1. {देव राजाला राज्य देतो} PS माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो “तुझ्या शत्रूंना
तुझे पादासन करीपर्यंत माझ्या उजव्या बाजूला बस.” |
2. परमेश्वर म्हणतो, तुझ्या सामर्थ्याची काठी सियोनेपासून पुढे चालवील;
तू आपल्या शत्रूंवर राज्य करशील. |
3. तुझे वैभवशाली सामर्थ्य दाखवण्याच्या दिवशी पवित्र पर्वतावर तुझे लोक स्वसंतोषाने पुढे होतात,
पहाटेच्या उदरातून आलेले दवासारखे तुझे तरुण तुला आहेत. |
4. परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो बदलणार नाही,
“तू मलकीसदेकाच्या प्रकाराप्रमाणे तू सर्वकाळ याजक आहेस.” |