1. {#1देव सर्वसाक्षी व सर्वज्ञानी आहे }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]हे परमेश्वरा, तू माझी परीक्षा केली आहेस, आणि तू मला जाणतोस; [QE]
2. [QS]मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहित आहे; [QE][QS]तुला माझे विचार खूप दुरुनही समजतात. [QE]
3. [QS]तू माझे चालने आणि माझे झोपणे बारकाईने पाहतो; [QE][QS]तू माझ्या मार्गांशी परिचित आहेस. [QE]
4. [QS]हे परमेश्वरा, माझ्या मुखातून निघणारा एकही शब्द [QE][QS]तुला पूर्णपणे माहित नाही असे मुळीच नाही. [QE]
5. [QS]तू मागून व पुढून मला घेरले आहेस, [QE][QS]आणि माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस. [QE]
6. [QS]हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे; [QE][QS]ते खूप अगम्य आहे, ते मी समजू शकत नाही. [QE]
7. [QS]मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निसटून जाऊ शकतो? [QE][QS]मी तुझ्या सान्निध्यापासून कोठे पळून जाऊ शकतो? [QE]
8. [QS]मी जर वर आकाशात चढलो तर तिथे तू आहेस; [QE][QS]जर मी खाली मृत्यूलोकात अंथरूण केले तरी, पाहा, तेथे तू आहेस. [QE]
9. [QS]जर मी पहाटेचे पंख धारण करून [QE][QS]आणि समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तू आहेस. [QE]
10. [QS]तरी तिथे ही तुझा उजवा हात मला धरतो. [QE][QS]आणि तू मला हाताने धरून नेतोस. [QE]
11. [QS]जरी मी म्हणालो, खचित अंधार मला लपविल, [QE][QS]आणि तरीही रात्र माझ्याभोवती प्रकाशच होईल. [QE]
12. [QS]काळोख देखील तुझ्यापासून काहीच लपवित नाही. [QE][QS]रात्रही दिवसासारखीच प्रकाशते, [QE][QS]कारण तुला काळोख आणि प्रकाश दोन्ही सारखेच आहेत. [QE]
13. [QS]तू माझे अंतर्याम निर्माण केलेस; [QE][QS]तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले. [QE]
14. [QS]मी तुला धन्यवाद देतो, [QE][QS]कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत, [QE][QS]हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो. [QE]
15. [QS]मी गुप्तस्थळी निर्माण होत असता, [QE][QS]आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे [QE][QS]माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. [QE]
16. [QS]तू मला गर्भात पिंडरूपाने असताना पाहिलेस; [QE][QS]माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी [QE][QS]ते सर्व तुझ्या पुस्तकात नमूद करून ठेवले होते. [QE]
17. [QS]हे देवा, तुझे विचार मला किती मोलवान आहेत, [QE][QS]त्यांची संख्या किती मोठी आहे. [QE]
18. [QS]मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त ठरतील. [QE][QS]जेव्हा मी जागा होतो, तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो. [QE]
19. [QS]हे देवा! जर तू दुष्टांना मारुन टाकशील; [QE][QS]अहो हिंसाचारी मनुष्यांनो! माझ्यापासून दूर व्हा. [QE]
20. [QS]ते तुझ्याविरूद्ध बंड आणि कपटाने कृती करतात; [QE][QS]तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात. [QE]
21. [QS]परमेश्वरा! तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये? [QE][QS]तुझ्याविरुध्द उठणाऱ्यांचा मी का तिरस्कार करू नये? [QE]
22. [QS]मी त्यांच्या पराकाष्ठेचा पूर्ण द्वेष करतो; [QE][QS]ते माझे शत्रू झाले आहेत. [QE]
23. [QS]हे देवा, माझे परीक्षण कर आणि माझे मन जाण; [QE][QS]माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे. [QE]
24. [QS]माझ्या मनात जर काही दुष्ट मार्ग असतील तर पाहा, [QE][QS]आणि मला सनातन मार्गाने चालीव. [QE]