या छायेत बसले आहेत. [QBR]
11. त्यांनी देवाच्या वचनाविरुध्द बंड केले, [QBR] आणि त्यांनी परात्पराचे शिक्षण नापसंत केले. [QBR]
12. त्यांने त्यांचे हृदय कष्टाद्वारे नम्र केले; [QBR] ते अडखळून पडले आणि त्यांना मदत करायला तेथे कोणीही नव्हता. [QBR]
13. तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली [QBR] आणि त्याने त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणले. [QBR]
14. देवाने त्यांना अंधारातून आणि मरणाच्या छायेतून बाहेर आणले, [QBR] आणि त्यांची बंधणे तोडली. [QBR]
15. परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता [QBR] आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टीबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत. [QBR]
16. कारण त्याने पितळेची दारे तोडली, [QBR] आणि लोखंडाचे गज तोडून टाकले. [QBR]
17. आपल्या बंडखोरीच्या मार्गात ते मूर्ख होते, [QBR] आणि आपल्या पापामुळे ते पीडिले होते. [QBR]
18. सर्व उत्तम अन्न खाण्याची इच्छा त्यांना होईना [QBR] आणि ते मरणाच्या दाराजवळ ओढले गेले. [QBR]
19. तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली, [QBR] आणि त्याने त्यांना क्लेशातून बाहेर आणले. [QBR]
20. त्याने आपले वचन पाठवून त्यांना बरे केले, [QBR] आणि त्याने त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवले. [QBR]
21. परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता [QBR] व त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत. [QBR]
22. ते त्यास आभाररुपी यज्ञ अर्पण करोत, [QBR] आणि गाण्यात त्याची कृत्ये जाहीर करोत. [QBR]
23. काही जहाजातून समुद्र प्रवास करतात, [QBR] आणि महासागरापार व्यवसाय करतात. [QBR]
24. ते परमेश्वराची कृत्ये पाहतात, [QBR] आणि त्याची अद्भुत कृत्ये समुद्रावर पाहतात. [QBR]
25. कारण तो आज्ञा करतो आणि वादळ उठवितो; [QBR] तेव्हा समुद्र खवळतो. [QBR]
26. लाटा आकाशापर्यंत वर पोहचतात, मग त्या खाली खोल तळाकडे जातात. [QBR] मनुष्याचे धैर्य धोक्यामुळे गळून जाते. [QBR]
27. ते मद्याप्यासारखे डुलतात आणि झोकांड्या खातात, [QBR] आणि त्यांची बुद्धी गुंग होते. [QBR]
28. तेव्हा ते आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारतात, [QBR] आणि तो त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणून वाचवतो. [QBR]
29. तो वादळ शांत करतो, [QBR] आणि लाटांना स्तब्ध करतो. [QBR]
30. समुद्र शांत झाल्यामुळे ते आनंद करतात, [QBR] तो त्यांना त्यांच्या इच्छित बंदरास आणतो. [QBR]
31. परमेश्वरास त्याच्या कराराची विश्वसनियता [QBR] आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत. [QBR]
32. लोकांच्या मंडळीत तो उंचविला जावो [QBR] आणि वडिलांच्या सभेत त्याची स्तुती होवो. [QBR]
33. तो नद्यांना रान करतो, [QBR] पाण्याच्या झऱ्यांची कोरडी भूमी करतो, [QBR]
34. आणि फलदायी जमिनीची नापीक जमिन करतो. [QBR] कारण तेथील राहणाऱ्या वाईट लोकांमुळे. [QBR]
35. तो वाळवंटाचे पाण्याचे तळे करतो, [QBR] आणि कोरडी भूमीतून पाण्याचे झरे करतो. [QBR]
36. तेथे भुकेल्यास वसवतो, [QBR] आणि त्यामध्ये राहण्यासाठी नगर बांधतो. [QBR]
37. ते नगरे बांधतात त्यामध्ये शेते पेरतात, द्राक्षमळे लावतात, [QBR] आणि विपुल पिके काढतात. [QBR]
38. तो त्यास आशीर्वाद देतो आणि त्यांची खूप वाढ होते, [QBR] तो त्यांच्या गुरांना कमी होऊ देत नाही. [QBR]
39. नंतर यातनामयी अरिष्ट आणि दुःख यांमुळे [QBR] ते कमी होतात आणि नष्ट होतात. [QBR]
40. तो शत्रूंच्या अधिपतीवर अपमान ओततो, [QBR] आणि त्यांना रस्ते नसलेल्या रानातून भटकायला लावतो. [QBR]
41. पण तो गरजवंताना क्लेशापासून सुरक्षित ठेवतो, [QBR] आणि त्यांच्या कुटुंबांची कळपासारखी काळजी घेतो. [QBR]
42. सरळ मनाचे हे पाहतात आणि आनंदी होतात, [QBR] आणि सर्व दुष्ट आपले तोंड बंद करतात. [QBR]
43. जो कोणी ज्ञानी आहे त्याने ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे [QBR] आणि परमेश्वराच्या कराराच्या विश्वसनीयतेच्या कृतीवर मनन करावे. [PE]