मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतो} [PS] परमेश्वराची स्तुती करा. [QBR] सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत मी परमेश्वरास अगदी मनापासून धन्यवाद देईल. [QBR]
2. परमेश्वराचे कार्य महान आहेत, [QBR] जे सर्व त्याची आवड धरतात ते उत्सुकतेने त्याची प्रतीक्षा करतात. [QBR]
3. त्याचे कार्य ऐश्वर्यशाली आणि वैभवशाली आहे, [QBR] आणि त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते. [QBR]
4. त्याच्या आश्चर्यकारक गोष्टी आठवणीत राहतील असे त्याने केले; [QBR] परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. [QBR]
5. तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्यांना अन्न देतो. [QBR] तो आपला करार नेहमी आठवतो. [QBR]
6. त्याने आपल्या लोकांस राष्ट्रांचे वतन देऊन, [QBR] आपली सामर्थ्याची कार्ये दाखवली आहेत. [QBR]
7. त्याच्या हातचे कार्य सत्य व न्याय्य आहे; [QBR] त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत. [QBR]
8. ते प्रामाणिकपणाने आणि योग्य रीतीने नेमिलेले आहेत, [QBR] ते सर्वकाळासाठी स्थापिले आहेत. [QBR]
9. त्याने आपल्या लोकांस विजय दिला आहे; [QBR] त्याने आपला करार सर्वकाळासाठी ठरवला आहे, [QBR] देवाचे नाव पवित्र व भितीदायक आहे. [QBR]
10. परमेश्वराचे भय शहाणपणाची सुरुवात आहे; [QBR] जे त्याप्रमाणे वागतात त्यास सुबुद्धी प्राप्त होते. [QBR] त्याची स्तुती सर्वकाळ टिकून राहील. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 111 / 150
स्तोत्रसंहिता 111:169
परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतो 1 परमेश्वराची स्तुती करा. सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत मी परमेश्वरास अगदी मनापासून धन्यवाद देईल. 2 परमेश्वराचे कार्य महान आहेत, जे सर्व त्याची आवड धरतात ते उत्सुकतेने त्याची प्रतीक्षा करतात. 3 त्याचे कार्य ऐश्वर्यशाली आणि वैभवशाली आहे, आणि त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते. 4 त्याच्या आश्चर्यकारक गोष्टी आठवणीत राहतील असे त्याने केले; परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. 5 तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्यांना अन्न देतो. तो आपला करार नेहमी आठवतो. 6 त्याने आपल्या लोकांस राष्ट्रांचे वतन देऊन, आपली सामर्थ्याची कार्ये दाखवली आहेत. 7 त्याच्या हातचे कार्य सत्य व न्याय्य आहे; त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत. 8 ते प्रामाणिकपणाने आणि योग्य रीतीने नेमिलेले आहेत, ते सर्वकाळासाठी स्थापिले आहेत. 9 त्याने आपल्या लोकांस विजय दिला आहे; त्याने आपला करार सर्वकाळासाठी ठरवला आहे, देवाचे नाव पवित्र व भितीदायक आहे. 10 परमेश्वराचे भय शहाणपणाची सुरुवात आहे; जे त्याप्रमाणे वागतात त्यास सुबुद्धी प्राप्त होते. त्याची स्तुती सर्वकाळ टिकून राहील.
Total 150 अध्याय, Selected धडा 111 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References