1. {परमेश्वराच्या द्वारे मिळणाऱ्या तारणाविषयी आशा} [PS] हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे. [QBR]
2. हे प्रभू, माझी वाणी ऐक; [QBR] माझ्या विनवणीच्या वाणीकडे तुझे कान [QBR] लक्षपूर्वक लागलेले असोत. [QBR]
3. हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर, [QBR] हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल? [QBR]
4. पण त्यांनी तुझे भय धरावे, [QBR] म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे. [QBR]
5. मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो, [QBR] आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो. [QBR]
6. पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा [QBR] माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. [QBR]
7. हे इस्राएला, परमेश्वरावर आशा ठेव. [QBR] कारण परमेश्वर दयाळू आहे, [QBR] आणि त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे. [QBR]
8. तोच इस्राएलास त्यांच्या [QBR] सर्व पापांपासून मुक्त करीन. [PE]