मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1परमेश्वराच्या कृपाप्रसादाबद्दल उपकारस्तुती }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]मी अगदी मनापासून तुझी उपकारस्तुती करीन; [QE][QS]मी देवांसमोर तुझी स्तोत्रे गाईन. [QE]
2. [QS]मी तुझ्या पवित्र मंदिराकडे नतमस्तक होऊन, [QE][QS]तुझ्या कराराची विश्वासयोग्यता आणि तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकारस्तुती करीन. [QE][QS]तू आपल्या संपूर्ण नावापेक्षा आपल्या वचनाची [* कराराची ]थोरवी वाढविली आहेस. [QE]
3. [QS]मी तुला हाक मारली त्याच दिवशी तू मला उत्तर दिलेस. [QE][QS]तू मला उत्तेजन दिले आणि तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले. [QE]
4. [QS]हे परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी उपकारस्तुती करतील, [QE][QS]कारण त्यांनी तुझ्या मुखातील शब्द ऐकले आहेत. [QE]
5. [QS]खरोखर, ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील [QE][QS]कारण परमेश्वराचा महिमा अगाध आहे. [QE]
6. [QS]कारण परमेश्वर थोर आहे तरी तो दीनांकडे लक्ष देतो, [QE][QS]पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो. [QE]
7. [QS]जरी मी संकटांमध्ये चाललो तरी तू मला सुरक्षित ठेवतोस. [QE][QS]माझ्या शत्रूंच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस; [QE][QS]आणि तुझा उजवा हात माझे तारण करतो. [QE]
8. [QS]परमेश्वर माझ्याबरोबर शेवटपर्यंत आहे; [QE][QS]हे परमेश्वरा, तुझी कराराची विश्वासयोग्यता सदासर्वकाळ आहे. [QE][QS]तू आपल्या हातची कामे सोडून देऊ नकोस. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 138 / 150
परमेश्वराच्या कृपाप्रसादाबद्दल उपकारस्तुती 1 दाविदाचे स्तोत्र मी अगदी मनापासून तुझी उपकारस्तुती करीन; मी देवांसमोर तुझी स्तोत्रे गाईन. 2 मी तुझ्या पवित्र मंदिराकडे नतमस्तक होऊन, तुझ्या कराराची विश्वासयोग्यता आणि तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकारस्तुती करीन. तू आपल्या संपूर्ण नावापेक्षा आपल्या वचनाची * कराराची थोरवी वाढविली आहेस. 3 मी तुला हाक मारली त्याच दिवशी तू मला उत्तर दिलेस. तू मला उत्तेजन दिले आणि तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले. 4 हे परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी उपकारस्तुती करतील, कारण त्यांनी तुझ्या मुखातील शब्द ऐकले आहेत. 5 खरोखर, ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील कारण परमेश्वराचा महिमा अगाध आहे. 6 कारण परमेश्वर थोर आहे तरी तो दीनांकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो. 7 जरी मी संकटांमध्ये चाललो तरी तू मला सुरक्षित ठेवतोस. माझ्या शत्रूंच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस; आणि तुझा उजवा हात माझे तारण करतो. 8 परमेश्वर माझ्याबरोबर शेवटपर्यंत आहे; हे परमेश्वरा, तुझी कराराची विश्वासयोग्यता सदासर्वकाळ आहे. तू आपल्या हातची कामे सोडून देऊ नकोस.
Total 150 अध्याय, Selected धडा 138 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References