1. {#1बाबेलमध्ये पाडावा करून नेलेल्यांचा आकांत } [QS]आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो; [QE][QS]आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो. [QE]
2. [QS]तेथील वाळुंजावर [QE][QS]आम्ही आमच्या वीणा टांगल्या. [QE]
3. [QS]तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले [QE][QS]आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले, [QE][QS]सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा. [QE]
4. [QS]परक्या देशात [QE][QS]आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे? [QE]
5. [QS]हे यरूशलेमे, मी जर तुला विसरलो, [QE][QS]तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो. [QE]
6. [QS]जर मी तुला विसरलो, [QE][QS]जर मी यरूशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य [QE][QS]विषयाहून अधिक मानले नाही [QE][QS]तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. [QE]
7. [QS]हे परमेश्वरा, अदोमाविरूद्ध यरूशलेमेच्या [QE][QS]त्या दिवसाची आठवण कर, [QE][QS]ते म्हणाले, ती पाडून टाका, [QE][QS]पायापर्यंत पाडून टाका. [QE]
8. [QS]हे बाबेलाच्या कन्ये, तू लवकरच ओसाड पडणार आहेस, [QE][QS]कारण जसे तू आम्हास केले तसे, [QE][QS]जो तुला परत करील तो आशीर्वादित आहे. [QE]
9. [QS]जो तुझी बालके घेऊन त्यांना खडकावर आपटून ठार मारतो [QE][QS]तो आशीर्वादित होईल. [QE]