1. {परमेश्वराच्या कृपाप्रसादाबद्दल उपकारस्तुती} PS मी अगदी मनापासून तुझी उपकारस्तुती करीन;
मी देवांसमोर तुझी स्तोत्रे गाईन. |
2. मी तुझ्या पवित्र मंदिराकडे नतमस्तक होऊन,
तुझ्या कराराची विश्वासयोग्यता आणि तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकारस्तुती करीन. तू आपल्या संपूर्ण नावापेक्षा आपल्या वचनाची * कराराची थोरवी वाढविली आहेस. |
3. मी तुला हाक मारली त्याच दिवशी तू मला उत्तर दिलेस.
तू मला उत्तेजन दिले आणि तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले. |
4. हे परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी उपकारस्तुती करतील,
कारण त्यांनी तुझ्या मुखातील शब्द ऐकले आहेत. |
7. जरी मी संकटांमध्ये चाललो तरी तू मला सुरक्षित ठेवतोस.
माझ्या शत्रूंच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस; आणि तुझा उजवा हात माझे तारण करतो. |
8. परमेश्वर माझ्याबरोबर शेवटपर्यंत आहे;
हे परमेश्वरा, तुझी कराराची विश्वासयोग्यता सदासर्वकाळ आहे. तू आपल्या हातची कामे सोडून देऊ नकोस. PE |