मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1छळणाऱ्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]हे परमेश्वरा, मला दुष्टांपासून सोडव; [QE][QS]जुलमी मनुष्यापासून मला सुरक्षित ठेव. [QE]
2. [QS]ते आपल्या मनात वाईट योजना करतात; [QE][QS]ते प्रत्येक दिवशी भांडणाला सुरुवात करतात. [QE]
3. [QS]त्यांची जीभ सर्पासारखी जखम करते; [QE][QS]त्यांच्या ओठाखाली विषारी सर्पाचे विष आहे. [QE]
4. [QS]हे परमेश्वरा, मला दुष्टांच्या हातातून वाचव; [QE][QS]मला जुलमी मनुष्यांपासून सुरक्षित ठेव. [QE][QS]त्यांनी मला ढकलण्याची योजना केली आहे. [QE]
5. [QS]गर्विष्ठांनी माझ्यासाठी पाश व दोऱ्या लपवून ठेविल्या आहेत; [QE][QS]त्यांनी रस्त्याच्या बाजूला जाळे पसरले आहे; [QE][QS]त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आहे. [QE]
6. [QS]मी परमेश्वरास म्हणतो, तू माझा देव आहेस; हे परमेश्वरा, [QE][QS]माझ्या विनवण्यांच्या वाणीकडे कान दे. [QE]
7. [QS]हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या, [QE][QS]माझ्या लढाईच्या दिवसात तू माझे शिरस्राण आहेस. [QE]
8. [QS]हे परमेश्वरा, दुष्टांच्या इच्छा पुरवू नको, [QE][QS]त्यांच्या दुष्ट योजना यशस्वी होऊ देऊ नकोस. नाही तर ते उन्मत्त होतील. [QE]
9. [QS]ज्यांनी मला घेरले आहे; [QE][QS]त्यांच्या ओठापासून होणारा अनर्थ त्यांच्याच शिरी पडो. [QE]
10. [QS]त्यांच्यावर जळते निखारे पडोत; [QE][QS]त्यांना अग्नीत टाकले जावो, ज्यातून त्यांना उठून वर [QE][QS]कधीही येता येणार नाही अशा खड्‌यात फेकण्यात येवो. [QE]
11. [QS]वाईट बोलणारा पृथ्वीवर सुरक्षित केला जाणार नाही; [QE][QS]जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागेल. [QE]
12. [QS]परमेश्वर गरीबांच्या पक्षाचे, [QE][QS]आणि गरजवंताच्या वादाचे समर्थन करील हे मला माहित आहे. [QE]
13. [QS]खचित नितीमान तुझ्या नावाची उपकारस्तुती करतील; [QE][QS]सरळ मनाचे तुझ्या समक्षतेत राहतील. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 140 / 150
छळणाऱ्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना 1 दाविदाचे स्तोत्र हे परमेश्वरा, मला दुष्टांपासून सोडव; जुलमी मनुष्यापासून मला सुरक्षित ठेव. 2 ते आपल्या मनात वाईट योजना करतात; ते प्रत्येक दिवशी भांडणाला सुरुवात करतात. 3 त्यांची जीभ सर्पासारखी जखम करते; त्यांच्या ओठाखाली विषारी सर्पाचे विष आहे. 4 हे परमेश्वरा, मला दुष्टांच्या हातातून वाचव; मला जुलमी मनुष्यांपासून सुरक्षित ठेव. त्यांनी मला ढकलण्याची योजना केली आहे. 5 गर्विष्ठांनी माझ्यासाठी पाश व दोऱ्या लपवून ठेविल्या आहेत; त्यांनी रस्त्याच्या बाजूला जाळे पसरले आहे; त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आहे. 6 मी परमेश्वरास म्हणतो, तू माझा देव आहेस; हे परमेश्वरा, माझ्या विनवण्यांच्या वाणीकडे कान दे. 7 हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या, माझ्या लढाईच्या दिवसात तू माझे शिरस्राण आहेस. 8 हे परमेश्वरा, दुष्टांच्या इच्छा पुरवू नको, त्यांच्या दुष्ट योजना यशस्वी होऊ देऊ नकोस. नाही तर ते उन्मत्त होतील. 9 ज्यांनी मला घेरले आहे; त्यांच्या ओठापासून होणारा अनर्थ त्यांच्याच शिरी पडो. 10 त्यांच्यावर जळते निखारे पडोत; त्यांना अग्नीत टाकले जावो, ज्यातून त्यांना उठून वर कधीही येता येणार नाही अशा खड्‌यात फेकण्यात येवो. 11 वाईट बोलणारा पृथ्वीवर सुरक्षित केला जाणार नाही; जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागेल. 12 परमेश्वर गरीबांच्या पक्षाचे, आणि गरजवंताच्या वादाचे समर्थन करील हे मला माहित आहे. 13 खचित नितीमान तुझ्या नावाची उपकारस्तुती करतील; सरळ मनाचे तुझ्या समक्षतेत राहतील.
Total 150 अध्याय, Selected धडा 140 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References