1. {पवित्रस्थानाला आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना} [PS] हे परमेश्वरा, दावीदाकरता [QBR] त्याच्या सर्व दुःखांची आठवण कर. [QBR]
2. त्याने परमेश्वराकडे कशी शपथ वाहिली, [QBR] त्याने याकोबाच्या समर्थ प्रभूला कसा नवस केला, याची आठवण कर. [QBR]
3. तो म्हणाला “मी आपल्या घरात [QBR] किंवा मी आपल्या अंथरुणात जाणार नाही. [QBR]
4. मी आपल्या डोळ्यांवर झोप [QBR] किंवा आपल्या पापण्यास विसावा देणार नाही. [QBR]
5. परमेश्वरासाठी स्थान, [QBR] याकोबाच्या सर्वसमर्थ देवासाठी निवासमंडप सापडेपर्यंत मी असेच करीन.” [QBR]
6. पाहा, आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले; [QBR] आम्हास तो जारच्या रानात सापडला. [QBR]
7. आम्ही देवाच्या निवासमंडपात जाऊ; [QBR] आम्ही त्याच्या पदासनापाशी आराधना करू आणि म्हणू. [QBR]
8. हे परमेश्वरा, ऊठ; [QBR] तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रांतीस्थानी ये, [QBR]
9. तुझे याजक नितीमत्तेचे वस्रे पांघरोत; [QBR] तुझे विश्वासू आनंदाने जयघोष करोत. [QBR]
10. तुझा सेवक दावीदाकरिता, [QBR] तू आपल्या अभिषिक्त राजापासून निघून जाऊ नकोस. [QBR]
11. परमेश्वराने विश्वसनीय दावीदाजवळ शपथ वाहिली आहे; [QBR] तो त्याच्या शपथेपासून माघार घेणार नाही, [QBR] मी तुझ्या वंशातून तुझ्या राजासनावर एकाला बसवीन. [QBR]
12. जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला, [QBR] आणि मी त्यांना शिकवलेले नियम पाळले, [QBR] तर त्यांची मुलेसुद्धा तुझ्या राजासनावर सर्वकाळ बसतील. [QBR]
13. खचित परमेश्वराने सियोन निवडून घेतली आहे; [QBR] त्याच्या वस्तीसाठी त्याने इच्छा धरली आहे. [QBR]
14. “ही जागा सर्वकाळ माझ्या विसाव्याची आहे; [QBR] मी येथे राहीन, कारण माझी इच्छा आहे. [QBR]
15. मी तिला विपुलतेने अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन; [QBR] मी तिच्या गरीबांना भाकरीने तृप्त करीन. [QBR]
16. मी तिच्या याजकांना तारणाचे वस्त्र नेसवीन; [QBR] तिचे भक्त आनंदाने मोठ्याने जयघोष करतील. [QBR]
17. तेथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल असे मी करीन; [QBR] तेथे मी आपल्या अभिषिक्तासाठी दिवा ठेविला आहे. [QBR]
18. मी त्याच्या शत्रूंला लाजेचे वस्रे नेसवीन, [QBR] परंतु त्याचा मुकुट चमकेल.” [PE]