1. {#1परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकारस्तुती } [QS]परमेश्वराची उपकारस्तुती करा; कारण तो चांगला आहे, [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
2. [QS]देवांच्या देवाची उपकारस्तुती करा. [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
3. [QS]प्रभूंच्या प्रभूंची उपकारस्तुती करा. [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
4. [QS]जो एकटाच महान चमत्कार करतो त्याची उपकारस्तुती करा. [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
5. [QS]ज्याने बुद्धीने आकाश निर्माण केले त्याची, उपकारस्तुती करा, [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
6. [QS]ज्याने जलावर पृथ्वी पसरवली, [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
7. [QS]ज्याने मोठा प्रकाश निर्माण केला, [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
8. [QS]दिवसावर राज्य करण्यासाठी त्याने सूर्याची निर्मिती केली, [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
9. [QS]त्याने रात्रीवर राज्य करण्यासाठी चंद्र आणि ताऱ्यांची निर्मिती केली, [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
10. [QS]त्याने मिसराचे पहिले जन्मलेले मारून टाकले, [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
11. [QS]आणि ज्याने इस्राएलाला त्यांच्यामधून बाहेर काढले, [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
12. [QS]ज्याने सामर्थ्यी हाताने आणि बाहू उभारून त्यांना बाहेर आणले, [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
13. [QS]ज्याने लाल समुद्र दुभागला, [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
14. [QS]ज्याने इस्राएलाला त्यामधून पार नेले, [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
15. [QS]ज्याने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात उलथून टाकले. [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
16. [QS]ज्याने आपल्या लोकांस रानातून नेले, [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
17. [QS]ज्याने महान राजांना मारून टाकले, [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
18. [QS]आणि ज्याने प्रसिद्ध राजांना मारून टाकले, [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
19. [QS]ज्याने अमोऱ्यांच्या सीहोन राजाला मारून टाकले, [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
20. [QS]आणि ज्याने बाशानाच्या ओग राजाला मारून टाकले, [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
21. [QS]आणि ज्याने त्यांचा देश वतन असा दिला, [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
22. [QS]ज्याने तो इस्राएल त्याचा सेवक याला वतन म्हणून दिला. [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
23. [QS]ज्याने आमच्या कठीन परिस्थितीत आमची आठवण केली आणि आम्हास मदत केली, [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
24. [QS]ज्याने आम्हास आमच्या शत्रूंवर विजय दिला त्याची, [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
25. [QS]जो सर्व जिवंत प्राण्यांना अन्न देतो. [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]
26. [QS]स्वर्गातील देवाची उपकारस्तुती करा. [QE][QS]कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. [QE]