मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतो } [QS]परमेश्वराची स्तुती करा. [QE][QS]सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत मी परमेश्वरास अगदी मनापासून धन्यवाद देईल. [QE]
2. [QS]परमेश्वराचे कार्य महान आहेत, [QE][QS]जे सर्व त्याची आवड धरतात ते उत्सुकतेने त्याची प्रतीक्षा करतात. [QE]
3. [QS]त्याचे कार्य ऐश्वर्यशाली आणि वैभवशाली आहे, [QE][QS]आणि त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते. [QE]
4. [QS]त्याच्या आश्चर्यकारक गोष्टी आठवणीत राहतील असे त्याने केले; [QE][QS]परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. [QE]
5. [QS]तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्यांना अन्न देतो. [QE][QS]तो आपला करार नेहमी आठवतो. [QE]
6. [QS]त्याने आपल्या लोकांस राष्ट्रांचे वतन देऊन, [QE][QS]आपली सामर्थ्याची कार्ये दाखवली आहेत. [QE]
7. [QS]त्याच्या हातचे कार्य सत्य व न्याय्य आहे; [QE][QS]त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत. [QE]
8. [QS]ते प्रामाणिकपणाने आणि योग्य रीतीने नेमिलेले आहेत, [QE][QS]ते सर्वकाळासाठी स्थापिले आहेत. [QE]
9. [QS]त्याने आपल्या लोकांस विजय दिला आहे; [QE][QS]त्याने आपला करार सर्वकाळासाठी ठरवला आहे, [QE][QS]देवाचे नाव पवित्र व भितीदायक आहे. [QE]
10. [QS]परमेश्वराचे भय शहाणपणाची सुरुवात आहे; [QE][QS]जे त्याप्रमाणे वागतात त्यास सुबुद्धी प्राप्त होते. [QE][QS]त्याची स्तुती सर्वकाळ टिकून राहील. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 111 / 150
परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतो 1 परमेश्वराची स्तुती करा. सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत मी परमेश्वरास अगदी मनापासून धन्यवाद देईल. 2 परमेश्वराचे कार्य महान आहेत, जे सर्व त्याची आवड धरतात ते उत्सुकतेने त्याची प्रतीक्षा करतात. 3 त्याचे कार्य ऐश्वर्यशाली आणि वैभवशाली आहे, आणि त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते. 4 त्याच्या आश्चर्यकारक गोष्टी आठवणीत राहतील असे त्याने केले; परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. 5 तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्यांना अन्न देतो. तो आपला करार नेहमी आठवतो. 6 त्याने आपल्या लोकांस राष्ट्रांचे वतन देऊन, आपली सामर्थ्याची कार्ये दाखवली आहेत. 7 त्याच्या हातचे कार्य सत्य व न्याय्य आहे; त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत. 8 ते प्रामाणिकपणाने आणि योग्य रीतीने नेमिलेले आहेत, ते सर्वकाळासाठी स्थापिले आहेत. 9 त्याने आपल्या लोकांस विजय दिला आहे; त्याने आपला करार सर्वकाळासाठी ठरवला आहे, देवाचे नाव पवित्र व भितीदायक आहे. 10 परमेश्वराचे भय शहाणपणाची सुरुवात आहे; जे त्याप्रमाणे वागतात त्यास सुबुद्धी प्राप्त होते. त्याची स्तुती सर्वकाळ टिकून राहील.
Total 150 अध्याय, Selected धडा 111 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References