1. {मृत्यूपासून सुटका झाल्याबद्दल उपकारस्तुती} [PS] मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो [QBR] माझी वाणी आणि माझ्या विनंत्या दयेसाठी ऐकतो. [QBR]
2. कारण तो माझे ऐकतो, [QBR] म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्यास हाक मारीन. [QBR]
3. मृत्यूचे दोर माझ्याभोवती आवळले, [QBR] आणि मला अधोलोकांच्या यातना झाल्या, [QBR] संकट व क्लेश मला झाले. [QBR]
4. नंतर मी परमेश्वराच्या नावाचा धावा केला, [QBR] “हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, मला वाचव.” [QBR]
5. परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे; [QBR] आमचा देव कनवाळू आहे. [QBR]
6. परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो; [QBR] मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझे तारण केले. [QBR]
7. हे माझ्या जिवा तू आपल्या विश्रामस्थानी परत ये; [QBR] कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत. [QBR]
8. तू माझा जीव मृत्यूपासून, [QBR] माझे डोळे अश्रूपासून, [QBR] आणि माझे पाय अडखळण्यापासून मुक्त केले आहेत. [QBR]
9. जीवंताच्या भूमित परमेश्वराची [QBR] सेवा करणे मी चालूच ठेवीन. [QBR]
10. मी फार पीडित आहे [QBR] असे जेव्हा मी म्हणालो, तरी माझा त्याच्यावर विश्वास आहे. [QBR]
11. मी अविचाराने म्हणालो की, [QBR] सगळे माणसे खोटारडे आहेत. [QBR]
12. परमेश्वराने माझ्यावर केलेल्या [QBR] सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू? [QBR]
13. मी तारणाचा प्याला उंचावून [QBR] परमेश्वराच्या नावाने हाक मारीन. [QBR]
14. त्याच्या सर्व लोकांसमोर, [QBR] मी परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन. [QBR]
15. परमेश्वराच्या दृष्टीने [QBR] त्याच्या भक्तांचा मृत्यू अमोल आहे. [QBR]
16. हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा सेवक आहे; [QBR] मी तुझा सेवक, तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे; [QBR] माझी बंधने तू सोडली आहेस. [QBR]
17. मी तुला उपकाराचा यज्ञ अर्पण करीन [QBR] आणि मी परमेश्वराचे नामस्मरण करीन. [QBR]
18. मी त्याच्या सर्व लोकांसमोर [QBR] परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन. [QBR]
19. परमेश्वराच्या घराच्या अंगणात, [QBR] यरूशलेमा तुझ्यामध्ये ते फेडीन. [QBR] परमेश्वराची स्तुती करा. [PE]