1. {सूडासाठी याचना} [PS] हे माझ्या स्तवनाच्या देवा, शांत राहू नको. [QBR]
2. कारण दुष्ट आणि कपटी माझ्यावर हल्ला करतात; [QBR] ते माझ्याविरूद्ध खोटे बोलतात. [QBR]
3. त्यांनी मला वेढले आहे आणि माझ्याबद्दल द्वेषयुक्त गोष्टी सांगतात. [QBR] आणि ते विनाकारण माझ्यावर हल्ला करतात. [QBR]
4. माझ्या प्रेमाच्या बदल्यात ते माझी निंदानालस्ती करतात. [QBR] पण मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. [QBR]
5. मी केलेल्या चांगल्यासाठी वाईट, [QBR] आणि त्यांनी माझ्या प्रीतीची फेड द्वेषाने केली. [QBR]
6. या लोकांवर तू दुर्जन मनुष्यास शत्रूसारखा नेम; [QBR] त्यांच्या उजव्या हाताकडे आरोप करणाऱ्याला उभा ठेव. [QBR]
7. जेव्हा त्याचा न्याय होईल, तेव्हा तो अपराधी म्हणून सापडो; [QBR] त्याची प्रार्थना पापच मानली जावो. [QBR]
8. त्याचे दिवस थोडे होवोत; [QBR] दुसरा त्याचा अधिकार घेवो; [QBR]
9. त्याची मुले पितृहीन [QBR] आणि त्याची पत्नी विधवा होवो. [QBR]
10. त्याची मुले इकडे तिकडे भटकत आणि भीक मागत फिरोत, [QBR] ती आपल्या ओसाड ठिकाणाहून दूर जाऊन निवेदन करोत. [QBR]
11. सावकार त्यांचे सर्वस्व हिरावून घेवो; [QBR] त्याची कमाई परके लुटून घेवोत; [QBR]
12. त्यांना कोणीही दया देऊ नये; [QBR] त्याच्या पितृहीन मुलांची कोणीही कीव करू नये. [QBR]
13. त्याचे वंशज कापून टाकली जावोत; [QBR] पुढच्या पिढीत त्याचे नाव खोडले जावो. [QBR]
14. परमेश्वरास त्याच्या पूर्वजांच्या पापांची आठवण राहो. [QBR] त्याच्या आईची पापे कधीही विसरली न जावोत. [QBR]
15. परमेश्वरापुढे त्यांचे पातक सदैव असोत; [QBR] परमेश्वर त्यांचे स्मरण पृथ्वीवरून काढून टाको. [QBR]
16. कारण या मनुष्याने कधीही दया दाखविण्याची पर्वा केली नाही, [QBR] परंतु त्याऐवजी पीडलेल्यांचा छळ आणि गरजवंत [QBR] व धैर्य खचलेल्यांचा वध केला. [QBR]
17. त्यास शाप देणे आवडते, म्हणून तो परत त्याच्यावर आला. [QBR] त्याने आशीर्वादाचा द्वेष केला; म्हणून त्याच्यावर आशीर्वाद आले नाहीत. [QBR]
18. त्याने त्याच्या वस्राप्रमाणे आपल्याला शापाचे वस्र पांघरले, [QBR] आणि त्याचे शाप हे पाण्याप्रमाणे त्याच्या अंतर्यामात, [QBR] तेलासारखे त्याच्या हाडात आले. [QBR]
19. त्याचे शाप त्यास पांघरावयाच्या वस्राप्रमाणे होवो, [QBR] ते नेहमी वापरावयाच्या कंबरपट्ट्याप्रमाणे तो त्यास वेढून राहो. [QBR]
20. माझ्या आरोप्यास, [QBR] माझ्याविरूद्ध वाईट बोलणाऱ्यास परमेश्वराकडून हेच प्रतिफळ आहे [QBR]
21. हे परमेश्वरा, माझा प्रभू, कृपा करून तुझ्या नावाकरता मला वागवून घे. [QBR] कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे म्हणून मला वाचव. [QBR]
22. कारण मी पीडित आणि गरजवंत आहे, [QBR] आणि माझे हृदय माझ्यामध्ये घायाळ झाले आहे. [QBR]
23. मी संध्याकाळच्या सावल्यांप्रमाणे दिसेनासा झालो आहे; [QBR] मी टोळाप्रमाणे हुसकावला जात आहे. [QBR]
24. उपासाने माझे गुडघे अशक्त झाले आहेत; [QBR] मी त्वचा आणि हाडे असा होत आहे. [QBR]
25. माझा विरोध्यास मी निंदेचा विषय झालो आहे, [QBR] ते जेव्हा माझ्याकडे बघतात, तेव्हा आपले डोके हालवतात. [QBR]
26. हे माझ्या परमेश्वरा, माझ्या देवा, मला मदत कर; [QBR] तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझा उध्दार कर. [QBR]
27. हे परमेश्वरा, त्यांनी हे जाणावे की, [QBR] ही तुझी करणी आहे, तूच हे केले आहेस. [QBR]
28. जरी त्यांनी मला शाप दिला, पण कृपा करून मला आशीर्वाद दे; [QBR] जेव्हा ते हल्ला करतील, तेव्हा ते लज्जित होतील, [QBR] परंतु तुझा सेवक आनंदी होईल. [QBR]
29. माझे विरोधी वस्राप्रमाणे लाज पांघरतील, [QBR] आणि ते त्यांची लाज झग्याप्रमाणे पांघरतील. [QBR]
30. मी आनंदाने आपल्या मुखाने मनापासून परमेश्वरास धन्यवाद देईन; [QBR] लोकसमुदायासमोर मी त्याची स्तुती करीन. [QBR]
31. कारण तो पीडितांना धमकी देणाऱ्यांपासून, [QBR] त्यांचे तारण करायला तो त्यांच्या उजव्या हाताला उभा राहतो. [PE]