1. {#1सूडासाठी याचना }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]हे माझ्या स्तवनाच्या देवा, शांत राहू नको. [QE]
2. [QS]कारण दुष्ट आणि कपटी माझ्यावर हल्ला करतात; [QE][QS]ते माझ्याविरूद्ध खोटे बोलतात. [QE]
3. [QS]त्यांनी मला वेढले आहे आणि माझ्याबद्दल द्वेषयुक्त गोष्टी सांगतात. [QE][QS]आणि ते विनाकारण माझ्यावर हल्ला करतात. [QE]
4. [QS]माझ्या प्रेमाच्या बदल्यात ते माझी निंदानालस्ती करतात. [QE][QS]पण मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. [QE]
5. [QS]मी केलेल्या चांगल्यासाठी वाईट, [QE][QS]आणि त्यांनी माझ्या प्रीतीची फेड द्वेषाने केली. [QE]
6. [QS]या लोकांवर तू दुर्जन मनुष्यास शत्रूसारखा नेम; [QE][QS]त्यांच्या उजव्या हाताकडे आरोप करणाऱ्याला उभा ठेव. [QE]
7. [QS]जेव्हा त्याचा न्याय होईल, तेव्हा तो अपराधी म्हणून सापडो; [QE][QS]त्याची प्रार्थना पापच मानली जावो. [QE]
8. [QS]त्याचे दिवस थोडे होवोत; [QE][QS]दुसरा त्याचा अधिकार घेवो; [QE]
9. [QS]त्याची मुले पितृहीन [QE][QS]आणि त्याची पत्नी विधवा होवो. [QE]
10. [QS]त्याची मुले इकडे तिकडे भटकत आणि भीक मागत फिरोत, [QE][QS]ती आपल्या ओसाड ठिकाणाहून दूर जाऊन निवेदन करोत. [QE]
11. [QS]सावकार त्यांचे सर्वस्व हिरावून घेवो; [QE][QS]त्याची कमाई परके लुटून घेवोत; [QE]
12. [QS]त्यांना कोणीही दया देऊ नये; [QE][QS]त्याच्या पितृहीन मुलांची कोणीही कीव करू नये. [QE]
13. [QS]त्याचे वंशज कापून टाकली जावोत; [QE][QS]पुढच्या पिढीत त्याचे नाव खोडले जावो. [QE]
14. [QS]परमेश्वरास त्याच्या पूर्वजांच्या पापांची आठवण राहो. [QE][QS]त्याच्या आईची पापे कधीही विसरली न जावोत. [QE]
15. [QS]परमेश्वरापुढे त्यांचे पातक सदैव असोत; [QE][QS]परमेश्वर त्यांचे स्मरण पृथ्वीवरून काढून टाको. [QE]
16. [QS]कारण या मनुष्याने कधीही दया दाखविण्याची पर्वा केली नाही, [QE][QS]परंतु त्याऐवजी पीडलेल्यांचा छळ आणि गरजवंत [QE][QS]व धैर्य खचलेल्यांचा वध केला. [QE]
17. [QS]त्यास शाप देणे आवडते, म्हणून तो परत त्याच्यावर आला. [QE][QS]त्याने आशीर्वादाचा द्वेष केला; म्हणून त्याच्यावर आशीर्वाद आले नाहीत. [QE]
18. [QS]त्याने त्याच्या वस्राप्रमाणे आपल्याला शापाचे वस्र पांघरले, [QE][QS]आणि त्याचे शाप हे पाण्याप्रमाणे त्याच्या अंतर्यामात, [QE][QS]तेलासारखे त्याच्या हाडात आले. [QE]
19. [QS]त्याचे शाप त्यास पांघरावयाच्या वस्राप्रमाणे होवो, [QE][QS]ते नेहमी वापरावयाच्या कंबरपट्ट्याप्रमाणे तो त्यास वेढून राहो. [QE]
20. [QS]माझ्या आरोप्यास, [QE][QS]माझ्याविरूद्ध वाईट बोलणाऱ्यास परमेश्वराकडून हेच प्रतिफळ आहे [QE]
21. [QS]हे परमेश्वरा, माझा प्रभू, कृपा करून तुझ्या नावाकरता मला वागवून घे. [QE][QS]कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे म्हणून मला वाचव. [QE]
22. [QS]कारण मी पीडित आणि गरजवंत आहे, [QE][QS]आणि माझे हृदय माझ्यामध्ये घायाळ झाले आहे. [QE]
23. [QS]मी संध्याकाळच्या सावल्यांप्रमाणे दिसेनासा झालो आहे; [QE][QS]मी टोळाप्रमाणे हुसकावला जात आहे. [QE]
24. [QS]उपासाने माझे गुडघे अशक्त झाले आहेत; [QE][QS]मी त्वचा आणि हाडे असा होत आहे. [QE]
25. [QS]माझा विरोध्यास मी निंदेचा विषय झालो आहे, [QE][QS]ते जेव्हा माझ्याकडे बघतात, तेव्हा आपले डोके हालवतात. [QE]
26. [QS]हे माझ्या परमेश्वरा, माझ्या देवा, मला मदत कर; [QE][QS]तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझा उध्दार कर. [QE]
27. [QS]हे परमेश्वरा, त्यांनी हे जाणावे की, [QE][QS]ही तुझी करणी आहे, तूच हे केले आहेस. [QE]
28. [QS]जरी त्यांनी मला शाप दिला, पण कृपा करून मला आशीर्वाद दे; [QE][QS]जेव्हा ते हल्ला करतील, तेव्हा ते लज्जित होतील, [QE][QS]परंतु तुझा सेवक आनंदी होईल. [QE]
29. [QS]माझे विरोधी वस्राप्रमाणे लाज पांघरतील, [QE][QS]आणि ते त्यांची लाज झग्याप्रमाणे पांघरतील. [QE]
30. [QS]मी आनंदाने आपल्या मुखाने मनापासून परमेश्वरास धन्यवाद देईन; [QE][QS]लोकसमुदायासमोर मी त्याची स्तुती करीन. [QE]
31. [QS]कारण तो पीडितांना धमकी देणाऱ्यांपासून, [QE][QS]त्यांचे तारण करायला तो त्यांच्या उजव्या हाताला उभा राहतो. [QE]