1. {#1मृत्यूपासून सुटका झाल्याबद्दल उपकारस्तुती } [QS]मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो [QE][QS]माझी वाणी आणि माझ्या विनंत्या दयेसाठी ऐकतो. [QE]
2. [QS]कारण तो माझे ऐकतो, [QE][QS]म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्यास हाक मारीन. [QE]
3. [QS]मृत्यूचे दोर माझ्याभोवती आवळले, [QE][QS]आणि मला अधोलोकांच्या यातना झाल्या, [QE][QS]संकट व क्लेश मला झाले. [QE]
4. [QS]नंतर मी परमेश्वराच्या नावाचा धावा केला, [QE][QS]“हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, मला वाचव.” [QE]
5. [QS]परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे; [QE][QS]आमचा देव कनवाळू आहे. [QE]
6. [QS]परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो; [QE][QS]मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझे तारण केले. [QE]
7. [QS]हे माझ्या जिवा तू आपल्या विश्रामस्थानी परत ये; [QE][QS]कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत. [QE]
8. [QS]तू माझा जीव मृत्यूपासून, [QE][QS]माझे डोळे अश्रूपासून, [QE][QS]आणि माझे पाय अडखळण्यापासून मुक्त केले आहेत. [QE]
9. [QS]जीवंताच्या भूमित परमेश्वराची [QE][QS]सेवा करणे मी चालूच ठेवीन. [QE]
10. [QS]मी फार पीडित आहे [QE][QS]असे जेव्हा मी म्हणालो, तरी माझा त्याच्यावर विश्वास आहे. [QE]
11. [QS]मी अविचाराने म्हणालो की, [QE][QS]सगळे माणसे खोटारडे आहेत. [QE]
12. [QS]परमेश्वराने माझ्यावर केलेल्या [QE][QS]सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू? [QE]
13. [QS]मी तारणाचा प्याला उंचावून [QE][QS]परमेश्वराच्या नावाने हाक मारीन. [QE]
14. [QS]त्याच्या सर्व लोकांसमोर, [QE][QS]मी परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन. [QE]
15. [QS]परमेश्वराच्या दृष्टीने [QE][QS]त्याच्या भक्तांचा मृत्यू अमोल आहे. [QE]
16. [QS]हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा सेवक आहे; [QE][QS]मी तुझा सेवक, तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे; [QE][QS]माझी बंधने तू सोडली आहेस. [QE]
17. [QS]मी तुला उपकाराचा यज्ञ अर्पण करीन [QE][QS]आणि मी परमेश्वराचे नामस्मरण करीन. [QE]
18. [QS]मी त्याच्या सर्व लोकांसमोर [QE][QS]परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन. [QE]
19. [QS]परमेश्वराच्या घराच्या अंगणात, [QE][QS]यरूशलेमा तुझ्यामध्ये ते फेडीन. [QE][QS]परमेश्वराची स्तुती करा. [QE]