1. {परमेश्वराने केलेल्या तारणाबद्दल उपकारस्तुती} [PS] परमेश्वरास धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, [QBR] कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे. [QBR]
2. इस्राएलाने आता म्हणावे, [QBR] “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.” [QBR]
3. अहरोनाच्या घराण्याने म्हणावे, [QBR] “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.” [QBR]
4. परमेश्वराची उपासना करणाऱ्यांनी म्हणावे, [QBR] “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.” [QBR]
5. मी संकटात असता परमेश्वरास हाक मारली. [QBR] परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले. [QBR]
6. परमेश्वर माझ्याबरोबर आहे; मी घाबरणार नाही; [QBR] मनुष्य माझे काय करू शकेल? [QBR]
7. माझे सहाय्य करणारा परमेश्वर माझ्या बाजूला आहे; [QBR] माझा द्वेष करणाऱ्यावर विजय झालेला मी बघेन. [QBR]
8. मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा [QBR] परमेश्वराच्या आश्रयास जाणे अधिक चांगले आहे. [QBR]
9. मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा [QBR] परमेश्वरास शरण जाणे हे अधिक चांगले आहे. [QBR]
10. सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे; [QBR] परमेश्वराच्या नावात मी त्यांचा संहार करीन. [QBR]
11. त्यांनी मला घेरले आहे; होय, त्यांनी मला घेरले आहे. [QBR] परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन. [QBR]
12. त्यांनी मला मधमाश्याप्रमाणे घेरले आहे; [QBR] जशी काट्यांमध्ये जेवढ्या लवकर आग लागते तेवढ्याच लवकर ते नाहीसे होतील. [QBR] परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन. [QBR]
13. मी पडावे म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला, [QBR] परंतु परमेश्वराने मला मदत केली. [QBR]
14. परमेश्वर माझे सामर्थ्य आणि आनंद आहे. [QBR] आणि तो माझे तारण झाला आहे. [QBR]
15. उत्सवाचा आणि तारणाचा शब्द नितीमानाच्या तंबूत ऐकू येत आहे; [QBR] परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो. [QBR]
16. परमेश्वराचा उजवा हात उंचावला आहे; [QBR] परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो. [QBR]
17. मी मरणार नाही, पण जगेन [QBR] आणि परमेश्वराची कृत्ये जाहीर करीन. [QBR]
18. परमेश्वराने मला जबर शिक्षा केली; [QBR] परंतु त्याने मला मृत्यूच्या हाती दिले नाही. [QBR]
19. माझ्यासाठी धार्मिकतेचे दरवाजे उघडा; [QBR] मी त्यामध्ये प्रवेश करीन आणि मी परमेश्वरास धन्यवाद देईन. [QBR]
20. हे परमेश्वराचे दार आहे; [QBR] नितीमान त्यातून प्रवेश करतील. [QBR]
21. मी तुला धन्यवाद देईन, कारण तू मला उत्तर दिले आहे [QBR] आणि तू माझे तारण झाला आहेस. [QBR]
22. इमारत बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला होता, [QBR] तोच कोनाशिला झाला आहे. [QBR]
23. परमेश्वराने हे केले आहे; [QBR] आमच्या दृष्टीने ते अतिशय अद्भुत आहे. [QBR]
24. परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे; [QBR] ह्यात आपण आनंद व उल्लास करू. [QBR]
25. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो, आता आमचे तारण कर; [QBR] हे परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो, आता आमचा उत्कर्ष कर. [QBR]
26. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो; [QBR] परमेश्वराच्या घरातून आम्ही तुला आशीर्वाद देतो. [QBR]
27. परमेश्वर देव आहे. त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे; [QBR] यज्ञाचा पशू वेदीच्या शिंगास दोरीने बांधा. [QBR]
28. तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देईन. [QBR] तू माझा देव आहेस; मी तुला उंचावीन. [QBR]
29. अहो, तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या; कारण तो चांगला आहे; [QBR] कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे. [PE]