मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {परमेश्वराच्या कृपाप्रसादाबद्दल उपकारस्तुती} [PS] मी अगदी मनापासून तुझी उपकारस्तुती करीन; [QBR] मी देवांसमोर तुझी स्तोत्रे गाईन. [QBR]
2. मी तुझ्या पवित्र मंदिराकडे नतमस्तक होऊन, [QBR] तुझ्या कराराची विश्वासयोग्यता आणि तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकारस्तुती करीन. [QBR] तू आपल्या संपूर्ण नावापेक्षा आपल्या वचनाची [* कराराची] थोरवी वाढविली आहेस. [QBR]
3. मी तुला हाक मारली त्याच दिवशी तू मला उत्तर दिलेस. [QBR] तू मला उत्तेजन दिले आणि तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले. [QBR]
4. हे परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी उपकारस्तुती करतील, [QBR] कारण त्यांनी तुझ्या मुखातील शब्द ऐकले आहेत. [QBR]
5. खरोखर, ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील [QBR] कारण परमेश्वराचा महिमा अगाध आहे. [QBR]
6. कारण परमेश्वर थोर आहे तरी तो दीनांकडे लक्ष देतो, [QBR] पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो. [QBR]
7. जरी मी संकटांमध्ये चाललो तरी तू मला सुरक्षित ठेवतोस. [QBR] माझ्या शत्रूंच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस; [QBR] आणि तुझा उजवा हात माझे तारण करतो. [QBR]
8. परमेश्वर माझ्याबरोबर शेवटपर्यंत आहे; [QBR] हे परमेश्वरा, तुझी कराराची विश्वासयोग्यता सदासर्वकाळ आहे. [QBR] तू आपल्या हातची कामे सोडून देऊ नकोस. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 138 / 150
स्तोत्रसंहिता 138:73
परमेश्वराच्या कृपाप्रसादाबद्दल उपकारस्तुती 1 मी अगदी मनापासून तुझी उपकारस्तुती करीन; मी देवांसमोर तुझी स्तोत्रे गाईन. 2 मी तुझ्या पवित्र मंदिराकडे नतमस्तक होऊन, तुझ्या कराराची विश्वासयोग्यता आणि तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकारस्तुती करीन. तू आपल्या संपूर्ण नावापेक्षा आपल्या वचनाची * कराराची थोरवी वाढविली आहेस. 3 मी तुला हाक मारली त्याच दिवशी तू मला उत्तर दिलेस. तू मला उत्तेजन दिले आणि तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले. 4 हे परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी उपकारस्तुती करतील, कारण त्यांनी तुझ्या मुखातील शब्द ऐकले आहेत. 5 खरोखर, ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील कारण परमेश्वराचा महिमा अगाध आहे. 6 कारण परमेश्वर थोर आहे तरी तो दीनांकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो. 7 जरी मी संकटांमध्ये चाललो तरी तू मला सुरक्षित ठेवतोस. माझ्या शत्रूंच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस; आणि तुझा उजवा हात माझे तारण करतो. 8 परमेश्वर माझ्याबरोबर शेवटपर्यंत आहे; हे परमेश्वरा, तुझी कराराची विश्वासयोग्यता सदासर्वकाळ आहे. तू आपल्या हातची कामे सोडून देऊ नकोस.
Total 150 अध्याय, Selected धडा 138 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References