1. {#1परमेश्वराने केलेल्या तारणाबद्दल उपकारस्तुती } [QS]परमेश्वरास धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे. [QE]
2. [QS]इस्राएलाने आता म्हणावे, [QE][QS]“त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.” [QE]
3. [QS]अहरोनाच्या घराण्याने म्हणावे, [QE][QS]“त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.” [QE]
4. [QS]परमेश्वराची उपासना करणाऱ्यांनी म्हणावे, [QE][QS]“त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.” [QE]
5. [QS]मी संकटात असता परमेश्वरास हाक मारली. [QE][QS]परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले. [QE]
6. [QS]परमेश्वर माझ्याबरोबर आहे; मी घाबरणार नाही; [QE][QS]मनुष्य माझे काय करू शकेल? [QE]
7. [QS]माझे सहाय्य करणारा परमेश्वर माझ्या बाजूला आहे; [QE][QS]माझा द्वेष करणाऱ्यावर विजय झालेला मी बघेन. [QE]
8. [QS]मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा [QE][QS]परमेश्वराच्या आश्रयास जाणे अधिक चांगले आहे. [QE]
9. [QS]मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा [QE][QS]परमेश्वरास शरण जाणे हे अधिक चांगले आहे. [QE]
10. [QS]सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे; [QE][QS]परमेश्वराच्या नावात मी त्यांचा संहार करीन. [QE]
11. [QS]त्यांनी मला घेरले आहे; होय, त्यांनी मला घेरले आहे. [QE][QS]परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन. [QE]
12. [QS]त्यांनी मला मधमाश्याप्रमाणे घेरले आहे; [QE][QS]जशी काट्यांमध्ये जेवढ्या लवकर आग लागते तेवढ्याच लवकर ते नाहीसे होतील. [QE][QS]परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन. [QE]
13. [QS]मी पडावे म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला, [QE][QS]परंतु परमेश्वराने मला मदत केली. [QE]
14. [QS]परमेश्वर माझे सामर्थ्य आणि आनंद आहे. [QE][QS]आणि तो माझे तारण झाला आहे. [QE]
15. [QS]उत्सवाचा आणि तारणाचा शब्द नितीमानाच्या तंबूत ऐकू येत आहे; [QE][QS]परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो. [QE]
16. [QS]परमेश्वराचा उजवा हात उंचावला आहे; [QE][QS]परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो. [QE]
17. [QS]मी मरणार नाही, पण जगेन [QE][QS]आणि परमेश्वराची कृत्ये जाहीर करीन. [QE]
18. [QS]परमेश्वराने मला जबर शिक्षा केली; [QE][QS]परंतु त्याने मला मृत्यूच्या हाती दिले नाही. [QE]
19. [QS]माझ्यासाठी धार्मिकतेचे दरवाजे उघडा; [QE][QS]मी त्यामध्ये प्रवेश करीन आणि मी परमेश्वरास धन्यवाद देईन. [QE]
20. [QS]हे परमेश्वराचे दार आहे; [QE][QS]नितीमान त्यातून प्रवेश करतील. [QE]
21. [QS]मी तुला धन्यवाद देईन, कारण तू मला उत्तर दिले आहे [QE][QS]आणि तू माझे तारण झाला आहेस. [QE]
22. [QS]इमारत बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला होता, [QE][QS]तोच कोनाशिला झाला आहे. [QE]
23. [QS]परमेश्वराने हे केले आहे; [QE][QS]आमच्या दृष्टीने ते अतिशय अद्भुत आहे. [QE]
24. [QS]परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे; [QE][QS]ह्यात आपण आनंद व उल्लास करू. [QE]
25. [QS]हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो, आता आमचे तारण कर; [QE][QS]हे परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो, आता आमचा उत्कर्ष कर. [QE]
26. [QS]परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो; [QE][QS]परमेश्वराच्या घरातून आम्ही तुला आशीर्वाद देतो. [QE]
27. [QS]परमेश्वर देव आहे. त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे; [QE][QS]यज्ञाचा पशू वेदीच्या शिंगास दोरीने बांधा. [QE]
28. [QS]तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देईन. [QE][QS]तू माझा देव आहेस; मी तुला उंचावीन. [QE]
29. [QS]अहो, तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या; कारण तो चांगला आहे; [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे. [QE]