मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {वाईटापासून राखण्यासाठी प्रार्थना} [PS] हे परमेश्वरा, मी तुला मोठ्याने ओरडून हाक मारतो; माझ्याकडे त्वरेने ये. [QBR] जेव्हा मी तुला हाक मारतो तेव्हा माझे ऐक. [QBR]
2. माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे, [QBR] ती माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो. [QBR]
3. हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; [QBR] माझ्या ओठांचे द्वार सांभाळ. [QBR]
4. अन्याय करणाऱ्या मनुष्यांबरोबर मी त्याच्या [QBR] पापमय कार्यात सहभागी होऊ देऊ नकोस, [QBR] जे दुष्कर्मे करतात त्यांची मिष्टान्ने मला खाऊ देऊ नकोस. [QBR]
5. नितीमान मनुष्य मला तडाखा मारो; ती मला दयाच होईल. [QBR] तो मला दुरुस्त करो. ते माझ्या डोक्यावर तेलासारखे होईल. [QBR] माझे डोके ते स्वीकारण्यास नकार देणार नाही. [QBR] परंतु माझ्या प्रार्थना नेहमी दुष्ट लोकांच्या कृत्याविरूद्ध आहेत. [QBR]
6. त्यांच्या अधिपतींना कड्यावरून खाली लोटून दिले आहे; [QBR] ते माझी वचने ऐकतील कारण ती गोड आहेत. [QBR]
7. जमीन नांगरताना आणि ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते, [QBR] तशीच आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत. [QBR]
8. तरी हे प्रभू परमेश्वरा, खचित माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत; [QBR] मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; माझा जीव निराधार सोडू नकोस. [QBR]
9. त्यांनी माझ्यासाठी जो पाश रचला आहे त्यातून व [QBR] दुष्कर्म करणाऱ्यांच्या सापळ्यातून माझे संरक्षण कर. [QBR]
10. दुष्ट आपल्या स्वतःच्या जाळ्यात पडोत, [QBR] मी त्यातून निसटून जाईन. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 141 / 150
स्तोत्रसंहिता 141:118
वाईटापासून राखण्यासाठी प्रार्थना 1 हे परमेश्वरा, मी तुला मोठ्याने ओरडून हाक मारतो; माझ्याकडे त्वरेने ये. जेव्हा मी तुला हाक मारतो तेव्हा माझे ऐक. 2 माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे, ती माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो. 3 हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; माझ्या ओठांचे द्वार सांभाळ. 4 अन्याय करणाऱ्या मनुष्यांबरोबर मी त्याच्या पापमय कार्यात सहभागी होऊ देऊ नकोस, जे दुष्कर्मे करतात त्यांची मिष्टान्ने मला खाऊ देऊ नकोस. 5 नितीमान मनुष्य मला तडाखा मारो; ती मला दयाच होईल. तो मला दुरुस्त करो. ते माझ्या डोक्यावर तेलासारखे होईल. माझे डोके ते स्वीकारण्यास नकार देणार नाही. परंतु माझ्या प्रार्थना नेहमी दुष्ट लोकांच्या कृत्याविरूद्ध आहेत. 6 त्यांच्या अधिपतींना कड्यावरून खाली लोटून दिले आहे; ते माझी वचने ऐकतील कारण ती गोड आहेत. 7 जमीन नांगरताना आणि ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते, तशीच आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत. 8 तरी हे प्रभू परमेश्वरा, खचित माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत; मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; माझा जीव निराधार सोडू नकोस. 9 त्यांनी माझ्यासाठी जो पाश रचला आहे त्यातून व दुष्कर्म करणाऱ्यांच्या सापळ्यातून माझे संरक्षण कर. 10 दुष्ट आपल्या स्वतःच्या जाळ्यात पडोत, मी त्यातून निसटून जाईन.
Total 150 अध्याय, Selected धडा 141 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References