1. {दुष्टाविरुद्ध साहाय्याची याचना} PS हे परमेश्वरा, साहाय्य कर! कारण भक्तिमान नाहीसा झाला आहे.
विश्वासू गायब झाला आहे. |
2. प्रत्येक जन आपल्या शेजाऱ्यास पोकळ शब्द बोलतो,
प्रत्येक खुशामती करणाऱ्या ओठांनी आणि दुटप्पी हृदयाने बोलतो. |
4. हे ते आहेत जे असे म्हणतात, “आम्ही आपल्या जीभेने विजयी होऊ,
जेव्हा आमचे ओठ बोलतील, तेव्हा आमच्यावर धनी कोण होणार?” |
5. परंतु परमेश्वर म्हणतो, “गरिबांच्या विरोधात हिंसाचार केल्यामुळे, गरजवंतांच्या कण्हण्यामुळे, मी आता उठतो;
ज्या सुरक्षीतपणाची तो वाट पाहतो, ते मी त्यास देईन.” |
6. परमेश्वराची वचने शुध्द वचने आहेत,
पृथ्वीवर भट्टीत घालून गाळलेल्या, सात वेळा गाळलेल्या चांदी सारखी ती शुद्ध आहेत. |