मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {देव सर्वसाक्षी व सर्वज्ञानी आहे} [PS] हे परमेश्वरा, तू माझी परीक्षा केली आहेस, आणि तू मला जाणतोस; [QBR]
2. मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहित आहे; [QBR] तुला माझे विचार खूप दुरुनही समजतात. [QBR]
3. तू माझे चालने आणि माझे झोपणे बारकाईने पाहतो; [QBR] तू माझ्या मार्गांशी परिचित आहेस. [QBR]
4. हे परमेश्वरा, माझ्या मुखातून निघणारा एकही शब्द [QBR] तुला पूर्णपणे माहित नाही असे मुळीच नाही. [QBR]
5. तू मागून व पुढून मला घेरले आहेस, [QBR] आणि माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस. [QBR]
6. हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे; [QBR] ते खूप अगम्य आहे, ते मी समजू शकत नाही. [QBR]
7. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निसटून जाऊ शकतो? [QBR] मी तुझ्या सान्निध्यापासून कोठे पळून जाऊ शकतो? [QBR]
8. मी जर वर आकाशात चढलो तर तिथे तू आहेस; [QBR] जर मी खाली मृत्यूलोकात अंथरूण केले तरी, पाहा, तेथे तू आहेस. [QBR]
9. जर मी पहाटेचे पंख धारण करून [QBR] आणि समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तू आहेस. [QBR]
10. तरी तिथे ही तुझा उजवा हात मला धरतो. [QBR] आणि तू मला हाताने धरून नेतोस. [QBR]
11. जरी मी म्हणालो, खचित अंधार मला लपविल, [QBR] आणि तरीही रात्र माझ्याभोवती प्रकाशच होईल. [QBR]
12. काळोख देखील तुझ्यापासून काहीच लपवित नाही. [QBR] रात्रही दिवसासारखीच प्रकाशते, [QBR] कारण तुला काळोख आणि प्रकाश दोन्ही सारखेच आहेत. [QBR]
13. तू माझे अंतर्याम निर्माण केलेस; [QBR] तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले. [QBR]
14. मी तुला धन्यवाद देतो, [QBR] कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत, [QBR] हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो. [QBR]
15. मी गुप्तस्थळी निर्माण होत असता, [QBR] आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे [QBR] माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. [QBR]
16. तू मला गर्भात पिंडरूपाने असताना पाहिलेस; [QBR] माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी [QBR] ते सर्व तुझ्या पुस्तकात नमूद करून ठेवले होते. [QBR]
17. हे देवा, तुझे विचार मला किती मोलवान आहेत, [QBR] त्यांची संख्या किती मोठी आहे. [QBR]
18. मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त ठरतील. [QBR] जेव्हा मी जागा होतो, तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो. [QBR]
19. हे देवा! जर तू दुष्टांना मारुन टाकशील; [QBR] अहो हिंसाचारी मनुष्यांनो! माझ्यापासून दूर व्हा. [QBR]
20. ते तुझ्याविरूद्ध बंड आणि कपटाने कृती करतात; [QBR] तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात. [QBR]
21. परमेश्वरा! तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये? [QBR] तुझ्याविरुध्द उठणाऱ्यांचा मी का तिरस्कार करू नये? [QBR]
22. मी त्यांच्या पराकाष्ठेचा पूर्ण द्वेष करतो; [QBR] ते माझे शत्रू झाले आहेत. [QBR]
23. हे देवा, माझे परीक्षण कर आणि माझे मन जाण; [QBR] माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे. [QBR]
24. माझ्या मनात जर काही दुष्ट मार्ग असतील तर पाहा, [QBR] आणि मला सनातन मार्गाने चालीव. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 139 / 150
स्तोत्रसंहिता 139:154
देव सर्वसाक्षी व सर्वज्ञानी आहे 1 हे परमेश्वरा, तू माझी परीक्षा केली आहेस, आणि तू मला जाणतोस; 2 मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहित आहे; तुला माझे विचार खूप दुरुनही समजतात. 3 तू माझे चालने आणि माझे झोपणे बारकाईने पाहतो; तू माझ्या मार्गांशी परिचित आहेस. 4 हे परमेश्वरा, माझ्या मुखातून निघणारा एकही शब्द तुला पूर्णपणे माहित नाही असे मुळीच नाही. 5 तू मागून व पुढून मला घेरले आहेस, आणि माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस. 6 हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे; ते खूप अगम्य आहे, ते मी समजू शकत नाही. 7 मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निसटून जाऊ शकतो? मी तुझ्या सान्निध्यापासून कोठे पळून जाऊ शकतो? 8 मी जर वर आकाशात चढलो तर तिथे तू आहेस; जर मी खाली मृत्यूलोकात अंथरूण केले तरी, पाहा, तेथे तू आहेस. 9 जर मी पहाटेचे पंख धारण करून आणि समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तू आहेस. 10 तरी तिथे ही तुझा उजवा हात मला धरतो. आणि तू मला हाताने धरून नेतोस. 11 जरी मी म्हणालो, खचित अंधार मला लपविल, आणि तरीही रात्र माझ्याभोवती प्रकाशच होईल. 12 काळोख देखील तुझ्यापासून काहीच लपवित नाही. रात्रही दिवसासारखीच प्रकाशते, कारण तुला काळोख आणि प्रकाश दोन्ही सारखेच आहेत. 13 तू माझे अंतर्याम निर्माण केलेस; तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले. 14 मी तुला धन्यवाद देतो, कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत, हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो. 15 मी गुप्तस्थळी निर्माण होत असता, आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. 16 तू मला गर्भात पिंडरूपाने असताना पाहिलेस; माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या पुस्तकात नमूद करून ठेवले होते. 17 हे देवा, तुझे विचार मला किती मोलवान आहेत, त्यांची संख्या किती मोठी आहे. 18 मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त ठरतील. जेव्हा मी जागा होतो, तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो. 19 हे देवा! जर तू दुष्टांना मारुन टाकशील; अहो हिंसाचारी मनुष्यांनो! माझ्यापासून दूर व्हा. 20 ते तुझ्याविरूद्ध बंड आणि कपटाने कृती करतात; तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात. 21 परमेश्वरा! तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्याविरुध्द उठणाऱ्यांचा मी का तिरस्कार करू नये? 22 मी त्यांच्या पराकाष्ठेचा पूर्ण द्वेष करतो; ते माझे शत्रू झाले आहेत. 23 हे देवा, माझे परीक्षण कर आणि माझे मन जाण; माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे. 24 माझ्या मनात जर काही दुष्ट मार्ग असतील तर पाहा, आणि मला सनातन मार्गाने चालीव.
Total 150 अध्याय, Selected धडा 139 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References